लेख ! लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
लेख ! लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

रविवार, २६ जुलै, २०१५

या हिंदुस्थानात खऱ्या "देशभक्तांची" आणि "देशभक्तीची" उणीव जाणवायला लागलीय.

"याकुब बचाव" म्हणणाऱ्या च्याच "पार्श्वभागी" बॉम्ब लावले पाहिजेत !


या हिंदुस्थानात खऱ्या "देशभक्तांची" आणि "देशभक्तीची" उणीव जाणवायला लागलीय.

या हिंदुस्थानात खऱ्या देशभक्तांची आणि देशभक्तीची उणीव जाणवायला लागलीय. खरेचं या विधानाची तीव्रता खूप जाणवू लागलीय. काल परवा पर्यंत ज्या सलीम खानच्या पोराचा अभिमान वाटत होता त्या मूर्खाचा भोंदूपणा उघड झाला. स्वतःला शिक्षे साठी वाचवण्यासाठी शेतकऱ्यांना मदतीसाठीचालवलेल्या धडपडीत स्वार्थी भाईजानदिसला. 
संपूर्ण जण हिंदुस्थानाकडे पाहत असताना, सर्व दिग्गज आणि जेष्ठ नेते, अभिनेते मंडळी; आतंकवादी आणि आतंकवाद्यांचा साधीदार क्रूरकर्मा याकुब मेमनच्या समर्थनार्थ उतरले दिसतायेत ! शरमेने मान खाली जाते जेव्हा हीच डोक्यावर चढवून घेतलेली मंडळी, चार बुकं जास्ती शेण खाल्लेलीस्वतःला प्रोटोकॉलमानणारी लबाड लांडगीस्वतःच्याच या हिंदुस्थानाची अश्या प्रकारे थट्टा मांडतात तेव्हा ....
 तसा नीट विचार केलात तर या लबाड लांडगेआणि कुत्र्यांचीसाखळीच एकमेकांत गुंतली आहे . म्हणून एक जरी भुंकला तर बाकीचे त्याच्यापाठी भुंकायला सुरवात करतात. आणि जरा नीट पहिले तर , हे सर्व कुत्रे” , “लांडगेएकाच जमातीचे आणि गाववाले असल्याचे जाणवेल . कारण प्रत्येकाची रोजी रोटीयांच्यातल्याच कोण हरमखोराच्या मेहरबानी ने चाललेली असते . मग त्या ठराविक लांडग्याला खुश करण्यासाठी सर्व जमातदार एकमेकां पाठोपाठ कोल्लेकुईईS”  सुरु करतात . या अश्या हरामखोरांना सीमेवरील लढणारे कॅप्टन बत्रा सारखे लाखो शूर जवान , बॉम्बस्फोट आधी दुर्दैवी घटनात मारले जाणारे लाखो निरपराध मुंबईकर पराग सावंतका बरे दिसत नाहीत???
कारगिल मधे विजय मिळवण्यासाठी चालवलेल्या ऑपरेशन विजयमधे ५२७ शूर जवान शहीद झाले .१३०० पेक्षा अधिक शूर सैनिक जखमी झाले. वीरगतीला प्राप्त झालेल्या ५२७ शूर जवानांपैकी अधिक च्या जवानांनी त्यांच्या आयुष्यात ३० वसंत ऋतूसुद्धा पहिले नव्हते , म्हणजे त्यांचे वय ३० पेक्षा हि कमी होते. या सर्वांच्या असीम त्यागाचे काय ??????
सकाळपासून एकही यांचा जमातदारया वीर सुपुत्रांना श्रद्धांजली वाहताना कुठे ऐकिवात आले नाही . पण उठल्या उठल्या यांच्या पैकीच्या प्रमुख लांडग्याच्या रात्रीच्या दारू च्या नशेत केलेल्या टीव टीवात हरामी लांडग्याला खुश ठेवताना, स्वतःचे देशप्रेम हि मंडळी कशी काय विसरून जातात  !


शनिवार, १३ जून, २०१५

" चार मित्रांची गोष्ट " - ( भाग -४ )





भाग -४

(दिवस तिसरा - गच्चीवर पुन्हा मैफिल जमली होती , पुरुषोत्तम , सुयोग, आणि प्रकाश  तारीखेच्या विचाराचे आणि केदार तिथीच्या  विचाराचा ... पुरुषोत्तम मनात विचार करत होता कि आज यां केदार ला धडा शिकवायचा आणि पुरता एकटा पाडायचा... पण त्याचे काही चालत मात्र नव्हते . )

केदार :  तिथी नुसार जयंती साजरी करण्याचा आनंदच वेगळा असतो....तो अनुभवापण.. ज़रा काननाकआणि डोळे सताड उघडे करूनच....कारण सत्याला नुसता मुजरा घालायचा नसतो. तर् तो आधी स्व नसानस्सा मधे भिडला गेला पाहिजे. आंधळ्या सारख्या निर्माण झालेल्या वा राजकीय लोभामुळे केलेल्या परंमपरेला महत्व देऊन आपण काय आणि कोणाचे भले करत आहोत?  हे विचार करण्या सारखे आहे. कारण प्रामाणिक पणे जर जाणले तर,  अंतःकरणाने  नाकारल्या जाणाऱ्या अश्या गोष्टी ढोबळमानाने करून फ़क्त आणि फ़क्त आपण स्व संस्कृती आणि तिचा अनमोल इतिहासत्यांचे महत्वत्यातला मतितार्थ पुर्णपणे मातीमोल तर् करत नाही ना ? ?  याचा सखोल विचार आत्यंतिक गरजेचा आहे. आणि त्यापुढे जाऊन हे  खरंच थांबले पाहीजेआणि त्यासाठीच सर्वोच्च प्रयत्न केलेंचि पाहिजे.
 (केदार अधिक सुपष्ट पणे आपले म्हणणे मांडत होता , पण मूळ तिथी आणि तारीखे पासून चालू झालेला वाद आत्ता पूर्ण पणे त्याच्या उगमस्थानी पोहचला होता , आणि विषय “ब्रिगेडी विचार”  विरुद्ध  “केदारचे  विचार” असा झाला होता . यात केदार हा एकटा शिवधर्म जगणारा आणि ते मानणारा होता . बाकी सर्वाना हि काही प्रमाणात का होईना ब्रिगेडी विचारांनी ग्रासले होते .  )

पुरुषोत्तम:  आमच्या कोकाटे साहेबांनी आम्हाला सांगितले कि औरंगजेबाने आपल्या महाराजांना 'राजाहि पदवी सन्मानाने दिलीमहाराज स्वर्गवासी झाल्यावर त्याने अल्लाकडे प्रार्थना केली होती .

केदार :  तुमच्या कोकाटे साहेबांविषयी नको सांगूस , संभाजी ब्रिगेड सारखी ढोंगी द्वेषवादी संघटना दुसरी कोणतीही नसेल.
तुम्ही फक्त महाराजांविषयी अपप्रचार करून संधी साधून नेणार , तुम्हाला स्वधर्माचा अभिमान तो कुठे !
(केदार अधिक स्पष्टपणे बोलता झाला ..)

सुयोग  : बर मग सांग , भगवान परशुराम हे ब्राह्मण ऋषी कुळात जन्माला आलेले थोर तपस्वी आणि त्यांनी क्षत्रियांचा संहार केलात्यामुळे ते केवळ ब्राह्मण समाजाचेच देव व क्षत्रियांचे संहारक आहेत यांवर तुझे काय मत आहे ?

प्रकाश : हा मला काल परवा एक जण बोलत होता , परशुरामावर केले जाणारे काही प्रमुख आरोप म्हणजे:

 परशुरामाने स्वतःच्या आईची हत्या केली,  परशुरामाने २१ वेळा पृथ्वी नि:क्षत्रिय केली. एकदा क्षत्रिय नष्ट झाल्यावर पुन्हा कुठून आले.? परशुराम क्षत्रिय द्वेष्टा होता., परशुराम पृथ्वीवरील पहिला आतंकवादी होता, कर्ण क्षत्रिय होता म्हणून परशुरामाने त्याला शाप दिला.
(प्रकाश च्या मनातील एक एक आरोपाच्या फैरी तो पर्शुरामांबद्दल  झाडत होता.)

पुरुषोत्तम : ह्म्म्म , खरेचं आहे हे ! स्वतः ब्राम्हण असून त्यांनी महापातक कृत्य केले आहे . ब्राह्मणांची जाताच ती , खाली मुंडी आणि पातळ धुंडी !
(नेहमी प्रमाणेच ब्रिगेडीना काय बोलावे ते सुचत नसते आणि नको ते, नको तिथे बोलून मोकळे होतात. हाहाहा J ... असो , परंतु  पुरुशोतामाने मनातील राग अत्याधिक प्रखर पणे व्यक्त केला होता  , त्याच्या बोलण्यातून एका सच्चा “ब्रिगेडी कार्यकर्त्या सारखा” प्रामाणिक पणे “जातीय वाद” उफाळून येत होता.)

केदार :  मुळात कोकणस्थ लोकांसाठी परशुराम आणि परशुरामाची भूमी हि अगदी जिव्हाळ्याचा विषय आहे , परंतु  (सुयोग कडे पाहत ) सुयोग, ते केवळ ब्राह्मण समाजाचेच देव व क्षत्रियांचे संहारक अशी त्यांची प्रतिमा काही भेदभाव पसरविणाऱ्या दुष्ट शक्तिच  वारंवार मनावर बिंबविण्याचा प्रयत्न करतात आणि दुर्दैवाने आपलेच काही बांधव... (पुरुषोत्तम कडे नजर रोखून ) या भ्रमास खरे मानून प्रत्यक्ष भगवंताच्या अवतारास जातीत बंदिस्त करू पाहतात. 
(मुळात केदार पुरुशोतामाला उद्धेशून बोलला असेल हि , परंतु त्यातून हि त्याला त्याच्या डोक्यातील “मूळ ब्रिगेडी विचारांची कीड” नाहीशी करायची होती )

पुरुषोत्तम : परशुराम हा ब्राम्हण होता तरी त्याने त्याच्या आईची हत्या केली !

केदार : पुरुषोत्तम , मुळातला इतिहास त्रयस्थ पणे समजावून घेशील आणि त्यातला मतितार्थ समजावून घेशील तर तुमच्या सर्वांच्या विचारांचे शुद्धीकरण नक्कीच होईल.

पुरुषोत्तम : आम्हांला इतिहासाची पूर्ण जाणीव आहे , आणि आमच्याच लोकांनी तो जगापुढे खऱ्या रुपात आणला !
(यापुढे जाऊन तो उत्तरता झाला ) अरे सुयोग आणि प्रकाश तुम्हाला माहित हि नसेल पण शिवराय स्वतः बौद्ध धम्मीय होते.
(पुरुषोत्तम आपल्या संघटनेशी प्रामाणिक होता , पण मुळात पायाच चुकीचा असल्यामुळे त्याच्या सारख्या लाखो नवतरुण खोट्या आणि भावनिक विश्वात आपल्या “थोर इतिहासाची” कास हरवून गेले होते , केदार ला याची जाणीव होती, म्हणून अत्याधिक जबाबदारीने तो त्यांच्या विचारातील “वैचारिक बुरशीचा” सामना “शिवतेजाला स्मरून”, “एक शिवकार्य” समजून अत्याधिक प्रखरतेने करत होता.)

प्रकाश  : काय ? कसा शक्य आहे हे , आता पर्यंत असे कुठे ऐकले नव्हते !

सुयोग : हो मी सुद्धा !

केदार : आजकाल शिवरायांचा इतिहास बदलण्याचे ब्रिगेडींचे प्रयत्न चालु आहेत. हाहाहाहा .... J

पुरुषोत्तम : तुम्ही लोकांनीच तो चुकीचा सादर केला, बहुजनांवर अन्याय तुमच्यातल्या ब्राम्हण लोकांनी केला . त्यांनी जे काही लिहिले ते साफ खोटे आहे . स्वतःला केद्रस्थानी ठेऊन त्यांनी अशी पुस्तके लोकांपुढे आणली . आणि आमच्या संघटनेकडून अश्या अन्यायकारक इतिहासाचे शुद्धीकरण होत असताना ते तुमच्या सारख्यांना देखवत नाही. हाहाहाहाहाहा J
(अत्याधिक कुत्सितपणे तो हसून मोकळा होतो )

केदार :  भावनिक आणि नाजूक गोष्टी अत्यंत गैर प्रकारे हाताळून तुम्ही लोकं त्याचा फक्त आणि फक्तच राजकीय फायदा घेण्यासाठी वापर करता .

प्रकाश  : राजकीय फायदयाचे ते कसे रे केदार ? आणि गोरगरीब जनतेवर समाजात जे उच्च नीच पणे त्यांना वागणूक दिली जाते , त्यांच्या वर अन्याय केला जातो .  मी बोललो ना,  मला एक माझा मित्र भेटला होता , तेव्हा तो सांगत होता कि केवळ बहुजन असल्यामुळे त्याला त्यांच्या गावातील पुरातन हनुमानाच्या मंदिरात जाऊन दिले जात नाही . मंदिरा बाहेरूनच त्यांना दर्शन घ्यावे लागते .
( प्रथमताच या प्रश्नांच्या वेळी केदार बुचकळ्यात पडला, समाजातील या पूर्वापार चालत असलेल्या काही अनिष्ट परंपरा यातून विचारलेल्या प्रश्नांचे काय उत्तर द्यावे ?? )

पुरुषोत्तम:  (अत्याधिक खुश होऊन )  एकदम रापचिक पोइंट काढलास प्रकाश ! अश्या अनेक गोष्टी आहेत . मी सुद्धा जिथे काम करायचे तिथला साहेब एक उच्च समाजाचा होता , त्यांनी हि  त्याच्या ऑफिसमध्ये असणाऱ्या  बहुजन लोकांना कधीच निट  वागवले नाही . कायम त्यांचा पाणउतारा करायचा !!

सुयोग : बोल केदार , काय म्हणशील यांवर ! हाहाहाहा...... J

केदार : (गंभीरपणे ) तसे पहिले तर तुम्ही मांडलेल्या या मुद्यावर मला काय बोलावे हेच कळत नाही .

सुयोग : म्हणजे  तू हरलास हे तू मान्य करतोस  हाहाहाहा.... J

पुरुषोत्तम : अगदी बरोबर ! होहोहोहो..... J

केदार : यात हरण्याचा प्रश्नच कुठे येतो ?? अरे या सर्व पूर्वापारपासून चालत आलेल्या काही अनिष्ट प्रवृत्ती आहेत त्या आजच्या अत्याधुनिक काळात हि तक धरून आहेत , याचे मूळ कारण म्हणजे आपल्या सारखेच काही विचारवंत आणि मूर्ख लोकं त्या परंपरा आंधळ्यासारख्या पाळत जात आहोत . यातून जर आपण स्वतःला लवकर मुक्त नाही केले तर नक्कीच आज जसा तुम्ही मला  निरुत्तर करण्यासाठी याचा फायदा करून घेत आहात त्याचप्रकारे अनेक राजकारणी लोकं स्वतःचा लोभ साधण्यासाठी याला खत पाणी घालण्याचा प्रयत्न करत राहनार ....

पुरुषोत्तम : मग , तू आधी मान्य कर कि अश्या अनिष्ट आणि बहुजनांवर अन्याय करणाऱ्या गोष्टी ब्राम्हनानीच सुरु केल्या आहेत ! हाहाहाहाहा .... J

केदार : ( किंचितसा  हसून )  अरे पुरुशोतामा , तुला आणि तुमच्या लोकांना जातीच्या राजकारणाशिवाय काय जमते काय रे ??  हाहाहाहाहा .... J 

सुयोग : म्हणजे ?

प्रकाश : म्हणजेssss…म्हणजे ...  नाकात दोन पाय असते .... हाहाहाहा .... J
(मुद्दाम सुयोग ची खेचण्यासाठी प्रकाश मधेच बोलला, केदार आणि प्रकाशला हसू आवारात नव्हतेआणि सारेच जण हसायला लागले, परंतु स्वतःला सावरत केदारने बोलायला सुरुवात केली ...... )

केदार : हे  बघा , प्रत्येक गोष्टीला या दोन बाजू असतात . त्यातली एखादी चांगली आणि वाईट हि असू शकते . जर तांदूळ निवडत असताना तांदळात खडे निघाले तर तांदूळ फेकून देत नाहीत , तर त्यातले खडे वेचून दूर केले जातात . आणि निवडलेल्या तांदळाची छांन शी खीर केली जाते . आपला समाज हि तसाच आहे. आपण सर्व अनेक  जाती धर्मान मधे विभागले गेलो आहोत . पण सर्वात पहिले आपण “मराठी” आहोत . शिवरायांनी “मराठी साम्राज्य” निर्माण केले आणि आपण ते जबाबदारीने ते सांभाळले पाहिजे . त्यांच्याच मुळे आपण “मराठी” म्हणून जगतो आहोत नाहीतर संपूर्ण हिंदुस्थान हां त्या काळच्या जुलमी मुस्लिम राजवटी खाली आला असता . ते म्हणतात ना – “अगर शिवाजी न होते, तो सुन्नत होती सबकी
प्रत्येक जाती धर्मात पहिले तर , काही चुकीच्या परंपरा आहेत किवा काही अनिष्ट लोकं होऊन हि गेली, किवा आज हि ती अस्तित्वात आहेत , त्यासाठी संपूर्ण जातच किवा एक ठराविक समाज च वाईट असतो असे गृहीत धरणे कितपत योग्य आहे . हल्ली काही संघटना अश्या गोष्टींचा फायदा घेऊनच  तरुणांची माथी भडकवण्याचा प्रयत्न करतात.
आणि हे बघ प्रकाश , तू म्हणाला अश्या अनेक अनिष्ट प्रथा बंद होण्यासाठी आपल्या सारख्या सुजाण आणि सुसंस्कृत लोकांनी पुढे होऊन अश्या अन्यायाचा प्रतिकार केला पाहिजे . तुझ्या त्या मित्राला संघटीत होऊन अश्या अन्याया पाठच्या चांडाळ चौकटीचा सामना करायला हवा. गप्प बसून स्वार्थ साधणाऱ्या लोकांविरुद्ध न्यायिक मार्गाने लढा दिला पाहिजे .

प्रकाश : अगदी बरोबर बोललास बघ !

केदार : (पुरुषोत्तम कडे एक कटाक्ष टाकत ... ) आणि पुरुषोत्तम साहेब, मघाशी तुम्ही सुधा अपप्रचार करत होतात कि शिवराय हे बौध धर्मीय आहेत म्हणून ....
(केदार ला मधेच थांबवून ... पुरुषोत्तम बोलू लागतो .)

पुरुषोत्तम : आहे काय ? आणि कसला अपप्रचार ? ते खरंच आहेत , आमच्या साहेबांनी हेच सांगितले आहे आम्हांला त्य दिवशीच्या भाषणात !

केदार : मग त्यांना म्हणावा द्या मग पुरावा .... !! हाहाहाहा J
(“पुरावा” हा एकच शब्द ऐकल्यावर सगळ्या ब्रिगेडीनची  बोलती पार बंद होत असते , आणि कुहाच्या कुठे हे ब्रिगेडी गायब होतात कुणास ठाऊक ?......... असो !, पुरुशोतामाचे हि असेच काही झाले होते , त्याच्या हि चेहऱ्याचा रागरंग पार उडाला होता . कारण केदार अत्यंत सुस्पष्ट आणि सर्वाचे दाखले देऊन बोलत होता  . आणि ते सर्वमान्य होत होते ... )

पुरुषोत्तम : (वेळ मारून नेण्यासाठी ...) आता साध्य माझ्याकडे काही नाही ! पण हे खरे आहे .

केदार :  ( मंद हास्य करत ..) तो तुमच्याकडे कधीच नसणार .... !
अरे पुरुशोतमा , शिवरायांचा जन्म शिवनेरी वर झाला. शिवनेरीवर शिवाई देवीचे मंदिर आहे.  आपल्याला बलवान पुत्र व्हावा या साठी जिजाऊ माँसाहेबांनी शिवाई देवीकडे नवस केला होता.  म्हणुन शिवाई देवी वरून जिजाऊ माँ साहेबांनी शिवाजींचे नामकरन केले “शिवबा” ...!!!! जिजाऊंनी त्या नवजात बाळाला स्वराज्य स्थापनेच्या कामासाठी अर्पण केले.

शिवरायांनी रायगड किल्ला उभारताना जगदिश्वराचे मंदिर उभारले. जर ते हिंदू देवतेत आस्था ठेवत नसते तर का उभारले असते मंदिर.शिवराय बौद्ध असते तर त्यांनी भिख्खुंना राज्याभिषेकासाठी बोलावले असतेपण तसे काहीच इतिहासात नमुद नाही. शिवरायांचा राज्याभिषेक सोहळा थाटामाटात पार पडला. शिवरायांची कुलदेवी तुळजाभवानी होती.
शिवराय उभ्या आयुष्यात फक्त तिघांच्या चरणीच नतमस्तक झाले.. माता पिता आणि भवानी माता !शहाजी राजांनी शिवरायांच्या शिक्षणासाठी काही व्यक्ती पाठविल्या होत्या. त्यांनी शिवाजींना श्रुतीस्मृतीपुराणेरामायणमहाभारतराजनिती शास्त्र ,अर्थ शास्त्रबहुविध भाषासुभाषिते इत्यादी वैदिक संस्कारज्ञान दिले व धनुर्विद्यादुर्ग दुर्गम करण्याचे ज्ञान म्हणजे दुर्गशास्त्र दुर्गम प्रदेशांतुन निसटुन जाण्याची कला दांडपट्टाभालाफेकघोडेस्वारी अशा अनेक प्रकारे ज्ञान दिले. या शिवाय शिवाजी राजांच्या तलवारीचे नाव " तुळजा " होते व दुसरी प्रसिद्ध तलवार ही " भवानी " होती हे आपण जाणतोच.शिवरायांच्या झेंड्याचा ध्वज भगवा आहेजो सनातन वैदिक हिंदू धर्मातला आहे. भारतातील बहुसंख्य राजपुत सहित इतरही राजे भगव्या झेंड्याखालीच राज्य चालवायचे.

शिवाजीराजे हिंदू मराठा होते तरी त्यांनी हिंदू धर्मातील सर्व जातींना समान वागणूक दिली हे सत्य आहेपण त्या मुळे शिवाजींनी हिंदूधर्म सोडला असे म्हणणे चुकिचे ठरेल...!”शिवरायांआधी देखील राणा प्रताप पृथ्विराज चौहान यांनी देखील भगव्या झेंड्याखाली अस्पृश्य जातींना समान वागणूक दिलेली आढळते. भिल्ल व लोहार सारख्या जाती त्यांच्या सैन्यात होत्या. शिवरायांनी देखील महाराष्ट्रातील १८ पगड जातींना एका हिंदूसुत्रात बांधले होते.
शोध करा,  शिवराय हिंदू असल्याचे अनेक पुरावे देता येतातपण शिवराय बौद्ध असल्याचे किंवा शिवाजींनी हिंदू धर्म सोडल्याचा एकही पुरावा देता येत नाही.

सुयोग :  (समर्पकपणे ....) हम्म्म्म .. !

प्रकाश : कळले का पुरुषोत्तम साहेब , उगाच काहीतरी काढतो आणि महाराजांनचा खोटा इतिहासाचा प्रचार होतो !
(सुयोग आणि प्रकाश च्या या बोलण्यातून केदार ला अतिशय समाधान लाभले , त्याच्या चेहऱ्या वरून ते साफ दिसत होते, परंतु  पुरुशोतामाचे चे अजून हि समाधान होत नव्हते .... )

पुरुषोत्तम : मग त्या परशुरामाचे चे काय ??

सुयोग : अरे हा केदार , त्या बद्दल तू काहीच बोलला नाहीस ते ??

प्रकाश : आहे का याचे हि उत्तर ? ( आपुलकीने विचारत , मंद हास्य करत बोलला ....)

केदार : अरे इतिहास हा उघड्या डोळ्यांनी पहायचा असतो, आणि तो स्वताचा आहे या भावनेने जगायचा असतो .... त्या तून खूप सारे शिकण्यासारखे आहे . चुकीचा इतिहास स्वीकारलात तर सर्वस्वी हानी आपलीच होते ....
ऐका मग,.... पूर्वीच्या काळी पितृआज्ञा ही प्रमाण मानली जाई. पित्याने केलेली आज्ञा मग ती चांगली असो अथवा वाईट तिचे पालन केले जाई. हा पुरुषसत्ताक संस्कृतीचा प्रभाव असू शकतो. रामाने देखील पितृआज्ञेचे पालन केल्याचे दिसते. त्याकाळी स्त्रीची योनिशुचिता हा प्रकार फार मोठ्या प्रमाणात अस्तित्वात होता. स्त्रीने परपुरुषाकडे नजर वर करून पाहू नये असा दंडक होता. मग इथे तर रेणुका भ्रमामुळे केवळ त्या गंधर्वाच्या जलक्रीडा – प्रणयाराधणेकडे आकर्षित झाली होतीमोहित झाली होती. हा फार मोठा अपराध समजला गेला. (आजही जे यावर आक्षेप घेतील त्या तथाकथित बुद्धिवंत आणि विचारवंतांनी स्वतः आपआपल्या पत्नीसह दुसऱ्या पुरुषाची जलक्रीडा प्रणय क्रीडा खुशाल पहावी व काय वाटते ते समाजाला सांगावे.) आता मृत्युदंडच का या गोष्टीवर.तर याचे उत्तर एकाच क्रोध. समाजात विविध स्वभावाची माणसे आपल्याला नेहमी दिसतात. काही माणसे छोट्याशा गोष्टीमुळे क्रोधाविष्ट होतात तर काही माणसे कितीही मोठी गोष्ट झाली तरी त्यांना अजिबात क्रोध येत नाही. जमदग्नी ऋषींची जन्मकथा पहिली तर त्यांच्या क्रोधाचे मुल त्यांच्या जन्मकथेत आहे. त्यामुळे परशुरामाला त्यांनी रेणुकेला मृत्युदंड देण्यास सांगितले. परशुरामानी आज्ञापालन का केलेहे आधीच सांगितले आहे. ज्यांना आक्षेप असेल त्यांनी ५ – ५० वर्षापुर्वीचा काळ  आठवावावडिलांची आज्ञा घरातील सर्व पाळतच होते. कारण पुरुषसत्ताक पद्धती आणि पुरुष हाच घरातील कर्ताधर्ता असायचा.
आता परशुराम हे  क्षत्रिय द्वेष्टा होते .... असे हि काही ब्रिगेडी सांगतात ...
भगवान परशुराम हे क्षत्रियांचे शत्रू होतेअसा जो भ्रम पसरविला जातोतो पूर्णपणे खोटा आहे. रामायणात असे उल्लेख आहेत की ज्यावरून सिद्ध होते,परशुराम हे राजा दशरथ आणि राजा जनक यांच्याकडे नेहमी जायचे.ते पण नेहमीच परशुरामाचे आदरातिथ्य करायचे आणि भगवान त्यांना आशीर्वाद ही द्यायचे. याचे स्पष्ट उदाहरण सीतास्वयंवर आहेज्यात अनेक राजे होते. जर भगवान परशुरामांनी सर्व क्षत्रियांना मारले असते तर हे सगळे राजे तेव्हा आनंदाने राज्य कसे करत होते.पण प्रभू त्याच्यावर प्रसन्न होते कारण ते धर्मपूर्वक राज्य करत होते आणि प्रभू रामचन्द्रांशी भेट होईपर्यंत परशुरामांचे अवतारकार्य सुरु होते. अर्थात अधार्मिकांविरुद्ध युद्ध सुरूच होते. तरीही धर्मपूर्वक राज्य करणारे राजे तेव्हा होतेच. 
(मधेच केदार ला थांबवत पुरुषोत्तम बोलू लागला .....)

पुरुषोत्तम : परशुराम पृथ्वीवरील पहिला आतंकवादी होता.... तसेच कर्ण क्षत्रिय होता म्हणून परशुराम याने त्याला शाप दिला होता .
(देव असू किवा देवासमान  असणारी कोणी  हि व्यक्ती असू  ब्रिगेडी त्यांचा एकेरी उल्लेखच करतात कारण त्यांना स्वधर्म , आणि स्वसंस्कृती विषयीचा यत्किंचित हि आदर नसतो आणि हीच लोकं दुसर्यांना इतिहासाची तोडमोड करून खोटा इतिहास माथी मारून माथी भडकवण्याचा काम आवर्जून करताना दिसतात. स्वतःच्या संघटनेचे नाव हि संभाजीराजांचा यथेच्छ अपमान करणारेच आहे ....  काय म्हणावे या मूर्ख लोकांना .)

केदार :  साफ खोटे आहे हे....  परशुराम हे केवळ आणि केवळ आततायी व द्युष्ट दुराचारी क्षत्रियांचा विरोधक होते. तसेच परशुराम हे समाज सुधारणा आणि जनतेला रोजगारक्षम बनविणारे नायक देखील आहे. केरळकच्छआणि कोकण क्षेत्रात परशुरामाने समुद्रात बुडालेली शेतीयोग्य जमीन शेती कसण्यासाठी पुन्हा तयार केलीआणि पशूंच्या सहाय्याने जंगलांना दूर करून जमिनीला शेती कसण्यायोग्य करवली. कार्तवीर्य अर्जुन व हैहय वंश विनाशानंतर परशुरामाने समाज सुधारणेसाठी कृषी प्रकल्पांचे कार्य केले. केरळकोकणमलबार आणि कछ या ठिकाणाची अशी भूमी समुद्रातून बाहेर काढली जी कृषी साठी उपयुक्त ठरू शकते. या वेळी  कश्यप ऋषी आणि इंद्र समुद्री पाण्याला बाहेर काढण्याच्या तंत्रात निपुण होते.  परशुरामाने याच क्षेत्रामध्ये परशूच्या सहाय्याने रचनात्मक कार्य केले. शुद्र समजल्या जाणाऱ्या लोकांना त्याने वने कापण्याच्या कामासाठी जुंपले आणि सुपीक जमीन तयार करून धान्याची पैदावर केली. याच शूद्रांना परशुरामाने शिक्षित व दीक्षित केले व त्यांना ब्राह्मण करवले. (वर्ण व्यवस्था जन्मावर नव्हे तर कर्मावर आधारलेली असल्याचे सत्य उदाहरण) तसेच त्यांना यज्ञोपवीत संस्काराने जोडले आणि त्याकाळी जे दुराचारी व आचरण हीन ब्राह्मण होते त्यांना शुद्र घोषित केलेत्यांचा सामाजिक बहिष्कार केला. तसेच अक्षय तृतीयेच्या दिवशी हजारो युवक युवतींचा विवाह केला. परशुरामाच्या द्वारे अक्षय तृतीयेला सामुहिक विवाह केल्या जाण्याच्या कारणाने या दिवशी विना मुहूर्त पाहता विवाह करण्याची परंपरा आजही पाळली जाते.
परशुरामाचे अंत्योदयाचे प्रकल्प अनुकरणीय आणि अनोखे आहेत. ज्यांना रेखांकित करणे आवश्यक आहे. भगवान परशुराम यांचा काळ एवढा प्राचीन आहे कि त्याचे एकाएकी आकलन करणे अशक्य आहे.....
आणि कर्ण आणि परशुराम यांची कथा महाभारतात येते. परशुरामाने केवळ ब्राह्मण युवकाला शस्त्र विद्या देण्याची प्रतिज्ञा केली होती. (भीष्म क्षत्रियाने  ब्रह्मचर्याची प्रतिज्ञा केली म्हणून तो नपुंसक ठरत नाही) परंतु कर्णाने परशुरामाकडून ब्राह्मण असल्याचे खोटे सांगून विद्या ग्रहण केली. हे जेव्हा परशुरामांना समजले तेव्हा त्याने त्याला शाप दिला.

पूर्वीच्या काळी गुरु शिष्य यांतील नाते संबंध हे पारदर्शक असत. शिष्याने गुरुपासून कोणतीही गोष्ट लपवू नये असा सामाजिक संकेत असे. आजपासून १००-१५० वर्षापर्यंतही हा संकेत व्यवस्थित पाळला जात असे. गुरु पासून शिष्याने एखादी गोष्ट लपवली तर गुरु नाराज होईक्रोधीत होत असे आणि शिक्षा करत असत. शाळेतील जुने दिवस आठवले तर यातील अर्थ कळेल. त्यामुळे कर्ण खोटे बोलला त्याची शिक्षा म्हणून परशुरामानी त्याला शाप दिला न कि तो ब्राह्मण नसल्याने दिला. त्यामुळे हा आरोप देखील निराधार आहे.
या सर्व घटनांवरून समजते कीपरशुराम हे अन्यायाविरुद्ध लढणारेगरीब जनतेला साहाय्य करणारेकृषी संस्कृती व रोजगार संस्कृती वाढवणारेआज्ञाधारक पुत्रअधर्म संहारक असे युगपुरुष होते.

ते  बहुजनांचा आधार होते शत्रू नव्हे. अपप्रचार करणाऱ्यांनी मेंदू असल्यासारखे बोललेवागलेलिहिले तर चांगलेच. नाहीतर जनता जनार्दन  अशा नीच आणि ढोंगीपाखंडी समाज कंटकांना त्यांचे थोबाड रंगवून त्यांची लायकी काय आहे ते दाखवल्याशिवाय  स्वस्थ नाही बसणार....
(केदार ने दिलेल्या उत्तराने पुन्हा सर्वांचे समाधान झाले असावे , कि नाही वाचा पुढील भागात – जय शिवराय !)
क्रमशः -

गुरुवार, ११ जून, २०१५

" चार मित्रांची गोष्ट " - तिथी कि तारीख ?? ( भाग -३)




" चार मित्रांची गोष्ट "

भाग 3.

(नेहमीचीच वेळ … सारे जण गच्चीवर नेहमीसारखे जमा होणार होते , फक्त विचाराने एकमेकास शह देण्यासाठी ... आज जणू काही हिंदुस्थान आणि पाकिस्तान चा सामना असल्या सारखे वाटत होते आणि तसे पहिले तर साहजिकच प्रत्येक जण हा स्वतःला फक्त हिंदुस्थान चाच समजत होता, असो ....)
पुन्हा एकदा गच्चीवर मैफिल जमणार होती . पण केदार कुठे दिसत नव्हता .....

प्रकाश : अरे हां केदार कुठे राहिला आता ?


पुरुषोत्तम : (उन्न्मतपणे ) आज यायला घाबरला असेल , काल तर लय बोलत होता . आज शेपूट गुंडाळून लपला असेल कुठेतरी !


प्रकाश : फोन सुद्धा लागत नाही . बहुतेक विचार बदलला असेल इकडे यायचा म्हणून तर नाही ??


सुयोग : ह्म्म्म , हां यार इतक्या वेळात यायला हवं होता.. त्याने यार ...


सुयोग : खूप.. वातावरणात गर्मी वाढलीय यार .....


पुरुषोतम : बघ ६ जून पर्यंत राज्याभिषेक पर्यंत पाऊस पडणार आणि बघ कशे सगळे तिथी वाले कसे धुवून निघतात ते . हाहाहा ...


केदार : आणि जर त्या आधीच ३१ च्या तिथीला पाऊस होऊन सगळे तारीखेवाल्यांचे विचार शुद्ध झाले तर ?
( अचानक आलेल्या या आवाजाने , सर्व अश्यार्याचकीत होतात )


प्रकाश : या या केदार भाऊ ! मला तर वाटले कि आज तुम्ही काय दर्शन देत नाहीत !


पुरुषोत्तम : हाहाहा : J (मनमोकळे पण कुत्सित पणे पुरुषोत्तम हसतो )


केदार : शिवाजी राजांची शप्पथ ! आज मी एकटा च तुम्हाला पुरेसा आहे रे ! माइंड इट !!..


सुयोग : वाद घाला रे, पण जरा प्रेमाने !


प्रकाश : हां घे प्रेमाचा दिवाना ..... होहोहो 


सुयोग : गप रे पक्क्या ! विषय काय आणि तुझा चाललाय काय ?? करा मग कोण बोलणार प्रथम ?


पुरुषोत्तम : ( जसे काय फायनल जिंकल्या सारखा ) प्रथम काय प्रथम ....? शेवट च सांगतो ना, तारीखच आम्ही मानतो आणि त्या नुसारच प्रत्येक शिव कार्य करणार . फक्त एकच धुन ६ जुन ६ जुन .....


प्रकाश : (अति उस्ताहात ....) वा काय पंच मारलाय ! काय मग करायची का सुरवात ? फक्तच एकाच धून ......


सुयोग : केदार ला हि धून आवडणार नाही , नक्कीच हाहाहा


केदार : हाहाहा : बरोबर बोललास .... धून वरून लक्षात आले हि तर संभाजी ब्रिगेड ची सध्याची स्लोगन आहे. हाहाहा .... म्हणजे पुरुषोत्तम नक्कीच ब्रिगेडी कार्यकर्ता दिसतोय .


पुरुषोत्तम : अरे दिसतो नाही आहेच ! आणि प्रकाश आणि सुयोग पण सभासद होणार आहेत .


केदार : काय ??


प्रकाश : मग , लगा लगा लगा ... शॉट लगा..... हाहाहा:


केदार : (पुरुषोत्तम ला उदेशून ....) पुरुषोत्तम , अरे काय ती ब्रिगेडी विचारधारा, जातीचे राजकारण करणारी लोकं , खरंच तू जे करतोयेस ते कितपत योग्य आहे ?? आणि यानांहि भरडलेस याच्यात ...


प्रकाश : ( मैत्री पोटी केदार ने बोललेल्या बोलण्यातून सुयोग आणि प्रकाश चा अहंभाव दुखावला गेला होता )
हे बघ केदार ! तसे पहिले तर तूच चुकातोयेस .शिवरायांच्या राज्याभिषेकास खोडा घालनार्यांची जात कोनती होती ? शिवरायांना डाव्या पायाच्या अंगठ्यान तिलक करनार्यांची भामटी जात कोनती होती? आणि जाती चे राजकारण कोणाला बोलतोस ??
(प्रकाश हि गंभीर पणे उत्तरला ...)


केदार : हे चुकीची माहिती आहे .


(केदार ला विषयाचे गांभीर्य उमजले होते .)

पुरुषोत्तम : "परशुरामाने पृथ्वी नि:क्षत्रिय केल्यामुळे कलियुगात क्षत्रिय उरलेले नाहीत त्यामुळे ब्राह्मण आणि शुद्र हे दोनच वर्ण उरले आहेत, त्यामुळे शिवाजी महाराज हे शुद्र आहेत आणि शूद्राला राज्याभिषेकाचा अधिकार नाही" असा दावा करून छत्रपति शिवरायांच्या राज्याभिषेकाला महाराष्ट्रातील ब्राह्मणांनी विरोध केला त्यामुळे शिवरायांनी काशीहून गागाभट्टला आणून राज्याभिषेक करवून घेतला"
( पुरुषोत्तमाने हि याच विषयाला अधिक हवा देण्याचा प्रयत्न केला )


केदार : पुरुषोत्तम , तुमच्याकडे काय पुरावा आहे ? यासर्वाचा ?? गागाभट्ट यांनाच राज्याभिषेक करण्यासाठी का बोलावण्यात आले? या पाठचा खरं कारण वेगळे आहे .


पुरुषोत्तम : आहे माझ्याकडे पुरावा , आम्ही खरा इतिहास जाणतो आणि तोच स्विकारतो .


केदार : नका सांगू तुमचे इतिहासातले ज्ञान ... हाहाहा : तुमची ती अर्धवट पिवळी पुस्तके पहिलीत मी हाहाहा ....


(केदार च्या या बोलण्याने पुरुषोत्तमच्या मनात रागाचा पारा थोडा वाढलेला असतो... पण तो काही बोलणार इतक्यात मधेच सुयोग चालू होतो . )


सुयोग : हो का , मग तू सांग बर काय ते कारण .....

केदार : मग ऐक ,
पैठण येथे भट्ट घराणे नावाजलेले घराणे म्हणून ओळखले जात असे, १६ व्या शतकाच्या सुरुवातीस याच भट्ट घराण्यातील एक विद्वान गोविंदभट्ट हे काशीक्षेत्री स्थायिक झाले, तेथे त्यांच्या पिढीत गागाभट्ट यांचा जन्म झाला, त्यांनी अनेक ग्रंथ लिहिले होते, तसेच काशीतील त्यांच्या घराण्याची सत्ता असलेले एक विद्यापीठाचे कुलगुरू म्हणून गागाभट्टांची निवड झाली होती, यासोबतच काशीत भरवल्या जाणार्या विद्वत्तसभेत अग्रपूजेचा मानदेखील याच भट्ट घराण्याकडे होता. थोडक्यात, हे भट्ट घराणे आजच्या गांधी घराण्यासारखे अत्युच्च शिखरावर असलेले घराणे होते.
सभासद बखरीत गागाभट्ट यांचे वर्णन "कलीयुगीचा ब्रह्मदेव" असे आहे, त्यांनी "कायस्थधर्मप्रदीप" हा ग्रंथ लिहून कायस्थ हेसुद्धा क्षत्रियच आहेत याचा निर्वाळा दिला, ज्याअर्थी त्यांना "कलीयुगीचा ब्रह्मदेव" पदवी दिली गेली त्याअर्थी त्यांचे विचार हे सर्व ब्राह्मणांसाठी पूज्य आणि ग्राह्य मानले जाणे स्वाभाविक आहे. कायस्थधर्मप्रदीप मधून त्यांनी कलियुगात क्षत्रिय आहेत हे दाखवून दिले होते, तसेच 'परशुरामाने पृथ्वी निःक्षत्रिय केली त्यामुळे ब्राह्मण व शुद्र हे दोनच वर्ण उरले' या दाव्यालादेखील सुरुंग लावला, मग अशा विद्वान व पूज्य व्यक्तीच्या मताला विरोध करून "कलियुगात क्षत्रिय उरलेच नाहीत" असा दावा करण्याची आणि तो सिद्ध करण्याची ताकद कोणत्याच ब्राह्मणात नव्हती. मग महाराष्ट्रातील ब्राह्मणांनी महाराजांना या दाव्याद्वारे विरोध केला असे कसे म्हणता येईल? अनंतदेव भट्ट हे गागाभट्ट यांचे बंधू पैठणला राहत असत, गागाभट्ट कोकणात सन १६६३ मध्ये आले होते, तेव्हा सन १६६४ च्या सुरुवातीस त्यांनी शिवरायांच्या आज्ञेवरून शेणवी जातींच्या लोकांच्या भांडणाचा निवडा राजापुरात जाहीर सभेत करून दिला, त्यानंतर सन १६६९ ते १६७२ या काळात त्यांनी कायस्थ प्रभू जातीच्या लोकांचे निवाडेही करून दिले, महाराजांना त्यांच्याबद्दल बराच आदर होता, शेणवी जातीचा निवडा महाराजांना आवडला त्यामुळे त्या निवाड्यास महाराजांनी स्वतःहून प्रशस्ती (शिवप्रशस्ती) जोडली होती.
वरील सर्व कारणे, तसेच मूळ भट्ट घराण्याची महत्ता, हाती असलेले धार्मिक अधिकार, अत्युच्च विद्वत्ता व "परशुरामाने पृथ्वी निःक्षत्रिय केली" यासारख्या खोडसाळ दाव्यांना योग्य पुराव्यानिशी खोडून काढणे, तसेच मूळ पीठ काशी येथे या घराण्याला व खुद्द गागाभट्ट यांना असलेला मान यामुळे राज्याभिषेकाचे पौरोहित्य करण्याचा मान गागाभट्ट यांना देण्यात आला होता.
गागाभट्ट इसवी सन १६७३ ला नाशिकला आले, तेव्हा महाराजांना त्यांच्या आगमनाची वार्ता कळली, गागाभट्ट तेथून पैठणला अनंतदेव भट्ट यांच्याकडे गेले तेव्हा महाराजांनी त्यांना रायगडवर येण्याचे निमंत्रण पाठवले व येण्यासाठी पालखीची सोय केली, म्हणजे याचा अर्थ असा होतो कि गागाभट्ट हे स्वतःहून काशीतून महाराष्ट्रात आले होते, व इथे आल्यावर त्यांना महाराजांकडून बोलावणे आले होते, त्यामुळे गागाभट्ट यांना काशीतून बोलावले हे असत्य असल्याचे सिद्ध होते.
त्यानंतर गागाभट्ट सन १६७४ ला रायगडावर आले, तेव्हा त्यांना राज्याभिषेकाची कोणतीही कल्पना नव्हती मात्र भेटीत महाराजांनी त्यांना राज्याभिषेकाची कल्पना दिली, तेव्हा गागाभट्ट यांनी तिथी निश्चित केली व परत पैठणला आले, व तेथे त्यांनी राज्याभिषेकप्रयोग आणि तुलापुरुष दानविधी हे दोन ग्रंथ लिहिले व त्यानंतर राज्याभिषेकाची सिद्धता करण्यासाठी परत रायगडी आले.
जर गागाभट्ट यांना काशीमध्ये राज्याभिषेकाची बातमी कळली असती तर ते काशीहून तडक रायगडला आले असते व येतानाच दोन्ही ग्रंथ लिहून आणले असते, पण असे काही घडलेले दिसत नाही त्यामुळे त्यांना महाराष्ट्रात पैठणला येईपर्यंत राज्याभिषेकाची कल्पना नव्हती हे सिद्ध होते.


(मग ऐक ... म्हणून केदार ने सुरु केलेले बोलणे , आणि दिलेल्या दाखल्याने सर्वांचेच धाबे दणाणले ...)
(तरी पण इतक्यात हार मारणारे कोणीच नव्हते , प्रकाश ने नी जाती ला अनुसरून सूर आवळायला सुरुवात केली ..)


प्रकाश : नाही केदार , तरी पण काही ब्राह्मणांनी राज्याभिषेकाला विरोध केलाच .....
केदार : अरे बाल्या , कार्र्र असं बोलू राहिलाय ... ( काहीशी आगरी स्टाईल मारत केदार मिश्किलपणे बोलला ...)
प्रकाश : मका समजोतचss नाय बघ ! ( आगरी ला कोकणी भाषेत उत्तर प्रकाश ने दिले )
( सुयोग ला हसू आले )
सुयोग : ह्म्म्म , केदार या चा अजून काय पुरावा आहे का तुझ्याकडे ?
केदार : आहे ना ... आणि (पुरुषोत्तम कडे पाहत ..) पुराव्या शिवाय मी खोटे दाखले मांडत हि नाही आणि कोणाला ज्ञान देत नाही ...
( पुरुषोत्तम रागाने लाल बुंद झलेला असतो , पण स्वतःला सावरण्याचा निष्फळ प्रयत्न करत असतो ...)
केदार : सर्वप्रथम शिवरायांच्या क्षत्रियत्वाची माहिती घेऊ -
सन १६५६ मध्ये शिवरायांनी चंद्रराव मोर्यास लिहिलेल्या पत्रात महाराज म्हणतात, "राजे आम्ही, आम्हास श्रीशंभूने राज्य दिधले आहे". यावरून दिसून येते कि महाराजांना आपण राजे आहोत अर्थातच क्षत्रिय आहोत याची जाणीव याआधीपासूनच होती, पण त्यांना हे कळले कधी व कसे हे महत्त्वाचे आहे.
स्वतः शिवराय, त्यांचे कुटुंबीय (शहाजीराजे, बंधू संभाजी व जिजाऊसाहेब) व त्यांचे आप्तस्वकीय म्हणजेच अष्टप्रधान मंडळ यांना भोसले कुटुंबीय "सिसोदिया वंशीय राजपूत क्षत्रिय" असल्याचे अगदी पूर्वीपासूनच माहिती होते, याचा पुरावा मिळतो शहाजी राजांनी विजापूर दरबारला लिहिलेल्या पत्रात, एका मुस्लिम सरदाराने शहाजी राजांना राजपूत मानण्यास नकार दिला असता राजांनी त्या पत्रातून "आम्ही तो राजपूत" (आम्ही तर राजपूत) असे विजापूर दरबाराला ठणकावून सांगितले आहे, तसेच शहाजी राजांचा राजकवी 'जयराम पिंडे' याने "राधामाधवविलासचम्पू" या ग्रंथात शहाजी राजांना "सिसोदिया अवतंस" म्हणजे सिसोदिया वंशीय म्हटले आहे, आणि शिवरायांचे ज्येष्ठ बंधू संभाजीराजे यांना त्याने "क्षत्रियगोत्री" असे विशेषण लावले आहे.
"राधामाधवविलासचम्पू" हा ग्रंथ जयरामने शिवरायांचे बंधू संभाजीराजे हे हयात असताना लिहिलेला आहे, साधारण सन १६५० अगोदर, याचा अर्थ असा होतो कि आपण शिवराय 'क्षत्रिय' कुळातले आहेत हे महाराष्ट्राला सन १६५० च्या अगोदर पासूनच माहिती होते, मग ऐन राज्याभिषेकाच्या वेळी एखादा ब्राह्मण त्यांच्या क्षत्रियत्वावर शंका कशाला आणि का घेईल?
यासंबंधी अजून एक पुरावा देता येतो, तो म्हणजे, 'कवी भूषण' याचा 'शिवराजभूषण' हा काव्यमय ग्रंथ, हा कवी भूषण सन १६६२ मध्ये स्वराज्यात आला, महाराज आग्र्याहून परत आल्यावर त्याने महाराजांच्या पराक्रमावर 'शिवराजभूषण' हा काव्यमय ग्रंथ रचण्यास सुरुवात केली, या ग्रंथात सुरुवातीलाच ४ थ्या ते १० व्या छंदात तो महाराजांच्या पूर्वजांचा इतिहास सांगतो, तो म्हणतो,
"सर्व पृथ्वीचे भूषण म्हणून सुर्यवंश प्रसिद्ध आहे…या वंशातील एका राजाने देवाला आपले सीस (शीर) अर्पण केल्याने त्यांच्या वंशाला 'सिसोदिया' असे नाव मिळाले…याच वंशात मालमकरंद (मालोजी) नावाचा पुरुष जन्मला…तो रणावर शिलेसारखा दृढ असल्याने त्याला 'भौंसिला' हे नाव मिळाले…त्याला पृथ्वीचे भूषण असा शहाजी नावाचा पुत्र झाला…" (मूळ ब्रज भाषा, इथे मराठी भाषांतर).
हा ग्रंथ सन १६६६ मध्ये रचण्यास सुरुवात झाली आणि सुरुवातीलाच भोसले कुटुंबाची वंशावळ सांगितली गेली आहे, म्हणजे पूर्वीचा पुरावा एखाद्याने अमान्य केला तरी या पुराव्यानुसार, शिवाजी राजे 'क्षत्रिय' कुळातले होते हे राज्याभिषेकाच्या किमान ८ वर्षे अगोदरपासून महाराष्ट्राला माहिती होते, मग तरीसुद्धा एखादा ब्राह्मण नेमका राज्याभिषेकाच्या आधी महाराजांच्या क्षत्रियत्वावर प्रश्न निर्माण करतो असे होणे पूर्णतः अशक्य आहे. आणि म्हणूनच हे पुरावे ग्राह्य धरून आपण म्हणू शकतो कि शिवरायांच्या क्षत्रियत्वावर शंका घेण्यासाठी कोणत्याही ब्राह्मणाकडे कोणतेही कारण नव्हते, म्हणूनच महाराजांच्या राज्याभिषेकाला कोणत्याही ब्राह्मणाने विरोध केला नाही.


सुयोग : मानले यार केदार तुला , किती सुंदर माहिती दिलीस , माझही तर पक्की खात्री झालीय आता कि नक्कीच महाराजांच्या राज्याभिषेकाला कोणत्याही ब्राह्मणाने विरोध केला नाही.
(प्रकाश हि केदार च्या व्यक्तव्यापुढे पुरता निरुतर झाला , कारण त्याच्या कडे शिवचरित्राचा पूर्णता अभ्यास नव्हता , जे काही होते ते अर्धवट विचारांच्या लोकांच्या डोक्यातले अर्धवट विचार ...पण पुरुशोतामाने जाणून बुजून एक नवीन मुद्धा उकरून काढलाच ....)


पुरुषोत्तम : "मी आधी बाबासाहेब पुरंदरे यांचे 'राजा शिवछत्रपति' हे पुस्तक वाचून मुस्लिमद्वेषी झालो होतो, पण आता ब्रिगेडने मला सुधारले आहे". (या तो पुढे म्हणतो... कि) "ब्राह्मणांना देशात राहण्याचा अधिकार नाही."


केदार : शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे हे खरोखर मुस्लिमद्वेषी आहेत का? तर याचे उत्तर नाही असे मी ठामपणे सांगू शकतो. कारणबाबासाहेब पुरंदरे हे आजतागायत इस्लामचा आणि मोहम्मद पैगंबरांचा आदर करत आहेत. तसे त्यांनी 'राजा शिवछत्रपति' या ग्रंथात दाखवून दिले आहे. त्यांच्यावर आरोप करणाऱ्यांनी एकतर तो ग्रंथ वाचलेला नाहीये किंवा ते मुद्दाम बाबासाहेबांना ब्राह्मण म्हणून टार्गेट करत आहेत.


(प्रत्येक बोलण्याला... केदार कडे सडेतोड उत्तर होतेच ..... )

(चर्चा अशीच पुढे जोरात चालू होती ..... आणि एक एक ब्रिगेडी कुरापाती विचारांना केदार आपल्या मित्रांच्या डोक्यातून पुरता नाहीसा करत जात होता. )
पुढे वाचायला विसरू नका , या चर्चेतले अनेक मुद्धे आणि केदार चे प्रत्येक हजर जबाबी उत्तर ....जे त्याला एका उच्च स्थानी नकळत घेऊन जात होते... आणि त्याच्या मित्रांच्या मनातहि त्याच्या विषयीचा हळू हळू आदर भाव कसा निर्माण होत गेला हे वाचायला विसरू नका........ उर्वरित भाग लवकरच ! – जय शिवराय !

" चार मित्रांची गोष्ट " - तिथी कि तारीख ?? ( भाग -२ )







" चार मित्रांची गोष्ट "

भाग २.

केदार : पण त्या इंग्रजी कालगणनेत सुद्धा एक सूत्रता आहे का ? याचा विचार आपण कधी केला आहे का ? तिथे सुद्धा श्रीशिवछत्रपतिंच्या जयंती बद्दल यावर एकचं उत्तर नाही ......
इंग्रजी कालगणना आणि त्यामधील त्रुटींमुळे इसवी सन १५८२ साली पोप ग्रेगरी यांनी बाद केले व ४ ऑक्टोबर १५८२ नंतर पुढील दिवस १५ ऑक्टोबर १५८२ आहे असे समजावे असा फतवा काढला. अर्थात त्यातील त्यांनी त्या वर्षातील १० दिवस बाद केले. युरोपातील कॅथॉलिक देशांनी ताबडतोब नव्या ग्रेग्रोरियन कॅलेंडरचा स्वीकार केला. परंतू जगभर साम्राज्य प्रस्थापित करणाऱ्या प्रोटेस्टंट ब्रिटनने मात्र २ सप्टेंबर १७५२ पर्यंत ग्रेग्रोरियन कॅलेंडरचा स्वीकार केला नाही. ब्रिटनच्या साम्राज्यात ज्युलियन कॅलेंडर प्रमाणेच कालगणना चालू राहिली. अर्थातच भारतातही सारा इतिहास हा ज्युलियन दिनांकात रुपांतर करण्यात आले. १७५२ साली २ सप्टेंबरच्या पुढील दिवस १४ सप्टेंबर असेल, असे घोषित ब्रिटनने ग्रेग्रोरियन कॅलेंडरशी जुळवून घेतले.
अर्थातचं मग आपणचं का ज्युलियन कॅलेंडर प्रमाणेच कालगणनचे स्वीकार करून आपल्या हिंदूस्थानातील तिथी संस्कृतीला दुरावा का देतो ??????

(केदार च्या या उत्तराने सर्वच गार पडले, कारण मुळात केदार चा या विषयीचा अभ्यास पक्का होता आणि आपण जे करतो आहोत आणि का करतो आहोत या बद्दल तो पूर्णतः स्वतः विषयी निश्चयी होता. परंतु या उत्तराने पुरुशोतमातला मुळची असलेली ब्रिगेडी (उपद्रवी) प्रवृत्ती जागी झाली.)

पुरुषोत्तम: ६ जून रोजी छत्रपती शिवाजी महाराज राज्याभिषेक आहे. मी रायगडावर असलेल्या माझ्या देवा जवळ दिवा पेटवणार आहे , उद्या संध्याकाळी . सर्वाना आमंत्रण , पुरुषोत्तम , एक जातिवंत मावळा !

केदार: तिथी नुसार जयंती साजरी करण्याचा आनंदच वेगळा असतो.

सुयोग : मी दोन्ही करतो .

पुरुषोत्तम : आता तिथीप्रमाणे शिवजयंती वा शिवराजाभिषेक साजरे करणारे भरकटलेले शिवभक्त यांना शिवरायांचा कोणताही उत्सव हा तारीख प्रमाणे नेच करावा .

केदार: हेच चुकीचे आहे.

प्रकाश : मला नाही वाटत .

केदार: स्व संस्कृती, स्व भाषा, स्व इतिहास, यांचा नितांत अभिमान का असू नये ? आणि त्यातूनच या थोर महापुरुषा नाचे खरे महत्त्व टिकवले का जाऊ नये ??. आणि त्यातूनच त्यांना खरे ग्लोबल होतील याची भावना तुम्हा आम्हास का मान्य नाही ??? .

पुरुषोत्तम : इंग्रजी कालगणना हि इसवी १ पासून सुरु झाली व आज तगायत २०१५ पर्यंत चालू आहे आणि चालू राहणार यात शंका घेण्याचा वाव नाही. जगाच्या पाठीवर कोटयावधीच्या संख्येमध्ये शिवभक्त आहे. हे सर्व शिवभक्त जिवापेक्षाही जास्त छत्रपती शिवरायांवर प्रेम करतात. या शिवभक्तांना दिशाहिन करण्यासाठी काही मंडळी शिवजयंती ही तिथी प्रमाणे साजरा करण्याबाबत आग्रह धरतात. या मध्ये त्यांचे शिवप्रेम नाही अस नाही पण ते छत्रपती शिवराय यांना पंचागामध्ये बंदिस्त करु इच्छीतात. . (केदार ला तोंड देण्यासाठी पुरुशोतामाने हि आपले मत मांडले )

सुयोग : मला तर अभिमान आहे , म्हणून तर मी एवढे करतोय . मला तारीख आणि तिथी दोन्ही मान्य आहेत .

प्रकाश : आणि हे सर्व त्या ब्राह्मणांचेच कारस्थान आहे.

केदार : हे बघ सुयोग, अभिमाना सोबत आचरण हि महत्त्वाचे आहे. आणि पक्या तू सुद्धा त्या मूर्ख ब्रिगेडी लोकांसारखं विचार करायला लागलास ?
( केदार च्या या नकळत मारलेला टोमणा, पुरुषोत्तम च्या मनाला चांगलाच झोबला होता . )

सुयोग : माझे आचरण हि आहे रे .

केदार : पुरुषोत्तम, तू जे म्हणतो ते कितपत योग्य वाटते तुला? मी हि हेच म्हणेल कि तु संपूर्ण विचार केलेला दिसतच नाही.

पुरुषोत्तम : म्हणजे काय म्हणायचे काय तुला ? आता तू मला ज्ञान शिकव ..
(आता केदार ला मुलत: संभाजी ब्रिगेड चा असलेला पुरुषोत्तम भिडत होता, खरंतर त्याचा अहंकार केदार मुळे नकळत दुखावला जो गेला होता.... )

केदार : सरळ सोपी गोष्ट आहे, कि तुम्हाला तुमच्या संस्कृती चा आणि इतिहासाचा कितपत अभिमान आहे ? आणि दुसर्यांच्या कालगणना पद्धत तुम्हाला योग्य वाटते ? काय साध्य करणार तुम्ही ??
तारखेला महत्व देऊन नवीन पिढी साठी चुकीच्या समजुती निर्माण् होतात. ज्यानी अन्यायाबद्दल लढून आयुष्य बलिदान केले त्यां थोर महात्म्याना आपण काय देत आहोत ?
(हसण्या खेळण्याचे बोलणे गंभीर स्वरूप धारण करू लागले होते . शिव विचारारांच्या चर्चात असतेच एवढे सामर्थ्य ...)

सुयोग: पहिले लोकांनी ते साजरे करायला हवेत .

प्रकाश: आणि लोक ते करणार नाहीच . हे मला पक्के ठाऊक आहे .

केदार : सर्वांनी असा विचार केलात , मग सुरुवात कोण करणार ?? बोला ?
सुयोग आणि प्रकाश .... सुरवात “स्व” ता पासून केलेली नेहमीच चांगली.. तूमी स्वतः आधी मान्य केलीत तर इतर हळूहळू इतर आजूबाजूची हि लोकं विचार करू लागतील . आणि नंतर हळूहळू पूर्ण जगच विचार करायला लागेल .

पुरुषोत्तम : कसला अभिमान आणि कोणत्या समजुती ? आणि कसले आले विचार ??? आता तू आम्हांला शिवकार्य आणि ते करायचे ज्ञान शिकवणार ? काय बोलतोयेस याचा भान आहे का तुला??? हाहाहाहा:
( पुरुषोत्तम राग आवळून पुरुषोत्तम मोठमोठ्याने हसण्याचा प्रयत्न करतो)

केदार : हाहाहा , पुरुषोत्तम साहेब शिवकार्य शिकवावे लागत नसते . ते आपोआपच जन्मतःच असते . आणि योग्य वेळी आपण आपल्या परीने ते करतच असतो .

पुरुषोत्तम : म्हणजे काय टोनिक आहे का ? त्या बाळकडू पिक्चर सारखं ...... हाहाहाहः

केदार : हो हवं तर तसाच म्हणा , आम्हां मराठी जणांना शिवकार्याचे बाळकडू या स्वराज्याच्या भूमीत जन्मल्यावर आपोआप मिळते .

सुयोग : लय भारी !!

पुरुषोत्तम : म्हणजे तू तेवढा एकटा मराठी , आणि आम्ही कोण ? स्वतःला लय शांना समजतोय लेका , जरा तोंड सांभाळून बोल !

केदार : पुरुषोत्तम साहेब , आपण फक्त चर्चा करतोय तुम्ही जरा भाषा सांभाळून बोला .

सुयोग : पुरुषोत्तम जास्ती तापू नका लगेच !

प्रकाश : नाही आज आपल्यात फेसला होऊन जाऊ दे तिथी कि तारीख चा..
( प्रकाश काहीश्या मिस्कील पणे वातावरण अधिक गंभीर करण्याचा प्रयत्न करतो .)

सुयोग : मित्रानो , चला थंड घेऊ......
( सर्व गंभीर विषयावर बोलत होते तरी काहीसे स्मितहास्य करून केदार आणि सुयोग नी एकमेकान कडे पाहत राहिले .)

प्रकाश : वा काय मनातले बोललास .चला थंडगार बिअर घेऊ १० बिअर च्या बाटल्यानची आताच सोय करतो . काय बोलतोस पुरुषोत्तम?

पुरुषोत्तम : चला माझी इच्छा पण खूप झालीये . आधीच डोकं जड झालेय थोडी जन्नत करू .

केदार : म्हणजे उद्या तुम्हांला तारीखेनुसार जयंती साजरी करायची म्हणता त्यानुसार तुम्ही आधी पिणार मग साजरी करणार . अगदी तंतोतंत इंग्रजी संस्कृती पाळतात तुम्ही लोक त्या उत्सवा वेळी हि सेलेब्रेशन असेच करा .
(केदार ला न राहून त्याने पुरुषोत्तमाला डिवचण्याचा प्रयत्न केलाच )

पुरुषोत्तम : गप रे , तुझे ज्ञान पाजळू नकोस. नाहीतर इथेच तुला पार गार करेल .
(पुरुषोत्तम हि अरेरावी करण्याचा प्रयत्नात होता , कारण केदार पुढे त्याला काय बोलावे हेच मुळात सुचत नव्हते ....)

प्रकाश : जाऊ द्या रे तो विषय ! चला थोडी घेऊ यार .....

केदार : पोकळ धमकीला मी अजिबात घाबरत नाही .
( या वादामुळे प्रकाश आणि सुयोग पार बुचकळ्यात पडले, शेवटी मित्रच ! )

प्रकाश : एक मिनिट , आपण एक काम करू आज फुल आणि फायनल चर्चा होऊनच जाऊ दे ! जो गप बसेल त्याला दुसर्याचे म्हणणे मान्य करावे लागेल कायमचे !
तिथी कि तारीख ? बोल काय बोलतोस !

सुयोग : मग तसे पहिले तर आपला केदार बिचारा एकता पडेल ! हाहाहाहा:

केदार : माझी तयारी आहे , आणि हो मी कुठे कमी पडणार नाही.. !
पुरुषोत्तम : हा हा... मग आम्ही तिघे आणि तू एकटा , पाहू किती वेळ टिकतोस ते आमच्यापुढे... हाहाहा

केदार : लेट्स सी मिस्टर पुरुषोत्तम !! मी पूर्ण तयार आहे ...

( आत्ता तर खऱ्या वादाला तोंड फुटणार होते , चर्चेतून काय निष्फळ निघतो हे पाहणे खरंच रोमांचित आहे , केदार कसा या तीन विचारांचा सामना करणार ? आणि तिथी च्या संधर्भात असलेल्या सर्व विचारांना खरंच न्याय देऊ शकेल का ?? कि संभाजी ब्रिगेडी च्या कुरापाती विचार धारा जोपासणाऱ्या पुरुषोत्तम पुढे केदारचा निभावच लागणार नाही ..... तसेच सुयोग आणि प्रकाश ची हि साथ काही प्रमाणात पुरुषोत्तम ला असल्यामुळे खरंच केदार या तिघांपुढे टिकेल ????

खरंच काय होईल ती चर्चा...... ???)