गुरुवार, ११ जून, २०१५

" चार मित्रांची गोष्ट " - तिथी कि तारीख ?? ( भाग -१ )





" चार मित्रांची गोष्ट "

कथेतील पात्र परिचय ---

१. पुरुषोत्तम - (वय २९ वर्षे , बेडर आणि मुळचा गर्विष्ठ स्वभाव लाभलेला , ब्रिगेडी विचारांचा पगडा असलेला युवक, आणि सुयोगच्या सख्ख्या मामाचा मुलगा, काही दिवसांपूर्वीच गावावरून मुंबई ला आलेला असतो. )

(सुयोग, केदार, आणि प्रकाश हे खरे तर अस्सल मुंबईकर मित्र, जीवाला जीव देणारे आणि लहानपणापासून एकत्र राहिलेले मित्र!)

२. सुयोग - (वय २४ वर्षे, खूप भावनिक असलेला मराठी युवक, सामंजस्य राखून वागणारा, आणि वादविवादा पासून स्वतः ला कायम दूर ठेवणारा एक सामान्य माणूस !)
३. केदार - (वय २९ वर्षे, शिवप्रभू विचारांचा धरून चालणारा एक सुसंस्कृत युवक, प्रत्येक तिथी नुसारच्या शिव उत्सवात हिरेरीने सहभागी होऊन मनी शिवाजी महाराजांविषयी आणि शिवशंभू महाराजांबद्दल नितांत श्रद्धा असलेला एक अस्सल मावळा ! )
४. प्रकाश - (वय २८ वर्षे , मनमोकळा , आरामदायक , मजेत जगणारा एक परिपूर्ण युवक )

(कथा सुरु होते मुंबई मध्ये राहणाऱ्या या तीन मित्र आणी एका मित्राच्या गावावरून आलेल्या मित्रा सोबत गच्चीवर, मे महिन्याची सुट्टी असते त्यामुळे वातावरणात एका उकाडा आणी सुट्टीचा शिथिल पणा असतो. अश्यावेळी हे तीन मित्र नेहमी प्रमाणे गच्चीवर मैफिल जमवतात. आणी इथेच सुरु होतो एका आगळ्या वेगळ्या आयुष्याला कलाटणी देणाऱ्या घटनांचा क्रमवार.)
गच्चीवर मैफिल जमली होती , सर्व जण खूप दिवसांनी एकमेकांना भेटत होते , अनेक किस्से , गमतीदार गोष्टी ऐकून सर्व जण जुन्या आठवणीत हरून गेले होते .
केदार ,सुयोग, आणि प्रकाश गच्चीवर गप्पा मारत बसलेले असतात . सोबत सुयोग च्या मामाचा मुलगा पुरुषोत्तम हि असतो .
सुयोग पुरुषोत्तमची इतर सर्वांची ओळख करून देतो. आणि सर्व जण एकमेकात बोलण्यात व्यस्त होतात.

केदार : मित्रानो ! खूप मिस केले यार तुम्हा सर्वाना ....
प्रकाश : साल्या गप तू साधा फोन पण करत नाहीस गावी गेलास तर आणि तु काय घंटा मिस केले ? हाहाहाहा:
सुयोग : बघ ना ! होहोहो
(अचानक सर्व हसायला लागले , केदार ला थोडे से हिर्मुसायला झाले . पण त्यातून हि स्वतःला सावरत त्याने पलटवार केलाच) .

केदार : अरे फोन न करण्याची कारणे खूप आहेत , पण जेव्हा केव्हा वेळ मिळायचा आणि एकटा असायचो तेव्हां सर्वात पहिले मला फक्त तुम्हीच डोळ्यापुढे उभे राहत होतात . याची पावती म्हणून माझ्याकडे माझे अंतकरण सोडले तर काहीच नाही .
सुयोग : वा ! काय रे , किती छान बोललास !
प्रकाश : अरे कुठे तरी वाचून आला असेल , आणि आपल्याला सांगतोय . हाहाहा:
केदार : किती खर सांगितले तर पटणार थोडी तुम्हाला ?? मला एवढे बोलतात मग तुम्ही कुठे गेले होतात ? ३ जण १ का जवळ का येऊ नाही शकत ?? बोला (सुयोग आणि प्रकाश गोंधळतात, पण हुशारीने प्रकाश दुसरा विषय काढतो .. )

प्रकाश : अरे सुयोग, मग तुझा प्रेम प्रकरण कुठ वर आलं !
सुयोग : काही विषय नसला कि माझ्यावर सरका बस !
केदार : पुरुषोत्तम इतके गप्प का ? अहो बोला काहीतरी ... सांगा आम्हांला तुझ्याविषयी ... आमचा हे असाच चालू राहणार .
(मधेच सुयोग चालू होतो).

सुयोग : अरे हा, पुरुषोत्तम सुद्धा शिवकार्य करतात. गावामध्ये मधे खूप जाम चालते याच्या ग्रुप ची. खूप मोठे नाव आहे त्यांच्या इथे !
प्रकाश : वा क्या बात हे| पुरुषोत्तम साहेब !
केदार : खूपच भारी !
सुयोग : पुरुषोत्तम , आम्हांला सर्वाना हि शिवकार्याची खूप आवड आहे . हा पण आमचे विचार थोडे वेगळे आहेत .
(इतका वेळ शांततेने ऐकत असलेला पुरुषोत्तम बोलू लागतो ....)

पुरुषोत्तम : वेगळे म्हणजे ??
प्रकाश : वेगळे म्हणजे असा वेगळा असा काही नाही . पण प्रत्येक जणांचा स्वतंत्र विचार आहे .
पुरुषोत्तम : ( थोड्याश्या गोंधळलेल्या अवस्थेत ) म्हणजे मला कळले नाही .
सुयोग : अरे, हा आमचा केदार आहे ना हा तिथी ला प्राधान्य देऊन सर्व शिव उत्सव तिथी नुसारच करतो , आमचा प्रकाश तारीखेनुसार आणि मला बघशील तर तिथी आणि तारीख दोन्ही सारख्याच आहेत माझ्यासाठी, पण मला तशी तारीखच जरा जास्त योग्य वाटते !
पुरुषोत्तम : अरे एवढे जवळचे मित्र आणि इतके वेगळे विचार !
केदार : असे काही नाही .
प्रकाश : ह्म्म्म , या तिथी प्रकरणाला आमचा केदार यानेच आमच्यात फाटे फोडलेत, तरी बोलत होतो आक्खे जग तारीखेनुसार चालते आणि हे तिथी काढत बसतात (एकटा केदार सोडून सर्व हसायला लागतात )
प्रकाश : पुरुषोत्तम तुमचे काय मत आहे ? ( पुरुषोत्तम ला संबोधून)
पुरुषोत्तम : कश्याबद्दल ?
प्रकाश : म्हणजे तुम्ही हि शिवकार्य करता म्हणजे तुम्ही तारीख कि तिथी मानता ?
पुरुषोत्तम : नक्कीच तारीख च योग्य आहे .
(प्रकाश ला खूप बरे वाटले आणि खूप आनंदी होतो...)

पुरुषोत्तम : सध्या हिंदुस्थानच्या सर्व सरकारी, नीम सरकारी, नागरी, आर्थिक, शैक्षणिक कारभार इंग्रजी कालगणनेनुसार चालतो.
प्रकाश : एकदम बरोबर बोललास पुरुषोत्तम !
सुयोग : हम्म्म .. !
पुरुषोत्तम : जगाच्या पाठीवर पंचाग मानणारे प्रदेश किंवा देश किती आहेत ?

केदार : महाराष्ट्र सरकारने १९ फेब्रुवारी ही तारीख सरकारी सुटी व शिवजयंती उत्सवासाठी घोषित केली; पण हे करतानादेखील राजकारणच आडवे आले. कारण मेहंदळेंनी शिवरायांची जयंती ही भारतीय कालगणनेनुसारच साजरी करावी, असे सुचवले होते; पण संभाजी ब्रिगेडने महाराजांची जयंती ही तारखेनुसारच साजरी करावी, असा अट्टाहास धरला. त्यामुळे तत्कालीन आघाडी सरकारने जातिवादाचे राजकारण करून शिवजयंती साजरी करण्यास संभाजी ब्रिगेडला अनुकूलता दर्शवली अन् तेव्हापासून म्हणजे १९९९ पासून शासकीय शिवजयंती ही १९ फेब्रुवारीलाच साजरी केली जाऊ लागली.
(केदार चे तडफदार बोलणे ऐकून पुरुषोत्तम त्याच्याकडे पाहताच राहिले , त्याच्या चेहऱ्यावरून संभाजी ब्रिगेड चा राग साफ दिसत होता.)

प्रकाश : तरी पण तारीख महाराजांना खरे ग्लोबल बनवेल असे नाही वाटत का तुला केदार ?
पुरुषोत्तम : शिवरायांनी 350 पेक्षा जास्त किल्ले बांधले , आरमार उभे केले परंतु केव्हांही पंचाग पाहिले नाही किंवा सत्यनारायण केला नाही.



केदार : ?????????????????????????????????????
(केदार काय उत्तर देतो? पुढील भागात नक्की वाचा)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा