गुरुवार, ११ जून, २०१५

" चार मित्रांची गोष्ट " - तिथी कि तारीख ?? ( भाग -२ )







" चार मित्रांची गोष्ट "

भाग २.

केदार : पण त्या इंग्रजी कालगणनेत सुद्धा एक सूत्रता आहे का ? याचा विचार आपण कधी केला आहे का ? तिथे सुद्धा श्रीशिवछत्रपतिंच्या जयंती बद्दल यावर एकचं उत्तर नाही ......
इंग्रजी कालगणना आणि त्यामधील त्रुटींमुळे इसवी सन १५८२ साली पोप ग्रेगरी यांनी बाद केले व ४ ऑक्टोबर १५८२ नंतर पुढील दिवस १५ ऑक्टोबर १५८२ आहे असे समजावे असा फतवा काढला. अर्थात त्यातील त्यांनी त्या वर्षातील १० दिवस बाद केले. युरोपातील कॅथॉलिक देशांनी ताबडतोब नव्या ग्रेग्रोरियन कॅलेंडरचा स्वीकार केला. परंतू जगभर साम्राज्य प्रस्थापित करणाऱ्या प्रोटेस्टंट ब्रिटनने मात्र २ सप्टेंबर १७५२ पर्यंत ग्रेग्रोरियन कॅलेंडरचा स्वीकार केला नाही. ब्रिटनच्या साम्राज्यात ज्युलियन कॅलेंडर प्रमाणेच कालगणना चालू राहिली. अर्थातच भारतातही सारा इतिहास हा ज्युलियन दिनांकात रुपांतर करण्यात आले. १७५२ साली २ सप्टेंबरच्या पुढील दिवस १४ सप्टेंबर असेल, असे घोषित ब्रिटनने ग्रेग्रोरियन कॅलेंडरशी जुळवून घेतले.
अर्थातचं मग आपणचं का ज्युलियन कॅलेंडर प्रमाणेच कालगणनचे स्वीकार करून आपल्या हिंदूस्थानातील तिथी संस्कृतीला दुरावा का देतो ??????

(केदार च्या या उत्तराने सर्वच गार पडले, कारण मुळात केदार चा या विषयीचा अभ्यास पक्का होता आणि आपण जे करतो आहोत आणि का करतो आहोत या बद्दल तो पूर्णतः स्वतः विषयी निश्चयी होता. परंतु या उत्तराने पुरुशोतमातला मुळची असलेली ब्रिगेडी (उपद्रवी) प्रवृत्ती जागी झाली.)

पुरुषोत्तम: ६ जून रोजी छत्रपती शिवाजी महाराज राज्याभिषेक आहे. मी रायगडावर असलेल्या माझ्या देवा जवळ दिवा पेटवणार आहे , उद्या संध्याकाळी . सर्वाना आमंत्रण , पुरुषोत्तम , एक जातिवंत मावळा !

केदार: तिथी नुसार जयंती साजरी करण्याचा आनंदच वेगळा असतो.

सुयोग : मी दोन्ही करतो .

पुरुषोत्तम : आता तिथीप्रमाणे शिवजयंती वा शिवराजाभिषेक साजरे करणारे भरकटलेले शिवभक्त यांना शिवरायांचा कोणताही उत्सव हा तारीख प्रमाणे नेच करावा .

केदार: हेच चुकीचे आहे.

प्रकाश : मला नाही वाटत .

केदार: स्व संस्कृती, स्व भाषा, स्व इतिहास, यांचा नितांत अभिमान का असू नये ? आणि त्यातूनच या थोर महापुरुषा नाचे खरे महत्त्व टिकवले का जाऊ नये ??. आणि त्यातूनच त्यांना खरे ग्लोबल होतील याची भावना तुम्हा आम्हास का मान्य नाही ??? .

पुरुषोत्तम : इंग्रजी कालगणना हि इसवी १ पासून सुरु झाली व आज तगायत २०१५ पर्यंत चालू आहे आणि चालू राहणार यात शंका घेण्याचा वाव नाही. जगाच्या पाठीवर कोटयावधीच्या संख्येमध्ये शिवभक्त आहे. हे सर्व शिवभक्त जिवापेक्षाही जास्त छत्रपती शिवरायांवर प्रेम करतात. या शिवभक्तांना दिशाहिन करण्यासाठी काही मंडळी शिवजयंती ही तिथी प्रमाणे साजरा करण्याबाबत आग्रह धरतात. या मध्ये त्यांचे शिवप्रेम नाही अस नाही पण ते छत्रपती शिवराय यांना पंचागामध्ये बंदिस्त करु इच्छीतात. . (केदार ला तोंड देण्यासाठी पुरुशोतामाने हि आपले मत मांडले )

सुयोग : मला तर अभिमान आहे , म्हणून तर मी एवढे करतोय . मला तारीख आणि तिथी दोन्ही मान्य आहेत .

प्रकाश : आणि हे सर्व त्या ब्राह्मणांचेच कारस्थान आहे.

केदार : हे बघ सुयोग, अभिमाना सोबत आचरण हि महत्त्वाचे आहे. आणि पक्या तू सुद्धा त्या मूर्ख ब्रिगेडी लोकांसारखं विचार करायला लागलास ?
( केदार च्या या नकळत मारलेला टोमणा, पुरुषोत्तम च्या मनाला चांगलाच झोबला होता . )

सुयोग : माझे आचरण हि आहे रे .

केदार : पुरुषोत्तम, तू जे म्हणतो ते कितपत योग्य वाटते तुला? मी हि हेच म्हणेल कि तु संपूर्ण विचार केलेला दिसतच नाही.

पुरुषोत्तम : म्हणजे काय म्हणायचे काय तुला ? आता तू मला ज्ञान शिकव ..
(आता केदार ला मुलत: संभाजी ब्रिगेड चा असलेला पुरुषोत्तम भिडत होता, खरंतर त्याचा अहंकार केदार मुळे नकळत दुखावला जो गेला होता.... )

केदार : सरळ सोपी गोष्ट आहे, कि तुम्हाला तुमच्या संस्कृती चा आणि इतिहासाचा कितपत अभिमान आहे ? आणि दुसर्यांच्या कालगणना पद्धत तुम्हाला योग्य वाटते ? काय साध्य करणार तुम्ही ??
तारखेला महत्व देऊन नवीन पिढी साठी चुकीच्या समजुती निर्माण् होतात. ज्यानी अन्यायाबद्दल लढून आयुष्य बलिदान केले त्यां थोर महात्म्याना आपण काय देत आहोत ?
(हसण्या खेळण्याचे बोलणे गंभीर स्वरूप धारण करू लागले होते . शिव विचारारांच्या चर्चात असतेच एवढे सामर्थ्य ...)

सुयोग: पहिले लोकांनी ते साजरे करायला हवेत .

प्रकाश: आणि लोक ते करणार नाहीच . हे मला पक्के ठाऊक आहे .

केदार : सर्वांनी असा विचार केलात , मग सुरुवात कोण करणार ?? बोला ?
सुयोग आणि प्रकाश .... सुरवात “स्व” ता पासून केलेली नेहमीच चांगली.. तूमी स्वतः आधी मान्य केलीत तर इतर हळूहळू इतर आजूबाजूची हि लोकं विचार करू लागतील . आणि नंतर हळूहळू पूर्ण जगच विचार करायला लागेल .

पुरुषोत्तम : कसला अभिमान आणि कोणत्या समजुती ? आणि कसले आले विचार ??? आता तू आम्हांला शिवकार्य आणि ते करायचे ज्ञान शिकवणार ? काय बोलतोयेस याचा भान आहे का तुला??? हाहाहाहा:
( पुरुषोत्तम राग आवळून पुरुषोत्तम मोठमोठ्याने हसण्याचा प्रयत्न करतो)

केदार : हाहाहा , पुरुषोत्तम साहेब शिवकार्य शिकवावे लागत नसते . ते आपोआपच जन्मतःच असते . आणि योग्य वेळी आपण आपल्या परीने ते करतच असतो .

पुरुषोत्तम : म्हणजे काय टोनिक आहे का ? त्या बाळकडू पिक्चर सारखं ...... हाहाहाहः

केदार : हो हवं तर तसाच म्हणा , आम्हां मराठी जणांना शिवकार्याचे बाळकडू या स्वराज्याच्या भूमीत जन्मल्यावर आपोआप मिळते .

सुयोग : लय भारी !!

पुरुषोत्तम : म्हणजे तू तेवढा एकटा मराठी , आणि आम्ही कोण ? स्वतःला लय शांना समजतोय लेका , जरा तोंड सांभाळून बोल !

केदार : पुरुषोत्तम साहेब , आपण फक्त चर्चा करतोय तुम्ही जरा भाषा सांभाळून बोला .

सुयोग : पुरुषोत्तम जास्ती तापू नका लगेच !

प्रकाश : नाही आज आपल्यात फेसला होऊन जाऊ दे तिथी कि तारीख चा..
( प्रकाश काहीश्या मिस्कील पणे वातावरण अधिक गंभीर करण्याचा प्रयत्न करतो .)

सुयोग : मित्रानो , चला थंड घेऊ......
( सर्व गंभीर विषयावर बोलत होते तरी काहीसे स्मितहास्य करून केदार आणि सुयोग नी एकमेकान कडे पाहत राहिले .)

प्रकाश : वा काय मनातले बोललास .चला थंडगार बिअर घेऊ १० बिअर च्या बाटल्यानची आताच सोय करतो . काय बोलतोस पुरुषोत्तम?

पुरुषोत्तम : चला माझी इच्छा पण खूप झालीये . आधीच डोकं जड झालेय थोडी जन्नत करू .

केदार : म्हणजे उद्या तुम्हांला तारीखेनुसार जयंती साजरी करायची म्हणता त्यानुसार तुम्ही आधी पिणार मग साजरी करणार . अगदी तंतोतंत इंग्रजी संस्कृती पाळतात तुम्ही लोक त्या उत्सवा वेळी हि सेलेब्रेशन असेच करा .
(केदार ला न राहून त्याने पुरुषोत्तमाला डिवचण्याचा प्रयत्न केलाच )

पुरुषोत्तम : गप रे , तुझे ज्ञान पाजळू नकोस. नाहीतर इथेच तुला पार गार करेल .
(पुरुषोत्तम हि अरेरावी करण्याचा प्रयत्नात होता , कारण केदार पुढे त्याला काय बोलावे हेच मुळात सुचत नव्हते ....)

प्रकाश : जाऊ द्या रे तो विषय ! चला थोडी घेऊ यार .....

केदार : पोकळ धमकीला मी अजिबात घाबरत नाही .
( या वादामुळे प्रकाश आणि सुयोग पार बुचकळ्यात पडले, शेवटी मित्रच ! )

प्रकाश : एक मिनिट , आपण एक काम करू आज फुल आणि फायनल चर्चा होऊनच जाऊ दे ! जो गप बसेल त्याला दुसर्याचे म्हणणे मान्य करावे लागेल कायमचे !
तिथी कि तारीख ? बोल काय बोलतोस !

सुयोग : मग तसे पहिले तर आपला केदार बिचारा एकता पडेल ! हाहाहाहा:

केदार : माझी तयारी आहे , आणि हो मी कुठे कमी पडणार नाही.. !
पुरुषोत्तम : हा हा... मग आम्ही तिघे आणि तू एकटा , पाहू किती वेळ टिकतोस ते आमच्यापुढे... हाहाहा

केदार : लेट्स सी मिस्टर पुरुषोत्तम !! मी पूर्ण तयार आहे ...

( आत्ता तर खऱ्या वादाला तोंड फुटणार होते , चर्चेतून काय निष्फळ निघतो हे पाहणे खरंच रोमांचित आहे , केदार कसा या तीन विचारांचा सामना करणार ? आणि तिथी च्या संधर्भात असलेल्या सर्व विचारांना खरंच न्याय देऊ शकेल का ?? कि संभाजी ब्रिगेडी च्या कुरापाती विचार धारा जोपासणाऱ्या पुरुषोत्तम पुढे केदारचा निभावच लागणार नाही ..... तसेच सुयोग आणि प्रकाश ची हि साथ काही प्रमाणात पुरुषोत्तम ला असल्यामुळे खरंच केदार या तिघांपुढे टिकेल ????

खरंच काय होईल ती चर्चा...... ???)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा