छत्रपती शिवाजी महाराजांचा राजाभिषेक सोहळा संपन्न झाल्यावर राजभवना बाहेर ढोल ताशा पथकाचा एकाच जल्लोष सुरु झाला . आणि जशे महाराज जगदीश्वराच्या दर्शनासाठी पालखीत बसून पालखी राजभवना बाहेर निघू लागली , तसे सर्वांच्याच रोमरोमातून उत्साह ओसंडून वाहू लागला . या आनंदोत्सवात सर्व जण बेभान होऊन नाचत होते . हातात असणाऱ्या अनेक भगव्या ध्वज्यानी आणि तलवारींनी आसमंत भरून गेला होता . छत्रपती शिवाजी महाराजांचा तसेच, आई भवानी मातेचा , आणि आऊसाहेब जिजाऊनच्या नावांचा जयजयकार चारी दिशांना होत होता. सर्वजण हर्षात न्हाहून निघाले होते. सोबत ढोल ताशा पथकाचा दरवर्षीप्रमाणे वातावरण अधिक मनमोहक करणारा आणि अनेकांची अंतकरण जोशाने भरभरून लावणारे असे सादरीकरण होत होते !
ज्यांना अनुभवायला मिळाले ते तर खरे भाग्यवंतच ! आणि ज्यांना जमले नाही त्यांसाठी दुर्गदुर्गेश्वर रायगडावरच्या हा दैदिप्यमान “ तिथीनुसार च्या खरा सोहळ्याची ” "त्या आनंदोत्सवाची ” हि छोटीशी विडीओ चित्रफित - जय शिवराय !
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा