गुरुवार, ८ ऑक्टोबर, २०१५

आमचे "दैवत" श्री छत्रपती शिवराय !




रायगडाची मेघडंबरी म्हणजे शिवराय...
भगवा झुलतो अंबरी म्हणजे शिवराय...

तानाजींच्या मनातला विश्वास म्हणजे शिवराय....
मदारींच्या त्यागातला ठराव म्हणजे शिवराय.....

जिवाजींच्या दांडपट्ट्याचा वार म्हणजे शिवराय....
शिवा काशीदांची आत्माहुती म्हणजे शिवराय....

बाजीप्रभूंच्या तलवारीतली आग म्हणजे शिवराय....
रयतेसाठी झालेली जीवाची तगमग म्हणजे शिवराय....

वतनदारीला घातलेला पायबंद म्हणजे शिवराय....
रांझ्याच्या पाटलाचा "चौरंगा" करण्याचा आदेश म्हणजे शिवराय....

३२ मनाच्या सिंहासनाचे धारक म्हणजे शिवराय....
जिजाऊ साहेबांच्या जीवनाचे सार्थक म्हणजे शिवराय...

एकच आवाज!! एकच पर्याय !!
जय जिजाऊ !! जय शिवराय !!

रविवार, २७ सप्टेंबर, २०१५

अनंत चतुर्दशी कथा


अनंत चतुर्दशी

एके दिवशी कौण्डिन्य मुनींची नजर आपल्या पत्नीच्या उजव्या हातातील बांधलेल्या अनन्तसूत्रावर पडली , ज्याला पाहून ते काही क्षण भ्रमित झाले . आणि त्यांनी आपल्या पत्नीला विचारले – तू मलाच वश करण्यासाठी हे सूत्र हातात बांधले आहेस ना? त्यांच्या पत्नीने अतिशय विनम्रतापूर्वक उत्तर दिले नाही , हे तर अनंत देवाचे पवित्र सूत्र आहे. परंतु ऐश्वर्या” मधे मदमस्त होऊन आंधळ्या झालेल्या कौण्डिन्य मुनींने आपली पत्नीच्या सत्य गोष्टीवर अजिबात विश्वास ठेवला नाही , तिला चुकीचे ठरवून तिन्र धारण केलेल्या  अनन्तसूत्रांना जादू-मंतरवाले आणि वशीकरण करण्याचा दोरा समजून तोडून टाकला आणि त्या धाग्याला आगीमध्ये जाळून टाकले. या घोर वाईट कर्माचा परिणाम लवकरच समोर त्यांच्या जीवनात दिसून आला.  त्यांची सारी संपत्ती नष्ट  झाली. दीन-हीन अवस्थेत ते जीवन-यापन करण्यास विवश झाले. शेवटी त्या परिस्तिथी ला कंटाळून कौण्डिन्यऋषि नी आपल्या अपराधाचे प्रायश्चित करण्याचा निर्णय घेतला. ते  अनन्त देवाकडे क्षमा मागण्याच्या हेतुने एका घनदाट नात येऊन पोहचले. त्यां घनदाट वनांत  रस्त्यामध्ये जे कोणी मिळत होते त्यांना ते अनन्तदेवाचा पत्ता विचारात होते. खूप शोधून हि  कौण्डिन्यमुनी ला जेव्हा अनन्त  देवाचा साक्षात्कार नाही झाला , तेव्हा ते खूप निराश झाले, आणि एका दगडावर बसले. आपल्या दरिद्री जीवनाला कंटाळून शेवटी आपला प्राण सोडण्यासाठी उन्मुक्त झाले. तेव्हाच एक  वृद्ध ब्राह्मण त्या ठिकाणी आले. आणि त्यांनी त्यांना आत्महत्या करण्यापासून थांबवले. त्यांना ते एका गुफे मधे घेऊन गेले. तिथे त्या ब्राम्हणाने त्यांना चतुर्भुजअनन्तदेवाचे दर्शन करवले.
भगवंताने मुनीनां विचारले कि तुम्ही ज्या अनन्तसूत्राचा तिरस्कार केलात, हे सर्व त्याचेच फळ आहे. त्याच्या प्रायश्चित हेतु तुम्ही चौदा वर्षांपर्यंत निरंतर अनन्त-व्रताचे पालन करावे. या व्रताचे अनुष्ठान पूर्ण झाल्यानंतरच तुमच्या कडची नष्ट झालेली सम्पत्ति तुम्हांस पुन्हा प्राप्त होईल आणि तुम्ही पूर्वीप्रमाणेच  सुखी-समृद्ध होऊन जाल. कौण्डिन्यमुनिनी हि आज्ञा सहर्ष स्वीकारली. भगवंतानी पुढे सांगितले – या श्रुष्टीतला प्रत्येक जीव आपल्या पूर्ववत् दुष्कार्मांचे फळच दुर्गति च्या स्वरूपात भोगत असतात. मनुष्य जन्म-जन्मांतराच्या या पातकांच्या कारणाने अनेक कष्ट मिळवतो. अनन्त-व्रताच्या सविधि पालनातून अनेक पाप नष्ट होतात.  तथा सुख-शांति प्राप्त होते. कौण्डिन्यमुनिनी चौदा वर्षांपर्यंत अनन्त-व्रताचे  नियमपूर्वक पालन केले. आणि गमावलेली सुख समृद्धी पुन:प्राप्त केली.

#हिंदूसंस्कृती #परंपरा #टेक दुनियेतील मराठीचे शिलेदार   

रविवार, २० सप्टेंबर, २०१५

समर्थ श्री रामदास स्वामींनी लिहलेली "श्री गणरायाची संपूर्ण आरती" !





समर्थ रामदास स्वामींनी लिहलेली, गणपतीची प्रचलित आरती आपण म्हणतो.
ती फ़क्त 2 कड़वी म्हटली जातात. पण मूळ ८ कडव्यांची आहे.  ती खालिलप्रमाणे आहे असे म्हणतात
नक्की वाचा
आणि आरती पुर्ण म्हटली पाहीजे.- जय जय गणराया ! :-
सुखकर्ता दुःखहर्ता वार्ता विघ्नाची ।
नुरवी पुरवी प्रेम कृपा जयाची ॥
सर्वांगी सुंदर उटि शेंदुराची ।
कंठी झळके माळ मुक्ताफळांची ॥१॥
जय देव जय देव जय मंगलमूर्ती ।
दर्शनमात्रे मनकामना पुरती ॥ध्रु०॥
रत्नखचित फरा तुज गौरीकुमरा ।
चंदनाची उटी कुंकुमकेशरा ॥
हिरेजडीत मुकुुट शोभतो बरा ।
रुणझुणती नूपरें चरणीं घागरिया ॥ जय० ॥२॥
माथा मुकुट मणी कानी कुंडले ।
सोंड दोंदावरी शेंदुर चर्चिले ।।
नागबंद सोंड-दोंद मिराविले ।
विश्वरूप तया मोरयाचे देखिले ॥ जय० ॥३॥
चतुर्भुज गणराज बाही बाहुटे ।
खाज्याचे लाडू करुनी गोमटे ।।
सुवर्णाचे ताटी शर्करा घृत ।
अर्पी तो गणराज विघ्ने वारीतो ॥ जय० ॥४॥
छत्रे चामरे तुजला मिरविती ।
उंदीराचे वाहन तुजला गणपती ।।
ऐसा तु कलीयुगी सकळीक पाहसी ।
आनंदे भक्तासी प्रसन्न होसी ॥ जय० ॥५॥
ता ता धि मि किट धि मि किट नाचे गणपती ।
ईश्वर पार्वती कौतुक पाहती ।।
ताल मृदंग वीणा घोर उमटती ।
त्यांचे छंदे करुनी नाचे गणपती ॥ जय० ॥६॥
चरणी घागरिया छनछन वाजती
त्याच्या नादाने अंबर गर्जती
ता ता थयक थयक नाचे गणपती 
उमा शंकर देव कौतुक पाहती ॥७॥
लंबोदर पीतांबर फणिवरबंधना ।
सरळ सोंड वक्रतुंड त्रिनयना ॥
दास रामाचा वाट पाहे सदना ।
संकटीं पावावें निर्वाणीं रक्षावें सुरवर वंदना॥ जय ० ॥ ८ ॥
जय देव जय देव जय मंगलमूर्ती ।
दर्शनमात्रे मनकामना पुरती ॥॥
!!गणपती बाप्पा मोरया!!



सोमवार, १४ सप्टेंबर, २०१५

माहिती स्वराज्याची !

 स्वराज्यासाठी बलिदान दिलेल्या थोरांची समाधीस्थळे 

१) लखुजी जाधवराव (जिजाबार्इंचे वडील) -सिंदखेड राजा

२) मालोजीराजे (शिवरायांचे आजोबा) - इंदापूर, जि. पुणे

३) विठोजीराजे (शिवरायांचे चुलते) - भातवडी

४) शहाजीराजे - होदिगेरे, ता. कनकगिरी, जि.दावनगेरे (कर्नाटक)

५) जिजाबाई - पाचाड (रायगडाच्या पायथ्याला)

६) छत्रपती शिवाजी महाराज - रायगडावर

७) सईबाई (शिवरायांच्या पत्नी) - राजगड

८) पुतळाबाई व सोयराबाई (शिवरायांच्या पत्नी) - रायगड

९) संभाजीराजे (शिवरायांचे थोरले बंधू) - कनकगिरी, ता. गंगावटी, जि. कोप्पल

१०) छत्रपती संभाजी (शिवरायांचे थोरले
पुत्र) - वडू कोरेगाव

११) सखुबाई (शिवरायांच्या कन्या) माळशिरस, जि. सोलापूर

१२) सूर्यराव काकडे (शिवरायांचे जवळचे मित्र) -साल्हेरच्या किल्ल्याजवळ.

१३) रामचंद्रपंत अमात्य(अष्टप्रधान मंडळातील मंत्री) - पन्हाळगडाच्या पायथ्याशी

१४) मकूबाई (शिवरायांच्या भावजयी) - जिती,
ता. करमाळा, जि. सोलापूर

१५) शिवरायांचे सेनापती नेताजी पालकर - तामसा, ता. हदगाव, जि. नांदेड

१६) प्रतापराव गुजर - नेसरी, ता. गडहिंग्लज, जि. कोल्हापूर हंबिरराव मोहिते- तळबीड, ता. कराड

१७) धनाजी जाधव - वडगाव (कोल्हापूरजवळ)

१८) रामाजी पांगेरा - कन्हेरगड, ता. दिंडोरी, जि. नाशिक

१९) बाजी पासळकर आणि गोदाजी जगताप - (गाधवड, जि. पुणे)

२०) तानाजी मालुसरे आणि शेलारमामा - उमरळ

२१) रायबा (तानाजीचा मुलगा) - पारगड

२२) बहिर्जी नाईक - भूपाळगड मौजे बाणूर, ता. आटपाटी, जि. सांगली

२३) हिरोजी फर्जंद आणि शिवरायांचे सावत्र भाऊ - परळी (रायगडाजवळ)

२४) शिवा काशिद - पन्हाळगड

२५) कान्होजी जेधे आणि जिवा महाले - कारी अंकवडे, ता. भोर, जि. पुणे

२६) मुरारबाजी देशपांडे -पुरंदर

२७) संभाजी कावजी - कोंडावळे, ता. मुळशी, जि. पुणे

२८) फिरंगोजी नरसाळ -  संग्रामदुर्ग (चाकण) पुणे

२९) सिदोजी निंबाळकर - पट्टागड (संगमनेर)

३०) बाजी प्रभू व फुलाजी प्रभू - विशाळगड

३१) दत्ताजी जाधव (शिवरायांचे मामा बहादुरजीचे नातू) - निलंगा येथे १६६५ साली. समाधीस्थळ सापडत नाही.

३२) जानोजी भोसले नागपूरकर - मु.पो. येडोळा, ता. तुळजापूर

३३) जानोजी निंबाळकर (तुळजाभवानी देवीचा दरवाजा यांच्याच नावाने आहे) - बीड

३४) जगदेवराव जाधवराव (जिजाबार्इंचा भाऊ बहादुरजीचा नातू व देऊळगावराजाचा कर्ता) -  ब्रह्मपुरी, ता. मंगळवेढा, जि. सोलापूर

३५) नागोजी माने (म्हसवडकर) - सिंदखेडराजा

३६) हिंमतबहाद्दर उदाजी चव्हाण - अणदूर, ता. तुळजापूर जि.उस्मानाबाद

३७) अन्नूबाई (पहिल्या बाजीरावांच्या बहीण ) - मु.पो. तुळजापूर, जि. उस्मानाबाद

आज महाराष्ट्रातील ब-याच समाध्या जीर्ण अवस्थेत आहेत. काही ठिकाणी समाधी अस्तित्वातच नाहीत आणि ज्या आहेत त्याच्याकडे समाजाचे पूर्णपणे दुर्लक्ष आहे.अशी थोरामोठ्यांची समाधीस्थळे पुढील पिढीला प्रेरणा असतात. सर्वांत सुंदर समाधीस्थळ शहाजीराजांचे आहे. आपल्यापेक्षा कर्नाटकातील लोकांना हे लवकर समजावे हे विशेष आहे.
@ स्वराज्य #

छत्रपती शिवाजी राजे भोसले.
कालखंड :- १६४२–१६८०.
पूर्ण नाव :- शिवाजी शहाजी भोसले.
कुळ :- क्षत्रियकुलावंत, कुल्वादी भूषण
जन्म :- १९ फेब्रुवारी १६३०
जन्म ठिकाण :- शिवनेरी गड, ता. जुन्नर. जिल्हा - पुणे, महाराष्ट्र, भारत.
मृत्यू :- ३ एप्रिल १६८०,मंगळवार.
मृत्यू ठिकाण :- रायगड.

महाराजांच्या धर्मपत्नी-
१. सई बाई (निंबाळकर)
२. सोयराबाई (मोहिते)
३. पुतळाबाई (पालकर)
४. लक्ष्मीबाई (विचारे)
५. काशीबाई (जाधव)
६. सगुणाबाई (शिर्के)
७. गुनवातीबाई (ईन्गले)
८. सकवारबाई (गायकवाड)

मुले - संभाजी, राजाराम,
मुली - सखुबाई निंबाळकर, राणूबाई जाधव, अंबिकाबाई महाडिक, दिपाबाई, राजकुंवरबाई शिर्के, कमलबाई पालकर

फितुर जन्मले ईथे हि जरी या मातीची खंत आहे तरी संभाजी राजे अजुन मराठ्यांच्या छातीत जिवंत आहे.
मुंडके उडवले तरी चालेल
पण मान कुणापुढे वाकणार नाही l
डोळे काढले तरी चालेल
पण नजर कुणापुढे झुकणार नाही l
जीभ कापली तरी चालेल
पण प्राणाची भिक मागणार नाही l
हात कापले तरी चालेल
पण हात कुणापुढे जोडणार नाही l
पाय तोडले तरी चालेल
पण आधार कुणाचा घेणार नाही l
गर्व नाही माज आहे या मातीला
मर्द मराठा म्हणतात या जातीला l
" मरण आले तरी चालेल,
पण शरण जाणार नाही.
प्राण गेला तरी चालेल,
पण स्वधर्म धर्म सोडणार नाही. "

ll जय जिजाऊ ll
ll जय शिवराय ll

शिवाजी महाराजांचे निधन झाले हि बातमी औरंगजेबाच्या खाजगी सचिवास समजली. हि बातमी अत्यंत आनंदाची आहे, असे समजून सचिव बादशहाच्या वैयक्तिय अभ्यासिकेत सांगण्यासाठी गेला. ही बातमी ऐकून औरंगजेब बादशहाने हातातील कुराण बंद करून बाजूला ठेवले. तख्तावरून उठला. त्याने सचिवास आनंद व्यक्त केल्याबद्दल सजा दिली. व नमाजाची पोझिशन घेऊन त्याने दोन्ही हात पसरून आभाळाकडे अल्लाची प्रार्थना करण्यासाठी उंचावले औरंगाजेबाने प्रार्थना केली. तिचा मराठी अनुवाद -"हे देवा माझे साचलेले पुण्य तुझ्या दरबारी आहे. ते खर्ची घालून माझ्या प्रार्थनेचा स्विकार कर. आमच्या हिँदूस्थानातील महान मानवतावादी व सर्वधर्म जातीतील स्त्रियांचा रक्षणकर्ता छत्रपती शिवाजीचा मृत्यू झाला आहे.कृपया त्यांच्या आगमनासाठी तुझ्या स्वर्गाची सताड उघडी देवा - संदर्भ -अहेकामे आलमगिरी.

शत्रूंनी सुधा ज्यांचा गुणांचे पोवाडे गायले असे एकच राजे छत्रपती शिवाजी माझे !
छत्रपती शिवाजी महाराज की  जय!!

माझ्याही शिवबांच एक राज्य होत,
जगाहून सुंदर अस ते स्वराज्य होत ll
सुख शांती समाधान नांदत जिथे,
अस ते एक बहूजन स्वराज्य होत ll
जाती धर्म पंथाचा भेदभाव नव्हता,
न्याय हा सर्वांसाठी एक समान होता ll
न्यायासाठी प्राण गेला तरी चालेल,
पण अन्याय कुणावर झाला नव्हता ll
राज्यांचा राज्य कारभार असा होता,
गवताची कडी सुद्धा गहाण नव्हती ll
स्वतःसाठी सारेच जगतात या जगी,
रयतेसाठी जगणारे शिवराय होते ll
स्वराज्यासाठी अर्पीले प्राण ज्यांनी,
अवघा महाराष्ट्र घडविला हो त्यांनी ll
कितीही गुणगान केले तरी कमीच,
असे अमुचे छत्रपती शिवराय होते ll👏

आपल्याला माहित असणे आवशक आहे..........की ,आपल्या जिल्ह्यात किती किल्ले आहेत,महाराष्ट्रातील जिल्हावार किल्ले:

अहमदनगर जिल्हा
1. अहमदनगरचाभुईकोट किल्ला
2. पेडगावचा बहादूरगड
3. रतनगड

औरंगाबाद जिल्हा
1. देवगिरी-दौलताबाद.

कुलाबा जिल्हा  (रायगड जिल्हा)
1. अवचितगड
2. उंदेरी
3. कर्नाळा
4. कुलाबा
5. कोथळीगड (पेठचा किल्ला)
6. कोरलई
7. कौला किल्ला॑
8. खांदेरी
9. घोसाळगड
10. चंदेरी
11. तळेगड
12. तुंगी
13. धक
14. पेब
15. प्रबळगड
16. बिरवाडी
17. भिवगड
18. मंगळगड-कांगोरी
19. मलंगगड
20. माणिकगड
21. माणगाव
22. रतनगड
23. रायगड
24. लिंगाणा
25. विशाळगड
26. विश्रामगड
27. सांकशी
28. सागरगड
29. सुरगड
30. सोनगिरी
31. मुरुड जंजिरा

कोल्हापूर जिल्हा
1. पन्हाळा
2. पावनगड
3. बावडा
4. भूधरगड
5. रांगणा
6. सामानगड

गोंदिया जिल्हा
1. गोंदियाचा प्रतापगड

चंद्रपूर जिल्हा
1. किल्ले चंद्रपूर
2. बल्लारशा

जळगाव जिल्हा
1. अंमळनेरचा किल्ला
2. कन्हेरगड
3. पारोळयाचा किल्ला
4. बहादरपूर किल्ला

ठाणे जिल्हा
1. अर्नाळा
2. अशीरगड
3. असावगड
4. अलिबाग
5. इंद्रगड
6. उंबरगांव
7. कल्याणचा किल्ला
8. कामनदुर्ग
9. काळदुर्ग
10. केळवे-माहीम
11. कोंजकिल्ला
12.गंभीरगड
13. गुमतारा
14. गोरखगड
15. जीवधन
16. टकमक
17. ठाणे किल्ला
18. डहाणू
19. तांदुळवाडी किल्ला
20. तारापूर
21. धारावी
22. दातिवरे
23. दिंडू
24. नळदुर्ग
25. पारसिक
26. बल्लाळगड
27. बळवंतगड
28. बेलापूर
29. भवनगड
30. भैरवगड
31. भोपटगड
32. मानोर
33. माहुली
34. व्ररसोवा
35. वसईचा किल्ला
36. शिरगांवचा किल्ला
37. संजान
38. सिद्धगड
39. सेगवाह

नागपूर जिल्हा
1. आमनेरचा किल्ला
2. उमरेडचा किल्ला
3. गोंड राजाचा किल्ला
4. नगरधन(रामटेक) (भुईकोट किल्ला)
5. भिवगड
6. सिताबर्डीचा किल्ला

नाशिक जिल्हा
1. अंकाई
2. अचलगड
3. अंजनेरी
4. अलंग
5. अहिवंत
6. इंद्राई
7. कंक्राळा
8. कंचना
9. कन्हेरा
10. कर्हेगड
11. कावनई
12. कुलंग
13. कोळधेर
14. गाळणा
15. घारगड
16. चांदोर
17. जवळ्या
18. टंकाई
19. त्रिंगलवाडी
20. त्रिंबक
21. धैर
22. धोडप
23. पट्टा
24. बहुळा
25. ब्रह्मगिरी
26. भास्करगड
27. मार्किंडा
28. मुल्हेर
29. रवळ्या
30. राजधेर
31. रामसेज
32. वाघेरा
33. वितानगड
34. हर्षगड
35. हातगड

पुणे जिल्हा
1. कुवारी
2. चाकण
3. चावंड
4. जीवधन
5. तिकोना
6. तुंग
7. नारायणगड
8. पुरंदर
9. प्रचंडगड (तोरणा)
10. मल्हारगड
11. राजगड
12. राजमाची
13. विचित्रगड
14. विसापूर
15. लोहगड
16. शिवनेरी
17. सिंहगड
18. हडसर

रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्हे
1. अंजनवेल
2. आंबोळगड
3. आवर किल्ला
4. कनकदुर्ग
5. कुडाळचा किल्ला
6. कोट कामते
7. खारेपाटण
8. गोवळकोट
9. गोवा
10. जयगड
11. दुर्ग रत्नागिरी
12. देवगड
13. नांदोशी
14. निवती
15.पालगड
16. पूर्णगड
17. प्रचितगड
18. फत्तेगड
19. बाणकोट
20. बांदे
21. भगवंतगड
22. भरतगड
23.भवनगड
24. भैरवगड
25. मंडणगड
26.मनसंतोषगड
27. मनोहरगड
28. महादेवगड
29. महिपतगड
30. यशवंतगड
31. रसाळगड
32. राजापूरचा किल्ला
33. रायगड
34. विजयगड
35. विजयदुर्ग-घेरिया
36. वेताळगड
37. सर्जेकोट
38. साठवली
39. सावंतवाडीचा किल्ला
40. सिंधुदुर्ग
41. सुमारगड
42. सुवर्णदुर्ग

सांगली जिल्हा
1. तेरदाळ
2. दोदवाड
3. मंगळवेढे
4. शिरहट्टी
5. श्रीमंतगड
6. सांगली
7. येलवट्टी

सातारा जिल्हा
1. अजिंक्यतारा
2. कमालगड
3. कल्याणगड
4. केंजळगड
5. चंदन
6. जंगली जयगड
7. गुणवंतगड
8. प्रचितगड
9. प्रतापगड
10. पांडवगड
11. बहिरवगड
12. भूषणगड
13. भोपाळगड
14. मकरंदगड
15. मच्छिंद्रगड
16. महिमंडणगड
17. महिमानगड
18. सज्जनगड
19. संतोषगड
20. सदाशिवगड
21. सुंदरगड
22. वर्धनगड
23. वंदन
24. वसंतगड
25.वारुगड
26. वैराटगड

शनिवार, १२ सप्टेंबर, २०१५

"किल्ले माहुलीगड" आणि "किल्ले भंडारगड" दुर्गभ्रमण मोहीम !










बरेच दिवस झाले होते कुठेतरी ट्रेकींग ला जाण्याचा प्लान चालू होता .थोडावेळ विचार झाला आणि ठिकाण ठरलं माहुली गड हे नाव आमचा मित्र सागर ने सुचवलं होत तो आधी तिथे गेला होता.  त्याच्यामुळे किल्ला परिसर माहित असलेला एक “मावळा” आमच्या समवेत होता . आम्ही सर्वजण १२ सप्टेंबर २०१५  रोजी शनिवारी मोहिमेसाठी निघणार होतो. पण त्याआधी कोणासाठी तो कामाचा दिवस म्हणून सुट्टी नाही , कोणाचे या ना त्या मार्गाने नाना शंका आणि कुशंका वगळून आम्ही १० जणांची टीम शनिवारी पहाटे च्या ५.४८ च्या आसनगाव लोकल ने निघणार होतो. त्यासाठी घाटकोपर वरून ९ जणांची एक टीम या लोकल ने पुढे रवाना झाली. पण आधीची नाईट शिफ्ट केल्यामुळे माझी ती लोकल मिस्स झाली .त्यामुळे मला ७:३४ मिनिटाच्या दुसऱ्या आसनगाव लोकल शिवाय दुसरा पर्याय नव्हता. आमच्या च काही भरवश्याच्या मित्रांनी ऐनवेळी “टांग” दिल्यामुळे  मला एकट्यालाच या लोकलने आसनगाव पर्यंत चा प्रवास करायचा होता.... असो ! पण आमची जी पहिली टीम जी वेळेनुसार चालत होती , माझ्यामुळे त्यांना हि बराच उशीर पर्यंत वाट पाहत ताटकळत बसावे लागले . जेव्हा आम्ही सर्व १० जण आसनगाव येथील “परिवार हॉटेल” परिसरात दाखल झालो. तेव्हा अधिक उशीर न करता सागर ने आधीच ठरवलेल्या एका टेम्पो चालकाच्या गाडीतून आम्ही आसनगाव (परिवार हॉटेल) ते  किमी अंतरावरील  माहुली ह्या  पायथ्याच्या  गावा पर्यंतचा प्रवास केला . माहुलीगड हा ठाणे जिल्ह्यात असून आसनगाव रेल्वे स्टेशन पासून साधारण ८-१० कि.मी .अंतरावर आहे. या प्रवासावेळी मी मुद्दामून त्या टेम्पो चालकाच्या शेजारी पुढे जाऊन  बसलो , बाकीचे सर्व सवंगडी पाठीमागे बसले होते. त्या प्रवास च्या वेळी मुद्दाम त्या टेम्पो चालका पासून त्या किल्ले परिसरा बाबत अधिक माहिती गोळा करण्याचा उद्धेश होता . त्या  टेम्पो चालका पासून बरीच माहिती मिळाली हि , पण तो खूप खूप मोठ्या  बढाया मारतोय हेच अधिक जाणवले . आणि यावर शिक्कामोर्तम संध्याकाळी तो आम्हा ला पुन्हा परतीच्या प्रवासा च्या वेळी  नेण्यासाठी न येण्या ने झाला .... असो !
गड चढत असताना आमच्यातील तुरळक वगळता गड चढण्याची आत्मिक इच्छा , सामर्थ्य खूप कमी जणांकडे होते , याची जाणीव प्रत्येक जण करून देत होते . बहुदा बहुतेकांची हि पहिलीच वेळ होती , त्यामुळे कदाचित ! पण सर्वांचे आभार मानले पाहिजेत... कारण सर्वांनी जिद्द सोडली नाही . गड चढताना आमची चांगलीच दमछाक झाली होती . आणि धुकं सुद्धा खूप होती.  त्यात डोक्यापेक्षा हि वर वाढलेलं जंगल त्यातून आम्ही चालत होतो .
            भर उन्हात , हिरव्यागार माळ रानात आम्ही गडाचा माथा कधी येतोय याची आतुरतेने वाट पाहत मार्ग चढत होतो . सागर ने “अरे  आलेच फक्त  थोडाच चढायचे ”, “फक्त १५ मिनिट बाकी , मग पोहचलोच ”, “ मग relax  the body करायचे या आणि नाना धीर देणारे गमतीदार  शब्द, आणि डाइलॉग बाजी मुळे सर्वान मधे एक चेतना निर्माण होत  होती . हे ते शब्द सर्वान साठी दर १० मिनिटांनी “एनर्जी ड्रिंक” सारखे काम करायचे. सर्व जण हि एकोप्याच्या भावनेतून पुन्हा गड जोमाने  चढत  होते . त्या बद्दल सर्वांचे आणि त्या एकतेचे अभिनंदन ! आणि त्याच बरोबर खासकरून अभिनंदन करायला हवे  ते राकेश पार्टेचे ! गड चढत असतानापासून जो काही कचरा आमच्याकडून  निर्माण झाला तो सुरवातीपासूनच एकत्र ठेवत हा गडी सर्वाना त्याचे महत्त्व आणि जाणीव करून देत होता . गड उतरून झाल्यावर सुमारे २ किलो वजनाची ती कचऱ्याची पिशवी पायथ्याशी कचरा कुंडीत टाकण्यात आली .

माहुली गड हा फारसा कुणाला माहित नसला तरी शिवाजी महाराजांच्या काळात त्याला महत्त्व होते. आदिलशहा पासून छोट्या निजामाला वाचवण्यासाठी शहाजी राजे शिवबा आणि जिजाऊ ना घेऊन ह्याच किल्ल्यावर आले होते तेव्हा शिवाजी फक्त ६ वर्षांचे होते . पुढे आदिलशहाचा सरदार कार्तलब खान ने २ महिने माहुलीला वेढा दिला होता , नंतर वाटाघाटी ने मार्ग सुटला . माहुलीच्या बाजूलाच पळसगड आणि भंडारगड आहेत . हे खूप विस्तीर्ण असा जंगल आहे .



पुरंदरच्या तहात माहुली पण मुघलांकडे गेला होता पण अवघ्या २ वर्षात महाराजांनी २३ किल्ल्यांसकट २५० किल्ले जिंकले त्यात माहुलीगड ही होता. ठाणे जिल्ह्यातला हा सर्वात उंच किल्ला आहे आणि ह्याची उंची २८०० फूट इतकी आहे
. गडावर आमच्या व्यतिरिक्त काही ट्रेकर आम्हांला दिसले.  माझ्या हातात कॅमेरा होता, त्यामुळे त्यांच्या सारखी काठी घेऊन चढणे शक्य नव्हते.  काही ठिकाणी तर चढण खूप सरळ होती. गड चढत असताना ,बरीच चढण चढल्यावर आम्ही एका टोकावर येऊन पोहचलो बरेच जण पाहिल्यावेळेस आले होते.  तेव्हा इतक्या वर आले नसतीलच. त्यामुळे आता किल्ला कोणत्या बाजूला आहे हे काहीना माहित नव्हत. काही अंतर वर  गेल्यावर ते कळले , तिथून खालचं दिसणारं विहंगमय दृश्य पाहून “खूप भारी” वाटले !  वाटेवरून आम्ही पुढे पुढे चालत होतो , गडावर खूप मस्त वातावरण होतं आणि फोटोग्राफी साठी तर एकदम मस्तच लोकेशन होतं त्यामुळे तिथे फोटो काढण्यात जरा वेळ आम्ही रमलो.
 काही अंतरावर असणाऱ्या वाटेने चालू लागलो पुढे एकदम सरळ उभी दगडं होती आणि त्यावरून चढण्यासाठी एक लोखंडी शिडी होती पण ती वरच्या बाजूला बांधलेली आणि खाल च्या बाजूने हवेत लटकत होती , आम्ही सर्व जण जपून “एक एक” जण त्या शिडीने वर पर्यंत जात होतो . जेव्हा आम्ही माहुली गडाच्या माथ्यावर पोहचलो तेव्हा क्षणभर सर्वांनाच हायसे वाटले .  अजून पुढे आम्ही गेलो तिथे पाण्याचं टाके होते तिथून पुढे गेलो, खूप पुढे गेलो पण किल्ला काही दिसत नव्हता वैतागून एका जागी बसलो. आणि म्हणालो आता काय नाही किल्ला बिल्ला इथेच खाऊया आणि जाऊया घरी ! नकाशात पाहिलं तसं शंकराची पिंडी होती, आणि भग्न अवस्थेतल्या देवड्या आणि तिथेच एक पिण्याच्या पाण्याचं टाके होते. गडावरील पिण्याच्या पाण्याच्या टाक्यातून पिण्याचे पाणी घेऊन आम्ही सर्व जणांनी न्याहारी केली . आणि एका झाडा खालील असलेल्या “श्री शंभू महादेवाच्या पिंडीचे”  दर्शन घेतले.  त्या निसर्गरम्य वातावरणात जेवण्याचा आनंदच वेगळा होता . वातावरण खूप मोहक होते , ढग दाटून आले होते , धुक्यांचे साम्राज्य चारी दिशेला सामाऊन गेले होते , तरी हि   जेवणा नंतर सर्वच थोडे आळसावलेले  होते . मोहीम ठरलेल्या वेळी पुढे जाणे हि तितकेच गरजेचे होते . या भावनेतून सर्वांनी पुन्हा नवीन जोशात माहुलीगड परिसरातील भंडारगड दिशेने मार्गक्रमणा चालू केली . आणि त्याच वेळी ज्याची आम्ही गड चढत असता पासून अधिक  आतुरपणे वाट  पाहत होतो , त्या वरूण राजाने जोरदार हजेरी लावली . आणि सर्वांचा प्रवास दरम्यान चा शीण कुठल्या कुठे पळून गेला . या पुढल्या प्रवास दरम्यान आम्ही “रेप्लीन” चा छोटा सा रोमहर्षक अनुभव हि घेतला . त्या ठिकाणी सागर टेमगिरे या मावळ्याचा असेलेला अनुभव दिसून आला . जोरदार पाउस असल्याने आमच्या पैकी कोणाचे हि कॅमेरे आणि फोन बाहेर निघाले नाही , त्यामुळे त्या वेळचे आणि पुढील अधिक सुंदर वातावरणाचे छायाचित्र काढता आले नाही , हीच एक खंत !
आम्हाला काळोख व्हायच्या आत खाली उतरायचे होते मग आम्ही परतीची वाट धरली येताना मात्र सर्वजण पटापट उतरत होते.सगळ्यांना खूप क्षीण आला होता तेव्हा लवकर खाली जाऊन पाण्यात मजा करायची होती
पाण्यात मजा करून झाल्यावर आम्ही निघालो. एकूण सर्व च प्रवास सर्वाना एक वेगळाच अनुभव देणारा नक्कीच ठरला असणार ! पुन्हा हि नवीन जोमाने , मनात कसलीच शंका , कुशंका न ठेवता , आपुलकीच्या भावनेने  आपल्या थोर पराक्रमी  इतिहासाची जाणीव ठेऊन , एकट्या आणि उध्वस्त अवस्थेतील आपल्याच गड किल्यांवर पुन्हा पुन्हा यावेच !  दुर्गभ्रमंती सर्वानकडून व्हावी हीच शिवरायांन चरणी प्रार्थना !

"किल्ले माहुली दर्शन"- थोडक्यात ओळख!

किल्ले माहुली हा ठाणे जिल्ह्यातील किल्ला असून चढाई साठी मध्यम श्रेणीचा आहे. ठाणे जिल्ह्यात शहापूर-आसनगावाजवळ एक दुर्गत्रिकुट आहे. माहुली-भंडारगड आणि पळसगड मिळून हे बळकट ठाणे तयार झाले आहे. मुद्दाम जाऊन पहावे असे हे ठिकाण कोणाही निसर्गप्रेमी माणसाला आपल्या निसर्गसौंदर्याने वेड लावते. अनेक सुळके असलेला लांबलचक असा हा डोंगर माहुली नावाने ओळखला जातो. माहुलीचे दोन खोगिरामुळे तीन भाग पडले आहेत. उत्तरेचा पळसगड, मधला माहुलीगड आणि दक्षिणेचा भंडारगड.

हा किल्ला कोणी बांधला याबद्दल काहीच माहिती नाही पण निजामशाहीत हा किल्ला शहजीराजेंकडे होता पण परकीय आक्रमणासमोर सैन्यबळ कमी असल्याकारणे त्यांना तो मुघलांच्या स्वाधीन करावा लागला नंतर शिवरायांनी हा किल्ला स्वराज्यात शामिल केला. जवळ जवळ ३ वेळा हा किल्ला परकीयांनी हल्ले करून स्वराज्याकडून जिंकून घेतला आहे पण नंतर तिन्ही वेळा शिवरायांनी माहुली किल्ला पुन्हा जिंकला यावरूनच या किल्ल्याचे महत्व काय असावे याचा अंदाज बांधलेलाच बरा. 


"दिल दोस्ती यारी हे सगळे फेसबुकवरी"
किल्ले दर्शन स्वखर्चाने
, कमीतकमी खर्चात होईल याची नोंद सर्वांनी प्रथम घ्यावी, जेणेकरून अधिक जण या सफरींचा आनंद घेऊ शकतील. – जय शिवराय!!  






रविवार, ३० ऑगस्ट, २०१५

शिवस्वा हेच सर्वस्वा !



शिव चरित्र पारायण सोहळा (बदलापूर)











संकट हरण्या
दूर करण्या
आदिलशाहीच्या अंधाराला
शिवनेरीवर सूर्य उगवला
[घेतली] बालसवंगडी जमवुनी सारे शपथ स्वराज्याची
एकमुखाने गाऊ चला रे कीर्ती शिवबाची

संगे मावळ्या
वयी कोवळ्या
प्रचंडगडावर केली स्वारी
विजयाची दुमदुमली तुतारी
साक्ष देई या इतिहासाची ती बुधला माची
एकमुखाने गाऊ चला रे कीर्ती शिवबाची

होऊनि मदमस्त
करि उध्वस्त
घरे मंदिरे अन् अभिमान
चालून आला अफझलखान
बलदंड खानावर भारी पडली युक्ती राजांची
एकमुखाने गाऊ चला रे कीर्ती शिवबाची

स्वराज्य श्रींचे
स्वरक्ताचे
वाचवण्या हा किल्ले पुरंदर
लढले-पडले वीर धुरंधर
हत्ती नि तोफांशी लढली भाला नि बरची
एकमुखाने गाऊ चला रे कीर्ती शिवबाची

देवू न कोणा
हा कोण्डाना
जिद्दीने या पेटून उठला
टक्कर देण्या उदेभानला
पराक्रमाची शर्थ करुनी लढला तानाजी
एकमुखाने गाऊ चला रे कीर्ती शिवबाची

आई जिजाऊ
अन् तुळजाऊ 
वात्सल्याचा स्रोत महान
शिवरायांचे स्फूर्तीस्थान
सहिष्णुता, स्वाभिमान समता शिकवण ही उंची
शिवबासंगे गाऊ चला रे कीर्ती जिजाऊंची …. कीर्ती जिजाऊंची !




छत्रपती शिवाजी महाराजांचे ध्वनी स्वरूपातील (राजा शिवछत्रपतीलेखक श्री बाबासाहेब पुरंदरे , पारायण गीता उपासनी , भाग -२२,२३,२४,२५,२६,२७,२८,२९) चरित्र पारायण बदलापूर येथे सुफळ संपन्न झाले. त्यांनतर अर्थातच श्रावण महिना असल्याने आणि सोबत जिवाभावाची मित्र मंडळी असली कि बेत हि पटकन ठरतात . तसा पहिला तर अंबरनाथ येथील प्राचीन शिव मंदिरयाची देही याची डोळापाहण्याचे भरपूर दिवसापासून सर्वांच्याच मनात होते . आज श्री शिव चरित्रपारायणामुळे व्यस्त जीवनातून ती दुर्मिळ संधी साधता आली . बदलापूर रेल्वे स्थानकात्तून आम्ही त्या पुढील अंबरनाथ स्थानक गाठले . तेथून रिक्षा करून आम्ही अतिप्राचीन अश्या सांस्कृतिक वारसा असलेल्या दैदीप्यमान शिल्पवैभवाच्या साक्षात दर्शनाला शिव मंदिराच्यापरिसरात दाखल झालो. ज्यांनी येथे येऊन खास हे आरसपानी सौंदर्य बघितले असतील ते नक्कीच हरखुन गेले असणार. खडकात भव्य प्राकार खोदून त्याच्यामध्ये हे मंदिर उभारले आहे. मला तर लांबुन पाहिले असता जगन्नाथाच्या डौलदार रथ उभा असल्यासारखे वाटले. तेथे असलेल्या छोट्या पुलावरून प्रांगणात आल्यावर मंदिरावर केलेले शिल्पकांम पाहुन थक्क व्हायला होते. पायापासुन शिखरापर्यंत हे मंदिर अगदी नखशिखांत आरसपानी सौंदर्याने नटलेले आहे. प्रवेशद्वारातुन आत जाताना दोन नंदी दिसतात. मंदिराचा गाभारा एखाद्या खोल विहिरीसारखा असुन खाली उतरायला पायर्याे आहेत. गाभार्याात शिरताच कमालीचा थंडावा जाणवतो. गाभार्यारत दोन शिवलिंग आहेत (कदाचित यामुळेच प्रवेशद्वारावर दोन नंदी असावेत). तेथे उभे राहुन वर पाहिले असता शिखराच्या बोगद्यातुन निळ्या आकाशाचे दर्शन होते. शिखराला जाळी लावलेली आहे. विविध पौराणिक कथा, नृत्यात मग्न असलेली शिल्पे, हातात आयुधे घेतलेली शिल्पं, विविध देवी-देवतांची शिल्पं याच्या चेहर्याकवरील भाव ठळकपणे दिसुन येतात.मंदिराच्या बाहेरून तुम्ही फोटो काढु शकता पण आतल्या बाजुने फोटो काढण्यास मनाई आहे..... 

शिवमंदिराचा इतिहास -
हाजीमलंग डोंगराच्या पायथ्याशी उगम पावणा-या वालधुनीनदीने उल्हासनगर व अंबरनाथ शहरांना विभागले आह़े याच नदीच्या तीरावर प्राचीन शिल्पकलेचा उत्कृष्ट नमुना असलेल्या अंबरनाथच्या शिवमंदिराचा ९५५ वा वर्धापन दिन सोमवारी साजरा करण्यात आला. शिलाहार राजघराण्याच्या काळात श्रावण शुद्ध नवमीला या शिवमंदिराचे बांधकाम पूर्ण झाले. त्यामुळे हा दिवस या मंदिराचा वर्धापन दिन म्हणून साजरा केला जातो. कोकण प्रांतात आढळणा-या काळ्या दगडांत ते कोरण्यात आले आह़े या मंदिराच्या बाह्य व आंतरभागांवर देवादिकांच्या मूर्ती कोरण्यात आल्यामुळे मंदिर आकर्षक वाटत़े या शिवमंदिरातील गाभा-यांत स्वयंभू शिवलिंग आह़े या गाभा-यांत जाण्यासाठी २० पाय-या खाली उतरावे लागत़े. या शिवलिंगाला अंबरेश्वरम्हणूनही ओळखले जात़े याच मंदिराच्या नावावरून शहराला अंबरनाथ हे नाव पडले आह़े या मंदिराच्या परिसरात महाशिवरात्रीला मोठी जत्रा भरत़े महाशिवरात्रीच्या काळात दर्शनासाठी भल्या मोठय़ा रांगा लागतात़ ठाणे, रायगड, पुणे भागातून लाखो भाविक स्वयंभू शिवपिंडीच्या दर्शनासाठी गर्दी करतात़ ही जत्रा तीन दिवस चालत़े.

अख्यायिका -
पांडवांनी एक मोठा दगड कोरून एका रात्रीत हे मंदिर बांधले असल्याची अख्यायिका आहे. या मंदिर परिसरातील एका गुंफेतून मंदिर बांधून पूर्ण झाल्यावर पांडव या ठिकाणाहून निघून गेले.हे मंदिर सर्वांत जुनं व ऐतिहासिक मंदिर म्हणून ओळखल जात. अंबरनाथचे शिवमंदीर हे संपूर्ण भारतवर्षातील पहिले भूमिज मंदीर जे अत्यंत कलात्मक आहे. शिल्पवैभवाची साक्ष देत वर्षानुवर्षे उन-पाऊस आणि काळाचा आघात सहन करत असलेले स्थापत्यशास्त्राचे एक उत्कृष्ट उदाहरण म्हणजे "अंबरनाथचे शिवमंदिर".