छत्रपती शिवराय ! लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
छत्रपती शिवराय ! लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

शुक्रवार, २२ एप्रिल, २०१६

‪#‎श्री_शिव_छत्रपती_पुण्यतिथी‬

‪#‎चैत्र_शुद्ध_पौर्णिमा‬ 



डोईवरचे छत्र काढुनी,
का निराधार करुनी गेलात??
पितृत्वाचा हात काढुनी,
का अनाथ आम्हा करुनी गेलात
राजे………का आम्हास सोडूनी गेलात??
"हिंदुस्थानचे छत्रपती शिवाजी महाराज" यांच्या पुण्यतिथी निमित्त त्यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन……__/\__





ज्या स्थळी परम प्रतापी छत्रपती शिवाजी महाराज समाधिस्थ झाले, ते समाधीचे स्थान जगदीश्वर देवळाच्या पूर्वेस आहे. समाधी अष्टपैलू असून चिरेबंदी आहे. समाधी उद्ध्वस्त अवस्थेत होती. कुणी लोभी दुष्टाने द्रव्यलाभाच्या आशेने तिचे धोंडे उखळलेले होते. ती दुरुस्त करण्याचे काम इ.स. १८८५ सालापासून समाधीच्या किरकोळ दुरुस्ती करितां सरकारांतून ५ रुपये मंजूर झाले होते. लोकमान्य टिळकांनी शिवस्मारकाबद्दल जनजागृती केली. श्री नानासाहेब देशमुख यांनी पुढाकार घेऊन सरकारशी पत्र व्यवहार केला. चार वर्षे हे स्मारक प्रकरण सरकारांत शिजून सन १९२५ साली सरकारी ठराव नं. ७०२३ ता. ६/२/१९२५ अन्वये स्मारकाचे काम पूर्ण करण्यास सरकारची संमती मिळाली.
एक सरकारी अॉफिसर व श्री. न. चिं. केळकर हे दोघे समक्ष गडावर छत्रीचा नकाशा व अंदाजपत्रक करुन गेले.अंदाजे खर्च १९००० रु. ठरवून त्याची विभागणी अशी केली. १२००० हजार रु स्मारक कमिटीने द्यावे ५००० रु. मुंबई सरकारने द्यावे व २००० रु, पुराणवस्तुसंशोधन खात्याने द्यावे. बांधकामास अॉक्टोबर १९२५ मध्ये सुरुवात झाली. पाया खोदण्याचे काम चालू असता १२ फूट खोलीवर पहार अडूं लागली. म्हणून तिथला भाग काळजीपूर्वक मोकळा करण्यात आला. तेव्हां आंत घनाकृती बांधकाम आढळले. त्याच्या दोन बाजूनी कमानी असून वर मोठी शिळा होती. शिळा उखळतांच आंत श्रीशिवरायांच्या देहाची पवित्र रक्षा अतिशय काळजीपूर्वक ठेवलेली आढळून आली. छत्री मूळच्या अष्टकोनी चौथर्यावरच उभारली असून तिच्यावर अर्धगोलाकार घुमट बसविला आहे. छत्रीच्या गाभाऱ्यांत ब्राँझ धातूचा प्रतिमाफलक पश्चिमाभिमुख बसविला आहे. छत्रीचे बांधकाम १९२७ साली संपविले.
मुळच्या अष्टकोनी चौथर्यावरच त्याहून लहान दुसरा एक अष्टकोनी चौथरा बांधण्यात आला आहे. चौथर्यावर जाळीदार कठडे बसविलेले आहेत. चारही बाजूला वर समाधीजवळ जाण्यासाठी वाटा ठेवल्या आहेत. या चौथर्याच्या मध्यभागी सुबक अष्टकोनी छत्री उभारलेली आहे, आठही बाजूंना आठ प्रवेशद्वार आहेत. मधल्या लहान चौथर्यावर छत्रपतींची अष्टधातूंची उठावदार उर्ध्वाकृती प्रतिमा बसविली आहे.
चैत्र शुध्द पौर्णिमा राजाभिषेक शके ६ सातवाहन शके १६०२ ख्रिस्ताब्ध ३ एप्रिल १६८० हनुमान जयंती या विश्वातील एका बलाढ्य शक्तिच्या जन्मदिवशी विश्वातील दुसरी एक बलाढ्य शक्ति एकरुप झाली. शिवराय निजधामी गेले. श्रीजगदीश्वर मंदिराच्या समोर पूर्वदिशेस शिवरायांच्या पार्थिव देहावर अंत्यसंस्कार युवराज राजारामराजे यांजकडून करविले. अष्टकोनी मुद्रा अष्टप्रधानमंडळ अष्टराज्ञी असणाऱ्या शिवरायांची स्मारक छत्री अष्टकोनी असावी हा एक सुंदर योगायोग एका शिवाचे दुसऱ्या शिवासमोर असलेले हे स्मृतिमंदिर या स्मारकाबद्दल कोणास कोणतीही शंका नसावी.
संदर्भ :
रायगड दर्शन दुर्मिळ पुस्तकांतून
किल्ले रायगड स्थळदर्शन
#प्रौढप्रताप_पुरंदर_क्षत्रियकुलावतंस_सिंहासनाधिश्वर_राजाधिराज_महाराज_श्री_श्री_श्री_श्रीमंत_छत्रपती_शिवाजी_महाराज ....
सकल त्रिलोकाचे पालनकर्ते,तारणहारराजमान्य राजश्री,अखंड लक्ष्मीअलंकृत,महापराक्रमी,महाप्रतापीमहाराजाधिराज,
श्रीमंत छत्रपती शिवाजी राजेमहाराज हे सर्व त्रिलोकाला पोरके करून अनंतातविलीन झाले..


गुरुवार, ८ ऑक्टोबर, २०१५

आमचे "दैवत" श्री छत्रपती शिवराय !




रायगडाची मेघडंबरी म्हणजे शिवराय...
भगवा झुलतो अंबरी म्हणजे शिवराय...

तानाजींच्या मनातला विश्वास म्हणजे शिवराय....
मदारींच्या त्यागातला ठराव म्हणजे शिवराय.....

जिवाजींच्या दांडपट्ट्याचा वार म्हणजे शिवराय....
शिवा काशीदांची आत्माहुती म्हणजे शिवराय....

बाजीप्रभूंच्या तलवारीतली आग म्हणजे शिवराय....
रयतेसाठी झालेली जीवाची तगमग म्हणजे शिवराय....

वतनदारीला घातलेला पायबंद म्हणजे शिवराय....
रांझ्याच्या पाटलाचा "चौरंगा" करण्याचा आदेश म्हणजे शिवराय....

३२ मनाच्या सिंहासनाचे धारक म्हणजे शिवराय....
जिजाऊ साहेबांच्या जीवनाचे सार्थक म्हणजे शिवराय...

एकच आवाज!! एकच पर्याय !!
जय जिजाऊ !! जय शिवराय !!

सोमवार, १४ सप्टेंबर, २०१५

माहिती स्वराज्याची !

 स्वराज्यासाठी बलिदान दिलेल्या थोरांची समाधीस्थळे 

१) लखुजी जाधवराव (जिजाबार्इंचे वडील) -सिंदखेड राजा

२) मालोजीराजे (शिवरायांचे आजोबा) - इंदापूर, जि. पुणे

३) विठोजीराजे (शिवरायांचे चुलते) - भातवडी

४) शहाजीराजे - होदिगेरे, ता. कनकगिरी, जि.दावनगेरे (कर्नाटक)

५) जिजाबाई - पाचाड (रायगडाच्या पायथ्याला)

६) छत्रपती शिवाजी महाराज - रायगडावर

७) सईबाई (शिवरायांच्या पत्नी) - राजगड

८) पुतळाबाई व सोयराबाई (शिवरायांच्या पत्नी) - रायगड

९) संभाजीराजे (शिवरायांचे थोरले बंधू) - कनकगिरी, ता. गंगावटी, जि. कोप्पल

१०) छत्रपती संभाजी (शिवरायांचे थोरले
पुत्र) - वडू कोरेगाव

११) सखुबाई (शिवरायांच्या कन्या) माळशिरस, जि. सोलापूर

१२) सूर्यराव काकडे (शिवरायांचे जवळचे मित्र) -साल्हेरच्या किल्ल्याजवळ.

१३) रामचंद्रपंत अमात्य(अष्टप्रधान मंडळातील मंत्री) - पन्हाळगडाच्या पायथ्याशी

१४) मकूबाई (शिवरायांच्या भावजयी) - जिती,
ता. करमाळा, जि. सोलापूर

१५) शिवरायांचे सेनापती नेताजी पालकर - तामसा, ता. हदगाव, जि. नांदेड

१६) प्रतापराव गुजर - नेसरी, ता. गडहिंग्लज, जि. कोल्हापूर हंबिरराव मोहिते- तळबीड, ता. कराड

१७) धनाजी जाधव - वडगाव (कोल्हापूरजवळ)

१८) रामाजी पांगेरा - कन्हेरगड, ता. दिंडोरी, जि. नाशिक

१९) बाजी पासळकर आणि गोदाजी जगताप - (गाधवड, जि. पुणे)

२०) तानाजी मालुसरे आणि शेलारमामा - उमरळ

२१) रायबा (तानाजीचा मुलगा) - पारगड

२२) बहिर्जी नाईक - भूपाळगड मौजे बाणूर, ता. आटपाटी, जि. सांगली

२३) हिरोजी फर्जंद आणि शिवरायांचे सावत्र भाऊ - परळी (रायगडाजवळ)

२४) शिवा काशिद - पन्हाळगड

२५) कान्होजी जेधे आणि जिवा महाले - कारी अंकवडे, ता. भोर, जि. पुणे

२६) मुरारबाजी देशपांडे -पुरंदर

२७) संभाजी कावजी - कोंडावळे, ता. मुळशी, जि. पुणे

२८) फिरंगोजी नरसाळ -  संग्रामदुर्ग (चाकण) पुणे

२९) सिदोजी निंबाळकर - पट्टागड (संगमनेर)

३०) बाजी प्रभू व फुलाजी प्रभू - विशाळगड

३१) दत्ताजी जाधव (शिवरायांचे मामा बहादुरजीचे नातू) - निलंगा येथे १६६५ साली. समाधीस्थळ सापडत नाही.

३२) जानोजी भोसले नागपूरकर - मु.पो. येडोळा, ता. तुळजापूर

३३) जानोजी निंबाळकर (तुळजाभवानी देवीचा दरवाजा यांच्याच नावाने आहे) - बीड

३४) जगदेवराव जाधवराव (जिजाबार्इंचा भाऊ बहादुरजीचा नातू व देऊळगावराजाचा कर्ता) -  ब्रह्मपुरी, ता. मंगळवेढा, जि. सोलापूर

३५) नागोजी माने (म्हसवडकर) - सिंदखेडराजा

३६) हिंमतबहाद्दर उदाजी चव्हाण - अणदूर, ता. तुळजापूर जि.उस्मानाबाद

३७) अन्नूबाई (पहिल्या बाजीरावांच्या बहीण ) - मु.पो. तुळजापूर, जि. उस्मानाबाद

आज महाराष्ट्रातील ब-याच समाध्या जीर्ण अवस्थेत आहेत. काही ठिकाणी समाधी अस्तित्वातच नाहीत आणि ज्या आहेत त्याच्याकडे समाजाचे पूर्णपणे दुर्लक्ष आहे.अशी थोरामोठ्यांची समाधीस्थळे पुढील पिढीला प्रेरणा असतात. सर्वांत सुंदर समाधीस्थळ शहाजीराजांचे आहे. आपल्यापेक्षा कर्नाटकातील लोकांना हे लवकर समजावे हे विशेष आहे.
@ स्वराज्य #

छत्रपती शिवाजी राजे भोसले.
कालखंड :- १६४२–१६८०.
पूर्ण नाव :- शिवाजी शहाजी भोसले.
कुळ :- क्षत्रियकुलावंत, कुल्वादी भूषण
जन्म :- १९ फेब्रुवारी १६३०
जन्म ठिकाण :- शिवनेरी गड, ता. जुन्नर. जिल्हा - पुणे, महाराष्ट्र, भारत.
मृत्यू :- ३ एप्रिल १६८०,मंगळवार.
मृत्यू ठिकाण :- रायगड.

महाराजांच्या धर्मपत्नी-
१. सई बाई (निंबाळकर)
२. सोयराबाई (मोहिते)
३. पुतळाबाई (पालकर)
४. लक्ष्मीबाई (विचारे)
५. काशीबाई (जाधव)
६. सगुणाबाई (शिर्के)
७. गुनवातीबाई (ईन्गले)
८. सकवारबाई (गायकवाड)

मुले - संभाजी, राजाराम,
मुली - सखुबाई निंबाळकर, राणूबाई जाधव, अंबिकाबाई महाडिक, दिपाबाई, राजकुंवरबाई शिर्के, कमलबाई पालकर

फितुर जन्मले ईथे हि जरी या मातीची खंत आहे तरी संभाजी राजे अजुन मराठ्यांच्या छातीत जिवंत आहे.
मुंडके उडवले तरी चालेल
पण मान कुणापुढे वाकणार नाही l
डोळे काढले तरी चालेल
पण नजर कुणापुढे झुकणार नाही l
जीभ कापली तरी चालेल
पण प्राणाची भिक मागणार नाही l
हात कापले तरी चालेल
पण हात कुणापुढे जोडणार नाही l
पाय तोडले तरी चालेल
पण आधार कुणाचा घेणार नाही l
गर्व नाही माज आहे या मातीला
मर्द मराठा म्हणतात या जातीला l
" मरण आले तरी चालेल,
पण शरण जाणार नाही.
प्राण गेला तरी चालेल,
पण स्वधर्म धर्म सोडणार नाही. "

ll जय जिजाऊ ll
ll जय शिवराय ll

शिवाजी महाराजांचे निधन झाले हि बातमी औरंगजेबाच्या खाजगी सचिवास समजली. हि बातमी अत्यंत आनंदाची आहे, असे समजून सचिव बादशहाच्या वैयक्तिय अभ्यासिकेत सांगण्यासाठी गेला. ही बातमी ऐकून औरंगजेब बादशहाने हातातील कुराण बंद करून बाजूला ठेवले. तख्तावरून उठला. त्याने सचिवास आनंद व्यक्त केल्याबद्दल सजा दिली. व नमाजाची पोझिशन घेऊन त्याने दोन्ही हात पसरून आभाळाकडे अल्लाची प्रार्थना करण्यासाठी उंचावले औरंगाजेबाने प्रार्थना केली. तिचा मराठी अनुवाद -"हे देवा माझे साचलेले पुण्य तुझ्या दरबारी आहे. ते खर्ची घालून माझ्या प्रार्थनेचा स्विकार कर. आमच्या हिँदूस्थानातील महान मानवतावादी व सर्वधर्म जातीतील स्त्रियांचा रक्षणकर्ता छत्रपती शिवाजीचा मृत्यू झाला आहे.कृपया त्यांच्या आगमनासाठी तुझ्या स्वर्गाची सताड उघडी देवा - संदर्भ -अहेकामे आलमगिरी.

शत्रूंनी सुधा ज्यांचा गुणांचे पोवाडे गायले असे एकच राजे छत्रपती शिवाजी माझे !
छत्रपती शिवाजी महाराज की  जय!!

माझ्याही शिवबांच एक राज्य होत,
जगाहून सुंदर अस ते स्वराज्य होत ll
सुख शांती समाधान नांदत जिथे,
अस ते एक बहूजन स्वराज्य होत ll
जाती धर्म पंथाचा भेदभाव नव्हता,
न्याय हा सर्वांसाठी एक समान होता ll
न्यायासाठी प्राण गेला तरी चालेल,
पण अन्याय कुणावर झाला नव्हता ll
राज्यांचा राज्य कारभार असा होता,
गवताची कडी सुद्धा गहाण नव्हती ll
स्वतःसाठी सारेच जगतात या जगी,
रयतेसाठी जगणारे शिवराय होते ll
स्वराज्यासाठी अर्पीले प्राण ज्यांनी,
अवघा महाराष्ट्र घडविला हो त्यांनी ll
कितीही गुणगान केले तरी कमीच,
असे अमुचे छत्रपती शिवराय होते ll👏

आपल्याला माहित असणे आवशक आहे..........की ,आपल्या जिल्ह्यात किती किल्ले आहेत,महाराष्ट्रातील जिल्हावार किल्ले:

अहमदनगर जिल्हा
1. अहमदनगरचाभुईकोट किल्ला
2. पेडगावचा बहादूरगड
3. रतनगड

औरंगाबाद जिल्हा
1. देवगिरी-दौलताबाद.

कुलाबा जिल्हा  (रायगड जिल्हा)
1. अवचितगड
2. उंदेरी
3. कर्नाळा
4. कुलाबा
5. कोथळीगड (पेठचा किल्ला)
6. कोरलई
7. कौला किल्ला॑
8. खांदेरी
9. घोसाळगड
10. चंदेरी
11. तळेगड
12. तुंगी
13. धक
14. पेब
15. प्रबळगड
16. बिरवाडी
17. भिवगड
18. मंगळगड-कांगोरी
19. मलंगगड
20. माणिकगड
21. माणगाव
22. रतनगड
23. रायगड
24. लिंगाणा
25. विशाळगड
26. विश्रामगड
27. सांकशी
28. सागरगड
29. सुरगड
30. सोनगिरी
31. मुरुड जंजिरा

कोल्हापूर जिल्हा
1. पन्हाळा
2. पावनगड
3. बावडा
4. भूधरगड
5. रांगणा
6. सामानगड

गोंदिया जिल्हा
1. गोंदियाचा प्रतापगड

चंद्रपूर जिल्हा
1. किल्ले चंद्रपूर
2. बल्लारशा

जळगाव जिल्हा
1. अंमळनेरचा किल्ला
2. कन्हेरगड
3. पारोळयाचा किल्ला
4. बहादरपूर किल्ला

ठाणे जिल्हा
1. अर्नाळा
2. अशीरगड
3. असावगड
4. अलिबाग
5. इंद्रगड
6. उंबरगांव
7. कल्याणचा किल्ला
8. कामनदुर्ग
9. काळदुर्ग
10. केळवे-माहीम
11. कोंजकिल्ला
12.गंभीरगड
13. गुमतारा
14. गोरखगड
15. जीवधन
16. टकमक
17. ठाणे किल्ला
18. डहाणू
19. तांदुळवाडी किल्ला
20. तारापूर
21. धारावी
22. दातिवरे
23. दिंडू
24. नळदुर्ग
25. पारसिक
26. बल्लाळगड
27. बळवंतगड
28. बेलापूर
29. भवनगड
30. भैरवगड
31. भोपटगड
32. मानोर
33. माहुली
34. व्ररसोवा
35. वसईचा किल्ला
36. शिरगांवचा किल्ला
37. संजान
38. सिद्धगड
39. सेगवाह

नागपूर जिल्हा
1. आमनेरचा किल्ला
2. उमरेडचा किल्ला
3. गोंड राजाचा किल्ला
4. नगरधन(रामटेक) (भुईकोट किल्ला)
5. भिवगड
6. सिताबर्डीचा किल्ला

नाशिक जिल्हा
1. अंकाई
2. अचलगड
3. अंजनेरी
4. अलंग
5. अहिवंत
6. इंद्राई
7. कंक्राळा
8. कंचना
9. कन्हेरा
10. कर्हेगड
11. कावनई
12. कुलंग
13. कोळधेर
14. गाळणा
15. घारगड
16. चांदोर
17. जवळ्या
18. टंकाई
19. त्रिंगलवाडी
20. त्रिंबक
21. धैर
22. धोडप
23. पट्टा
24. बहुळा
25. ब्रह्मगिरी
26. भास्करगड
27. मार्किंडा
28. मुल्हेर
29. रवळ्या
30. राजधेर
31. रामसेज
32. वाघेरा
33. वितानगड
34. हर्षगड
35. हातगड

पुणे जिल्हा
1. कुवारी
2. चाकण
3. चावंड
4. जीवधन
5. तिकोना
6. तुंग
7. नारायणगड
8. पुरंदर
9. प्रचंडगड (तोरणा)
10. मल्हारगड
11. राजगड
12. राजमाची
13. विचित्रगड
14. विसापूर
15. लोहगड
16. शिवनेरी
17. सिंहगड
18. हडसर

रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्हे
1. अंजनवेल
2. आंबोळगड
3. आवर किल्ला
4. कनकदुर्ग
5. कुडाळचा किल्ला
6. कोट कामते
7. खारेपाटण
8. गोवळकोट
9. गोवा
10. जयगड
11. दुर्ग रत्नागिरी
12. देवगड
13. नांदोशी
14. निवती
15.पालगड
16. पूर्णगड
17. प्रचितगड
18. फत्तेगड
19. बाणकोट
20. बांदे
21. भगवंतगड
22. भरतगड
23.भवनगड
24. भैरवगड
25. मंडणगड
26.मनसंतोषगड
27. मनोहरगड
28. महादेवगड
29. महिपतगड
30. यशवंतगड
31. रसाळगड
32. राजापूरचा किल्ला
33. रायगड
34. विजयगड
35. विजयदुर्ग-घेरिया
36. वेताळगड
37. सर्जेकोट
38. साठवली
39. सावंतवाडीचा किल्ला
40. सिंधुदुर्ग
41. सुमारगड
42. सुवर्णदुर्ग

सांगली जिल्हा
1. तेरदाळ
2. दोदवाड
3. मंगळवेढे
4. शिरहट्टी
5. श्रीमंतगड
6. सांगली
7. येलवट्टी

सातारा जिल्हा
1. अजिंक्यतारा
2. कमालगड
3. कल्याणगड
4. केंजळगड
5. चंदन
6. जंगली जयगड
7. गुणवंतगड
8. प्रचितगड
9. प्रतापगड
10. पांडवगड
11. बहिरवगड
12. भूषणगड
13. भोपाळगड
14. मकरंदगड
15. मच्छिंद्रगड
16. महिमंडणगड
17. महिमानगड
18. सज्जनगड
19. संतोषगड
20. सदाशिवगड
21. सुंदरगड
22. वर्धनगड
23. वंदन
24. वसंतगड
25.वारुगड
26. वैराटगड

रविवार, ३० ऑगस्ट, २०१५

शिवस्वा हेच सर्वस्वा !



शिव चरित्र पारायण सोहळा (बदलापूर)











संकट हरण्या
दूर करण्या
आदिलशाहीच्या अंधाराला
शिवनेरीवर सूर्य उगवला
[घेतली] बालसवंगडी जमवुनी सारे शपथ स्वराज्याची
एकमुखाने गाऊ चला रे कीर्ती शिवबाची

संगे मावळ्या
वयी कोवळ्या
प्रचंडगडावर केली स्वारी
विजयाची दुमदुमली तुतारी
साक्ष देई या इतिहासाची ती बुधला माची
एकमुखाने गाऊ चला रे कीर्ती शिवबाची

होऊनि मदमस्त
करि उध्वस्त
घरे मंदिरे अन् अभिमान
चालून आला अफझलखान
बलदंड खानावर भारी पडली युक्ती राजांची
एकमुखाने गाऊ चला रे कीर्ती शिवबाची

स्वराज्य श्रींचे
स्वरक्ताचे
वाचवण्या हा किल्ले पुरंदर
लढले-पडले वीर धुरंधर
हत्ती नि तोफांशी लढली भाला नि बरची
एकमुखाने गाऊ चला रे कीर्ती शिवबाची

देवू न कोणा
हा कोण्डाना
जिद्दीने या पेटून उठला
टक्कर देण्या उदेभानला
पराक्रमाची शर्थ करुनी लढला तानाजी
एकमुखाने गाऊ चला रे कीर्ती शिवबाची

आई जिजाऊ
अन् तुळजाऊ 
वात्सल्याचा स्रोत महान
शिवरायांचे स्फूर्तीस्थान
सहिष्णुता, स्वाभिमान समता शिकवण ही उंची
शिवबासंगे गाऊ चला रे कीर्ती जिजाऊंची …. कीर्ती जिजाऊंची !




छत्रपती शिवाजी महाराजांचे ध्वनी स्वरूपातील (राजा शिवछत्रपतीलेखक श्री बाबासाहेब पुरंदरे , पारायण गीता उपासनी , भाग -२२,२३,२४,२५,२६,२७,२८,२९) चरित्र पारायण बदलापूर येथे सुफळ संपन्न झाले. त्यांनतर अर्थातच श्रावण महिना असल्याने आणि सोबत जिवाभावाची मित्र मंडळी असली कि बेत हि पटकन ठरतात . तसा पहिला तर अंबरनाथ येथील प्राचीन शिव मंदिरयाची देही याची डोळापाहण्याचे भरपूर दिवसापासून सर्वांच्याच मनात होते . आज श्री शिव चरित्रपारायणामुळे व्यस्त जीवनातून ती दुर्मिळ संधी साधता आली . बदलापूर रेल्वे स्थानकात्तून आम्ही त्या पुढील अंबरनाथ स्थानक गाठले . तेथून रिक्षा करून आम्ही अतिप्राचीन अश्या सांस्कृतिक वारसा असलेल्या दैदीप्यमान शिल्पवैभवाच्या साक्षात दर्शनाला शिव मंदिराच्यापरिसरात दाखल झालो. ज्यांनी येथे येऊन खास हे आरसपानी सौंदर्य बघितले असतील ते नक्कीच हरखुन गेले असणार. खडकात भव्य प्राकार खोदून त्याच्यामध्ये हे मंदिर उभारले आहे. मला तर लांबुन पाहिले असता जगन्नाथाच्या डौलदार रथ उभा असल्यासारखे वाटले. तेथे असलेल्या छोट्या पुलावरून प्रांगणात आल्यावर मंदिरावर केलेले शिल्पकांम पाहुन थक्क व्हायला होते. पायापासुन शिखरापर्यंत हे मंदिर अगदी नखशिखांत आरसपानी सौंदर्याने नटलेले आहे. प्रवेशद्वारातुन आत जाताना दोन नंदी दिसतात. मंदिराचा गाभारा एखाद्या खोल विहिरीसारखा असुन खाली उतरायला पायर्याे आहेत. गाभार्याात शिरताच कमालीचा थंडावा जाणवतो. गाभार्यारत दोन शिवलिंग आहेत (कदाचित यामुळेच प्रवेशद्वारावर दोन नंदी असावेत). तेथे उभे राहुन वर पाहिले असता शिखराच्या बोगद्यातुन निळ्या आकाशाचे दर्शन होते. शिखराला जाळी लावलेली आहे. विविध पौराणिक कथा, नृत्यात मग्न असलेली शिल्पे, हातात आयुधे घेतलेली शिल्पं, विविध देवी-देवतांची शिल्पं याच्या चेहर्याकवरील भाव ठळकपणे दिसुन येतात.मंदिराच्या बाहेरून तुम्ही फोटो काढु शकता पण आतल्या बाजुने फोटो काढण्यास मनाई आहे..... 

शिवमंदिराचा इतिहास -
हाजीमलंग डोंगराच्या पायथ्याशी उगम पावणा-या वालधुनीनदीने उल्हासनगर व अंबरनाथ शहरांना विभागले आह़े याच नदीच्या तीरावर प्राचीन शिल्पकलेचा उत्कृष्ट नमुना असलेल्या अंबरनाथच्या शिवमंदिराचा ९५५ वा वर्धापन दिन सोमवारी साजरा करण्यात आला. शिलाहार राजघराण्याच्या काळात श्रावण शुद्ध नवमीला या शिवमंदिराचे बांधकाम पूर्ण झाले. त्यामुळे हा दिवस या मंदिराचा वर्धापन दिन म्हणून साजरा केला जातो. कोकण प्रांतात आढळणा-या काळ्या दगडांत ते कोरण्यात आले आह़े या मंदिराच्या बाह्य व आंतरभागांवर देवादिकांच्या मूर्ती कोरण्यात आल्यामुळे मंदिर आकर्षक वाटत़े या शिवमंदिरातील गाभा-यांत स्वयंभू शिवलिंग आह़े या गाभा-यांत जाण्यासाठी २० पाय-या खाली उतरावे लागत़े. या शिवलिंगाला अंबरेश्वरम्हणूनही ओळखले जात़े याच मंदिराच्या नावावरून शहराला अंबरनाथ हे नाव पडले आह़े या मंदिराच्या परिसरात महाशिवरात्रीला मोठी जत्रा भरत़े महाशिवरात्रीच्या काळात दर्शनासाठी भल्या मोठय़ा रांगा लागतात़ ठाणे, रायगड, पुणे भागातून लाखो भाविक स्वयंभू शिवपिंडीच्या दर्शनासाठी गर्दी करतात़ ही जत्रा तीन दिवस चालत़े.

अख्यायिका -
पांडवांनी एक मोठा दगड कोरून एका रात्रीत हे मंदिर बांधले असल्याची अख्यायिका आहे. या मंदिर परिसरातील एका गुंफेतून मंदिर बांधून पूर्ण झाल्यावर पांडव या ठिकाणाहून निघून गेले.हे मंदिर सर्वांत जुनं व ऐतिहासिक मंदिर म्हणून ओळखल जात. अंबरनाथचे शिवमंदीर हे संपूर्ण भारतवर्षातील पहिले भूमिज मंदीर जे अत्यंत कलात्मक आहे. शिल्पवैभवाची साक्ष देत वर्षानुवर्षे उन-पाऊस आणि काळाचा आघात सहन करत असलेले स्थापत्यशास्त्राचे एक उत्कृष्ट उदाहरण म्हणजे "अंबरनाथचे शिवमंदिर".


शुक्रवार, १० जुलै, २०१५

शिवरायांचा पाळणा




शिवरायांचा पाळणा


गुणी बाळ असा जागसि का रे वांया | नीज रे नीज शिवराया
अपरात्री प्रहर लोटला बाई | तरि डोळा लागत नाही ||

हा चालतसे चाळा एकच असला | तिळ उसंत नाही जिवाला ||
निजयावयाचा हरला सर्व उपाय | जागाच तरी शिवराय ||

चालेल जागता चटका
हा असाच घटका घटका
कुरवाळा किंवा हटका

का कष्टविसी तुझी सांवळी काया | नीज रे नीज शिवराया ||||
ही शांत निजे बारा मावळ थेट | शिवनेरी जुन्नर पेठ ||
त्या निजल्या ना तशाच घाटाखाली | कोकणच्या चवदा ताली ||
ये भिववाया बागुल तो बघ बाळा | किति बाई काळा काळा ||

इकडे हे सिद्दीजवान
तो तिकडे अफझुलखान
पलिकडे मुलूख मैदान

हे आले रे तुला बाळ धराया | नीज रे नीज शिवराया || ||

- राम गणेश गडकरी गोविंदाग्रज

स्वराज्यासाठी बलिदान दिलेल्या थोर दिव्यं माणसांची समाधीस्थळे



  १ ) जिजाबाई – पाचाड(रायगडाच्या पायथ्याला)                                                                                             २ ) छत्रपती शिवाजी महाराज – रायगडावर





३ ) लखुजी जाधवराव (जिजाबार्इंचे वडील)-सिंदखेड राजा

४ ) मालोजीराजे (शिवरायांचे आजोबा)- इंदापूर,जि. पुणे
५ ) विठोजीराजे (शिवरायांचे चुलते)- भातवडी
६ ) शहाजीराजे होदिगेरे, ता. कनकगिरी, जि.दावनगेरे (कर्नाटक)
७) सईबाई (शिवरायांच्यापत्नी) राजगड पायथा पाली
८) पुतळाबाई व सोयराबाई(शिवरायांच्या पत्नी) रायगड
९) संभाजीराजे (शिवरायांचे थोरले बंधू)कनकगिरी, ता. गंगावटी, जि. कोप्पल
१०) छत्रपती संभाजी (शिवरायांचे थोरलेपुत्र)- वढू कोरेगाव
११) सखुबाई (शिवरायांच्या कन्या)माळशिरस, जि. सोलापूर
१२) सूर्यराव काकडे (शिवरायांचे जवळचेमित्र)- साल्हेरच्या किल्ल्याजवळ.
१३) रामचंद्रपंत अमात्य(अष्टप्रधानमंडळातील मंत्री)-पन्हाळगडाच्या पायथ्याशी
१४) मकूबाई (शिवरायांच्या भावजयी) जिती,ता.करमाळा, जि. सोलापूर
१५) शिवरायांचे सेनापतीनेताजी पालकर- तामसा, ता. हदगाव, जि. नांदेडप्रतापराव गुजर नेसरी, ता. गडहिंग्लज,जि. कोल्हापूर हंबिरराव मोहिते- तळबीड, ता.कराड
१६) धनाजी जाधव वडगाव (कोल्हापूरजवळ)
१७) रामाजी पांगेरा कन्हेरगड, ता. दिंडोरी, जि.नाशिक
१८) बाजी पासळकर आणि गोदाजी जगताप(सासवड, जि. पुणे)
१९) तानाजी मालुसरे आणिशेलारमामा -उमरठ
२०‹) रायबा (तानाजीचा मुलगा)- पारगड
२१) बहिर्जी नाईक भूपाळगड मौजे बाणूर, ता.आटपाटी, जि. सांगली
२२) हिरोजी फर्जंद आणि शिवरायांचे सावत्रभाऊ परळी (रायगडाजवळ)
२३) शिवा काशिद पन्हाळगड
२४) कान्होजी जेधे आणि जिवा महा-कारी अंबवडे, ता. भोर, जि. पुणे
२५) मुरारबाजी देशपांडे -पुरंदर
२६) संभाजी कावजी कोंडावळे, ता. मुळशी, जि.पुणे
२७) फिरंगोजी नरसाळा- संग्रामदुर्ग .(चाकण)पुणे
२८) सिदोजी निंबाळकर पट्टागड (संगमनेर)
२९) बाजी प्रभू व फुलाजी प्रभू विशाळगड






रविवार, २१ जून, २०१५

हिंदवी स्वराज्य संस्थापक श्री  छत्रपति शिवाजी महाराज ह्यांचा ३४२ वा राजाभिषेक सोहळा जेष्ठ शुद्ध त्रयोदशी रोजी किल्ले रायगड वर जल्लोष व उत्साह मध्ये पार पडला. ...



शिवजयंती उत्सव , किल्ले शिवनेरी !

शिवनेरीची तोफ कडाडली .....
वार्‍याची कोवळी झुळूक दर्या खोर्यात दरवळली....
जिजाऊ पोटी अवघ्या मराठीयांचा राजा अवतरला... सांगत मुकी पाखर हि किलबिलली.... !!
नगारा वाजला, शाहिरी साज चढला !
डंका डोंगरा आड सांगत सुटला,आता सह्याद्रीवर भगवा फडकणार....!!!!
मराठीयांची तलवार शत्रू वर धडकणार.... !

इतिहासाचं पहिलं पान शिव जन्मान लिहील होत,
हिरव्या दगडावर आता भगवं रक्त स्वराज्याचा इतिहास कोरणार होत......































































.