मोहीम संग्रह ! लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
मोहीम संग्रह ! लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

रविवार, २४ जुलै, २०१६

उंबरखिंड अभ्यास मोहीम २०१६ (लोणावळा – उबरखिंड – खोपोली)


उंबरखिंड अभ्यास मोहीम , २०१६




कोणत्याही नवीन मोहिमेची सुरवात हि अभ्यास मोहिमेतून करणे अनिवार्य असते . याच अनुषगाने उबरखिंड मोहीम साक्षात शिवराय ज्या मार्गांनी उबरखिंडीत दाखल झाले त्याच वाटेने करण्याचे योजले होते . त्यासाठी लोणावळा – कुरवंडे – चावणी – उबरखिंड – खोपोली ह्या मार्गाने मोहीम सुरु केली. ठरल्याप्रमाणे दिनेश सावंत , अचल राणे , संतोष शेळके , विनोद भोसले , आणि योगेश वाळूंज असे आम्ही पाच जण या अभ्यास मोहिमे साठी प्रथमता जाणार होतो . त्यासाठी दिवस निवडला तो रविवार २४ जुलै २०१६. त्यासाठी आम्ही शनिवार , २३ जुलै २०१६ रोजी सी.ए.टी ते पंढरपूर या पेसेंजर गाडीने लोणावळा पर्यंत चा प्रवास करणार होतो. सर्व नियोजन झाले होते, बैठक पार पडली होती . परतू संध्याकाळी त्यात अचानकपणे काही कारणाने ठरलेल्या मोहीम कार्यक्रमात बदल करून आम्ही सर्व रविवारच्या सकाळी ६:३३ च्या इंद्रायणी एस्प्रेस ने निघणार होतो. 
विनोद , संतोष , आणि मी (योगेश) आम्ही तिघेही अगदी वेळेवर ठरलेली गाडी पकडली. परंतु उर्वरित आमचे सख्खे दोन आधारस्तंभ म्हणजे दिनेश सावंत आणि आमच्या नेहमीच्या मोहिमेचे सरसेनापती अचल राणे यांचा काहीच पत्ता लागत नव्हता. दोघांना फोन करून करून आमच्या मोबाईल ची बॅटरी मात्र उतरली . पण एकाने मोबाईल बंद तर दुसर्याने तो बहुधा शांत मोड वर टाकून ठेवलेला असावा . असो ... आम्ही सारे एकमेकांचे सख्खे मित्रच , आमच्या तिघांचा हि मूड अचानक पणे आलेल्या या प्रसंगाने जाम उतरला होता. इंद्रायणी गाडी सोडून दिली . परतू काही केल्या या दोघांशी तिळमात्र हि संपर्क काही होऊ शकला नाही. आता करायचे काय? असा यक्ष प्रश्न आम्हां तिघांपुढे होता. सर्व नियोजित मोहिमेचा पुरता बोजबारा उडाला होता. आम्ही सर्वांचे आगाऊ तिकीट काढून ठेवले होते ते सुद्धा व्यर्थ गेले .
काहीश्या गोंधळलेल्या आणि अचानक उद्भवलेल्या या परिस्थितीतून स्वतःला सावरत आम्ही कल्याण स्थानकात थोडी न्याहारी केली , आणि ओळखीच्या चेहऱ्यानसोबत थोड्या हसण्याचे क्षण अनुभवले . आमच्यातल्या विनोद ने मात्र आमच्या होणाऱ्या वाहिनीशी मनमोकळ्या गप्पा मात्र मारून घेतल्या. फसलेल्या नियोजनाचे अपडेट सर्वांआधी “सबसे तेज” आमच्या वाहिनीन पर्यत पोहचत होते. या सर्वातून उरलेले आम्ही दोघे २ तास मात्र ताटकळत राहिलो ... असो !
पुढे काय करायचे ? कारण मिळणारी एक छानशी सुट्टी ची पुरती वाट लागलेली होतीच. अश्याच परिस्थितीत कार्ल्याच्या एकविरा आई , किवा भिवपुरी ला जाण्याच्या आम्ही विचार करू लागलो. सर्व काही ऑफ शेडूल होणार होते. असाच विचार करत करत आम्ही गर्दीने भरलेली आणि विकेंड ची मज्जा अनुभवण्यासाठी वा फिरण्यासाठी निघालेल्या मुंबई करांच्यासमवेत आम्ही हि कर्जत लोकल पकडली . त्याच गर्दीच्या लोकल मध्ये “दि शो मस्ट गो ओंन” या वाक्याला स्मरून उंबरखिंड ची ठरलेली मोहीमच “ऑफ शेडूल” करायची हे नक्की केले. कर्जत स्थानकातून आम्ही पुढे ९ वा. २०मि. ची इंदोर- पुणे या पूर्ण विनागर्दीच्या गाडीने प्रवास करून लोणावळा स्थानकात १०वा. ११मि. दाखल झालो. 
लोणावळा स्थानकामधून बाहेर पडल्यानंतर बाहेर रिक्षा करून १५० रु . एवढा खर्च करून तिघांना कुरवंडे गावात जाता येते. चालत जायचे असेल तर किमान ४५ मिनिटे ते १ तास लागतो. आम्हांला आधीच २ तास उशीर झाल्यामुळे १०वा. ४०मि. नी रिक्षाने प्रवास चालू केला. रिक्षाने कुरवंडे गावात पोहचलो. तिथे थोडी चौकशी करून आम्ही कुरवंडे गावच्या जिल्हा परिषदेच्या शाळेच्या मागच्या बाजूने नागफणीच्या च्या दिशेने चालण्यास सुरवात केली.

सर्वजण चालण्याच्या उत्साहात होते. उजवीकडे चढत जाणारी वाट साधारण २० मिनिटे चाललो काही अंतर चालत गेल्यावर आम्हांला INS SHIVAJI च्या लांबलचक कुंपण दिसले. थोड्या पुढे गेल्यावर जेथे नागफणी चा डोंगर आहे. एकाशेजारी एक असणारे तीन बोर्ड पाहिले. इथून उजवीकडे वर जाणारा रस्ता नागफणीला जातो तर डावीकडे उतरणारा कच्चा रस्त्याने अम्बा नदीच्या काठी असलेल्या चावणी गावात जाता येते. 
आम्ही चालण्यास सुरवात केली . खूप सारी नोंद घेत घेत , छायाचित्रे काढत काढत आमची मोहीम पुढे सरकत होती. झरा लागल्यानंतर मात्र एक वाट सरळ जात होती तर एक वाट उजवीकडे वळत होती. थोडा विचार करून आम्ही उजवीकडच्या वाटेवर शिक्कामोर्तब केले. सर्वांनी उजवीकडे मोर्चा वळवला. तेथून लांबवर दरीत अम्बा नदीचे पात्र दिसू लागले .
एका ठिकाणी थांबून आमच्या सोबत आणलेल्या न्याहारी चा मोकळ्या रान परिसरात आम्ही आस्वाद घेतला. खडकातून वाहणाऱ्या डोंगराळ पावसाच्या पाण्याने आमची तहान भागवत तृप्त होऊन आम्ही पुढे चालत होतो. 
सोबत संतोष ने आणलेल्या वाळवलेल्या आंब्याच्या कोयींचे, जांभळाच्या बियांचे रोपण “योग्य ठिकाणी” करत होतो. 
मजल दरमजल करत आणि सेल्फिं घेण्याचा मर्यादित आनंद घेत आम्ही खाली उतरत होतो. साधारणता २:०० ते २:३० तासाचे अंतर आम्ही चालुन पायथ्याशी असलेल्या चावणी गावात पोहचलो. गाव तसे अगदी साधारण आहे . किमान २०० घरांची वस्ती असलेला ते एक छोटेसे गाव होते. त्या गावातून काही कच्चा आणि मग डांबरी रस्त्यातून चालत आम्ही “उंबरखिंडीत” दाखल झालो. 
समरभूमीत आल्यानंतर आम्ही पहिल्यांदा महाराजांच्या पराक्रमाला स्मरून तिथे उभारलेल्या स्मारकाला वंदन करून आम्ही दुपारचे जेवण घेतले. थोडा वेळ पोहण्याचा आनंद आम्ही त्या ओढ्या च्या ठिकाणी घेतला. वेळेचा भान ठेऊन आम्ही आमचा परतीचा प्रवास चालू केला. उबरखिंड ते पाली-खोपोली रोड असे ४ किलोमीटर अंतर आम्ही पायी कापले. रोडवर आल्यावर ट्रक ने आम्ही काही अंतरावरील मुख्य चौकात उतरलो तेथून पाठून आलेल्या पाली-खोपोली एस.टी. गाडीने आम्ही खोपोली गाठले .
मोहीम करताना सर्वांचा विचार, तसेच योग्य निर्णय घेण्याची असलेली नितांत गरज आणि आमच्यातील मोहीम सुरु असतानाची अबाधित एकत्र विचार शक्ती शेवटपर्यंत कायम ठेवायची असते. तिला कोणत्याही परिस्थितीत फाटे फुटू देता कामा नये. याची जाणीव करून देत , काहीश्या काळजीने आमची हि ऑफ शेडूल मोहीम मजेशीररित्या यशस्वीपणे संपन्न जाहली! 

मोहीम सूत्र - 
१. लोणावळा स्टेशन परिसरापासून मोहीम सुरवात 
२. लोणावळा ते कुरवंडे गावापर्यंत प्रवासाचे नियोजन करावे .
३. कुरवंडे गावच्या जिल्हा परिषदेच्या शाळेच्या पाठच्या बाजूपासून नागफणीच्या च्या दिशेने चालण्यास सुरवात करावी. 
४. च्या कुंपणाच्या बाजूने सरळ चालत जावे. 
५. चावणी गावाच्या दिशेने खाली उतरण्यास सुरवात करावी. 
६. चावणी गावातून पुढे उंबरखिंडित जाता येते. 
७. परतीच्या प्रवासाच्या वेळी ४ किलोमीटर अंतर चालत पार करून शेमडी गावच्या ठिकाणी, पाली – खोपोली रोड पर्यत पोहोचणे. 
८. तेथून एस. टी . बस ने किवां खाजगी वाहनाने खोपोली ला जाता येते .










उंबरखिंड अभ्यास मोहीम २०१६ (लोणावळा – उबरखिंड – खोपोली) च्या अधिक फोटोंसाठी येथे क्लिक करा

शनिवार, १२ सप्टेंबर, २०१५

"किल्ले माहुलीगड" आणि "किल्ले भंडारगड" दुर्गभ्रमण मोहीम !










बरेच दिवस झाले होते कुठेतरी ट्रेकींग ला जाण्याचा प्लान चालू होता .थोडावेळ विचार झाला आणि ठिकाण ठरलं माहुली गड हे नाव आमचा मित्र सागर ने सुचवलं होत तो आधी तिथे गेला होता.  त्याच्यामुळे किल्ला परिसर माहित असलेला एक “मावळा” आमच्या समवेत होता . आम्ही सर्वजण १२ सप्टेंबर २०१५  रोजी शनिवारी मोहिमेसाठी निघणार होतो. पण त्याआधी कोणासाठी तो कामाचा दिवस म्हणून सुट्टी नाही , कोणाचे या ना त्या मार्गाने नाना शंका आणि कुशंका वगळून आम्ही १० जणांची टीम शनिवारी पहाटे च्या ५.४८ च्या आसनगाव लोकल ने निघणार होतो. त्यासाठी घाटकोपर वरून ९ जणांची एक टीम या लोकल ने पुढे रवाना झाली. पण आधीची नाईट शिफ्ट केल्यामुळे माझी ती लोकल मिस्स झाली .त्यामुळे मला ७:३४ मिनिटाच्या दुसऱ्या आसनगाव लोकल शिवाय दुसरा पर्याय नव्हता. आमच्या च काही भरवश्याच्या मित्रांनी ऐनवेळी “टांग” दिल्यामुळे  मला एकट्यालाच या लोकलने आसनगाव पर्यंत चा प्रवास करायचा होता.... असो ! पण आमची जी पहिली टीम जी वेळेनुसार चालत होती , माझ्यामुळे त्यांना हि बराच उशीर पर्यंत वाट पाहत ताटकळत बसावे लागले . जेव्हा आम्ही सर्व १० जण आसनगाव येथील “परिवार हॉटेल” परिसरात दाखल झालो. तेव्हा अधिक उशीर न करता सागर ने आधीच ठरवलेल्या एका टेम्पो चालकाच्या गाडीतून आम्ही आसनगाव (परिवार हॉटेल) ते  किमी अंतरावरील  माहुली ह्या  पायथ्याच्या  गावा पर्यंतचा प्रवास केला . माहुलीगड हा ठाणे जिल्ह्यात असून आसनगाव रेल्वे स्टेशन पासून साधारण ८-१० कि.मी .अंतरावर आहे. या प्रवासावेळी मी मुद्दामून त्या टेम्पो चालकाच्या शेजारी पुढे जाऊन  बसलो , बाकीचे सर्व सवंगडी पाठीमागे बसले होते. त्या प्रवास च्या वेळी मुद्दाम त्या टेम्पो चालका पासून त्या किल्ले परिसरा बाबत अधिक माहिती गोळा करण्याचा उद्धेश होता . त्या  टेम्पो चालका पासून बरीच माहिती मिळाली हि , पण तो खूप खूप मोठ्या  बढाया मारतोय हेच अधिक जाणवले . आणि यावर शिक्कामोर्तम संध्याकाळी तो आम्हा ला पुन्हा परतीच्या प्रवासा च्या वेळी  नेण्यासाठी न येण्या ने झाला .... असो !
गड चढत असताना आमच्यातील तुरळक वगळता गड चढण्याची आत्मिक इच्छा , सामर्थ्य खूप कमी जणांकडे होते , याची जाणीव प्रत्येक जण करून देत होते . बहुदा बहुतेकांची हि पहिलीच वेळ होती , त्यामुळे कदाचित ! पण सर्वांचे आभार मानले पाहिजेत... कारण सर्वांनी जिद्द सोडली नाही . गड चढताना आमची चांगलीच दमछाक झाली होती . आणि धुकं सुद्धा खूप होती.  त्यात डोक्यापेक्षा हि वर वाढलेलं जंगल त्यातून आम्ही चालत होतो .
            भर उन्हात , हिरव्यागार माळ रानात आम्ही गडाचा माथा कधी येतोय याची आतुरतेने वाट पाहत मार्ग चढत होतो . सागर ने “अरे  आलेच फक्त  थोडाच चढायचे ”, “फक्त १५ मिनिट बाकी , मग पोहचलोच ”, “ मग relax  the body करायचे या आणि नाना धीर देणारे गमतीदार  शब्द, आणि डाइलॉग बाजी मुळे सर्वान मधे एक चेतना निर्माण होत  होती . हे ते शब्द सर्वान साठी दर १० मिनिटांनी “एनर्जी ड्रिंक” सारखे काम करायचे. सर्व जण हि एकोप्याच्या भावनेतून पुन्हा गड जोमाने  चढत  होते . त्या बद्दल सर्वांचे आणि त्या एकतेचे अभिनंदन ! आणि त्याच बरोबर खासकरून अभिनंदन करायला हवे  ते राकेश पार्टेचे ! गड चढत असतानापासून जो काही कचरा आमच्याकडून  निर्माण झाला तो सुरवातीपासूनच एकत्र ठेवत हा गडी सर्वाना त्याचे महत्त्व आणि जाणीव करून देत होता . गड उतरून झाल्यावर सुमारे २ किलो वजनाची ती कचऱ्याची पिशवी पायथ्याशी कचरा कुंडीत टाकण्यात आली .

माहुली गड हा फारसा कुणाला माहित नसला तरी शिवाजी महाराजांच्या काळात त्याला महत्त्व होते. आदिलशहा पासून छोट्या निजामाला वाचवण्यासाठी शहाजी राजे शिवबा आणि जिजाऊ ना घेऊन ह्याच किल्ल्यावर आले होते तेव्हा शिवाजी फक्त ६ वर्षांचे होते . पुढे आदिलशहाचा सरदार कार्तलब खान ने २ महिने माहुलीला वेढा दिला होता , नंतर वाटाघाटी ने मार्ग सुटला . माहुलीच्या बाजूलाच पळसगड आणि भंडारगड आहेत . हे खूप विस्तीर्ण असा जंगल आहे .



पुरंदरच्या तहात माहुली पण मुघलांकडे गेला होता पण अवघ्या २ वर्षात महाराजांनी २३ किल्ल्यांसकट २५० किल्ले जिंकले त्यात माहुलीगड ही होता. ठाणे जिल्ह्यातला हा सर्वात उंच किल्ला आहे आणि ह्याची उंची २८०० फूट इतकी आहे
. गडावर आमच्या व्यतिरिक्त काही ट्रेकर आम्हांला दिसले.  माझ्या हातात कॅमेरा होता, त्यामुळे त्यांच्या सारखी काठी घेऊन चढणे शक्य नव्हते.  काही ठिकाणी तर चढण खूप सरळ होती. गड चढत असताना ,बरीच चढण चढल्यावर आम्ही एका टोकावर येऊन पोहचलो बरेच जण पाहिल्यावेळेस आले होते.  तेव्हा इतक्या वर आले नसतीलच. त्यामुळे आता किल्ला कोणत्या बाजूला आहे हे काहीना माहित नव्हत. काही अंतर वर  गेल्यावर ते कळले , तिथून खालचं दिसणारं विहंगमय दृश्य पाहून “खूप भारी” वाटले !  वाटेवरून आम्ही पुढे पुढे चालत होतो , गडावर खूप मस्त वातावरण होतं आणि फोटोग्राफी साठी तर एकदम मस्तच लोकेशन होतं त्यामुळे तिथे फोटो काढण्यात जरा वेळ आम्ही रमलो.
 काही अंतरावर असणाऱ्या वाटेने चालू लागलो पुढे एकदम सरळ उभी दगडं होती आणि त्यावरून चढण्यासाठी एक लोखंडी शिडी होती पण ती वरच्या बाजूला बांधलेली आणि खाल च्या बाजूने हवेत लटकत होती , आम्ही सर्व जण जपून “एक एक” जण त्या शिडीने वर पर्यंत जात होतो . जेव्हा आम्ही माहुली गडाच्या माथ्यावर पोहचलो तेव्हा क्षणभर सर्वांनाच हायसे वाटले .  अजून पुढे आम्ही गेलो तिथे पाण्याचं टाके होते तिथून पुढे गेलो, खूप पुढे गेलो पण किल्ला काही दिसत नव्हता वैतागून एका जागी बसलो. आणि म्हणालो आता काय नाही किल्ला बिल्ला इथेच खाऊया आणि जाऊया घरी ! नकाशात पाहिलं तसं शंकराची पिंडी होती, आणि भग्न अवस्थेतल्या देवड्या आणि तिथेच एक पिण्याच्या पाण्याचं टाके होते. गडावरील पिण्याच्या पाण्याच्या टाक्यातून पिण्याचे पाणी घेऊन आम्ही सर्व जणांनी न्याहारी केली . आणि एका झाडा खालील असलेल्या “श्री शंभू महादेवाच्या पिंडीचे”  दर्शन घेतले.  त्या निसर्गरम्य वातावरणात जेवण्याचा आनंदच वेगळा होता . वातावरण खूप मोहक होते , ढग दाटून आले होते , धुक्यांचे साम्राज्य चारी दिशेला सामाऊन गेले होते , तरी हि   जेवणा नंतर सर्वच थोडे आळसावलेले  होते . मोहीम ठरलेल्या वेळी पुढे जाणे हि तितकेच गरजेचे होते . या भावनेतून सर्वांनी पुन्हा नवीन जोशात माहुलीगड परिसरातील भंडारगड दिशेने मार्गक्रमणा चालू केली . आणि त्याच वेळी ज्याची आम्ही गड चढत असता पासून अधिक  आतुरपणे वाट  पाहत होतो , त्या वरूण राजाने जोरदार हजेरी लावली . आणि सर्वांचा प्रवास दरम्यान चा शीण कुठल्या कुठे पळून गेला . या पुढल्या प्रवास दरम्यान आम्ही “रेप्लीन” चा छोटा सा रोमहर्षक अनुभव हि घेतला . त्या ठिकाणी सागर टेमगिरे या मावळ्याचा असेलेला अनुभव दिसून आला . जोरदार पाउस असल्याने आमच्या पैकी कोणाचे हि कॅमेरे आणि फोन बाहेर निघाले नाही , त्यामुळे त्या वेळचे आणि पुढील अधिक सुंदर वातावरणाचे छायाचित्र काढता आले नाही , हीच एक खंत !
आम्हाला काळोख व्हायच्या आत खाली उतरायचे होते मग आम्ही परतीची वाट धरली येताना मात्र सर्वजण पटापट उतरत होते.सगळ्यांना खूप क्षीण आला होता तेव्हा लवकर खाली जाऊन पाण्यात मजा करायची होती
पाण्यात मजा करून झाल्यावर आम्ही निघालो. एकूण सर्व च प्रवास सर्वाना एक वेगळाच अनुभव देणारा नक्कीच ठरला असणार ! पुन्हा हि नवीन जोमाने , मनात कसलीच शंका , कुशंका न ठेवता , आपुलकीच्या भावनेने  आपल्या थोर पराक्रमी  इतिहासाची जाणीव ठेऊन , एकट्या आणि उध्वस्त अवस्थेतील आपल्याच गड किल्यांवर पुन्हा पुन्हा यावेच !  दुर्गभ्रमंती सर्वानकडून व्हावी हीच शिवरायांन चरणी प्रार्थना !

"किल्ले माहुली दर्शन"- थोडक्यात ओळख!

किल्ले माहुली हा ठाणे जिल्ह्यातील किल्ला असून चढाई साठी मध्यम श्रेणीचा आहे. ठाणे जिल्ह्यात शहापूर-आसनगावाजवळ एक दुर्गत्रिकुट आहे. माहुली-भंडारगड आणि पळसगड मिळून हे बळकट ठाणे तयार झाले आहे. मुद्दाम जाऊन पहावे असे हे ठिकाण कोणाही निसर्गप्रेमी माणसाला आपल्या निसर्गसौंदर्याने वेड लावते. अनेक सुळके असलेला लांबलचक असा हा डोंगर माहुली नावाने ओळखला जातो. माहुलीचे दोन खोगिरामुळे तीन भाग पडले आहेत. उत्तरेचा पळसगड, मधला माहुलीगड आणि दक्षिणेचा भंडारगड.

हा किल्ला कोणी बांधला याबद्दल काहीच माहिती नाही पण निजामशाहीत हा किल्ला शहजीराजेंकडे होता पण परकीय आक्रमणासमोर सैन्यबळ कमी असल्याकारणे त्यांना तो मुघलांच्या स्वाधीन करावा लागला नंतर शिवरायांनी हा किल्ला स्वराज्यात शामिल केला. जवळ जवळ ३ वेळा हा किल्ला परकीयांनी हल्ले करून स्वराज्याकडून जिंकून घेतला आहे पण नंतर तिन्ही वेळा शिवरायांनी माहुली किल्ला पुन्हा जिंकला यावरूनच या किल्ल्याचे महत्व काय असावे याचा अंदाज बांधलेलाच बरा. 


"दिल दोस्ती यारी हे सगळे फेसबुकवरी"
किल्ले दर्शन स्वखर्चाने
, कमीतकमी खर्चात होईल याची नोंद सर्वांनी प्रथम घ्यावी, जेणेकरून अधिक जण या सफरींचा आनंद घेऊ शकतील. – जय शिवराय!!  






रविवार, १९ जुलै, २०१५

छत्रपती शिवाजी महाराजांचं संपूर्ण लष्करी पेहरावातील ताम्रपटात चितारलेलं मोहक रूप !

उंबरखिंड येथील विजयस्तंभाची रचनाच मुळी मोहक. स्तंभाच्या एका बाजूला इथल्या लढाईचं वर्णन, दुस-या बाजूला महाराजांचं संपूर्ण लष्करी पेहरावातील ताम्रपटात चितारलेलं मोहक रूप, त्याच्याच खाली सिंह-हत्तीच्या लढाईचं सूचक चित्र, वर ढाल तलवारी यांच्या प्रतिकृती.. आणि या सर्वाचं खडकावरच्या पाण्यात पडलेलं प्रतिबिंब.. हे सारं काही डोळयात साठवावं असंच. या स्तंभाशी गतकाळातल्या स्मृतींचं चिंतन करावं.. त्याच्याच नजरेतून त्या वेळच्या लढाईचा प्रसंग पाहावा.





जेवढा या खिंडीचा इतिहास संघर्षपूर्ण तेवढंच नयनरम्य तिचे दर्शन !!

उंबरखिंडीच्या पतितपावन मातीच्या , येथे वाहणाऱ्या या नदीच्या स्वच्छ पाण्याच्या , थंडगार वाऱ्याच्या त्या स्पर्शाने १६६१ सालच्या त्या घडलेल्या रणसंग्रामाची प्रत्यक्ष जाणीव करून देत होते . त्या स्पर्शाने आम्ही सर्व मंत्रमुग्ध झालो होतो. छत्रपती शिवाजी महाराजांच्या चतुरस्र रणनीतीची साक्षीदार असलेली उंबरखिंड याचि देही याचि डोळा पाहण्यास मिळत होती . आम्ही सर्व शिवभक्तीत पूर्णतः न्हाऊन निघालो होतो . विजयस्तंभास मानवंदना देऊन आमच्या मोहीमेची यशस्वीपणे सांगता झाली .


जल्लोष शिवभक्तीचा !

मानवंदना शिवरायांस आणि स्वराज्याच्या भगव्या ध्वजास - जय जय शिवराय !





पाली चा बल्लाळेश्वर गणपती दर्शन, आणि "किल्ले सरसगड", "उंबरखिंड रणसंग्राम"मोहिम २०१५

जेवढा या खिंडीचा इतिहास संघर्षपूर्ण तेवढंच नयनरम्य त्याचं दर्शन!!


पुणे-रायगड जिल्हयांच्या सीमेवर आणि सहयाद्रीच्या कुशीत दडलेली संघर्षपूर्ण आणि शिवाजी महाराजांच्या चतुरस्र रणनीतीची साक्षीदार असलेली उंबरखिंड ही आधुनिक मावळ्यांसाठी पर्वणीच ठरते. या उंबरखिंडीची इतिहासात एक आगळीवेगळी ओळख आहे. ती म्हणजे महाराजांनी मुघल सरदार कारतलब खान याच्या प्रचंड फौजेचा थोडया मावळयांच्या मदतीने केलेला दारुण पराभव. तो दिवस होता, दोन फेब्रुवारी १६६१. खानाच्या या पराभवामागे महाराजांना दूरदृष्टी होतीच; पण याहीपेक्षा उंबरखिंडीच्या भौगोलिक रचनेचा खुबीने करून घेतलेला वापर हे कारण मोठं होतं. खिंडीत घडलेला हा देदीप्यमान विजय याचि देही याचि डोळा पाहायला मात्र एक दिवस तरी राखून ठेवायलाच हवा. त्यासाठी पावलं या समरभूमीकडे वळवावीच लागतात.
१९ जुलै २०१५ रोजी सकाळी ६ वाजून ३० मिनिटांनी आम्ही सर्व जण मुंबई वरून निघालो. एक एक शिलेदार त्यांच्या सोयीच्या ठिकाणी येऊन थांबला होता , रबाले, खारघर आधी ठिकाणावरून सर्व जण एकत्र मिळाले आणि खार घर ला आमच्या दोन्ही वाहनाची पूजा आणि नारळ फोडून मोहिमेचा श्री गणेशा केला .  उंबरखिंड मोहिमेआधी आम्ही पनवेल , खोपोली मार्गे सर्वप्रथम पाली येथे दाखल झालो . बल्लाळेश्वराचं  मन प्रसन्न करणारे दर्शन झाल्यानंतर शेजारीच असणारा “किल्ले सरसगड ” आम्हांला खुणावत होता .. देवळाच्या मागच्या बाजूला मोठा डोंगर दिसतो. तोच सरसगड किल्ला
आहे. आवश्यक न्याहारी आणि खरेदी करून आम्ही “किल्ले सरसगड” सर करण्यासाठी नेहमी प्रमाणे शिस्तबधतेने निघालो. मंदिराशेजारील चौकात “प्रेरणा मंत्र” घेतले , आणि रांगेने आम्ही गडाच्या पायथ्याशी पोहचलो .मंदिरापासून किल्ल्याच्या पायऱ्यांपर्यंत जायला साधारण तासभर लागतो. तिथे किल्ल्याची तटबंदी आहे. पायऱ्या उंच आणि अरुंद आहेत. या ६०-७० पायऱ्या दिंडी दरवाज्यात घेऊन जातात. आल्यावर या भागात तिहेरी तटबंदी बघायला मिळते. तिथून आपण किल्ल्याच्या पठारावर येतो. किल्ल्याच्या पठारावर बालेकिल्ल्याचा डोंगर आहे. त्यानं किल्ल्याचा बराचसा भाग व्यापला आहे. हा डोंगर चढला की बालेकिल्ल्यावर पोहचता येतं. बालेकिल्ल्याच्या डोंगराच्या पोटात पाण्याच्या टाक्या, गुहा केलेल्या आहेत. डोंगर चढायला तसा सोपा आहे. पायऱ्याही आहेत. बालेकिल्ल्यावर केदारेश्वराचं मंदिर, छोटा तलाव आणि दोन बुरुज आहेत. किल्ल्यावरून सुधागड, कोरीगड, धनगड, तैलबैला हे किल्ले दिसतात. खालचं पाली गाव, अम्बा नदी असा परिसर न्याहाळता येतो. सरसगडच्या बाजूला तीन कावडीचा डोंगर आहे. 
.. १३४६ मध्ये सिंहगड, तोरणा, पुरंदर किल्ले जिंकून घेतल्यावर मलिक अहमद ( निजामशाहीचा संस्थापक) कोकणात उतरला. त्या वेळी कोरीगड, सुधागड, सरसगड, सुरगड हे किल्ले त्याच्या ताब्यात आले.नंतर हे किल्ले आदिलशाहीत दाखल झाले. शिवाजी महाराजांनी नारो मुकुंदाना सुधागड व सरसगडाची सबनिशी दिली. शिवाजी महाराजांनी त्यांना सुधागडच्या देखभालीसाठी पाच हजार होन आणि सरसगडासाठी दोन हजार होन दिले. पुढे भोर संस्थानात या किल्ल्याची व्यवस्था होती.सरसगडाची देखभाल १९४८ साला पर्यंत भोर संस्थानाकडे होती. त्यानंतर संस्थाने खालसा झाल्यावर सरसगडाची मालकी इतर गडांप्रमाणे सरकारकडे आली. किल्ल्याच्या डागडुजीकडे दुर्लक्ष झालेले आहे. त्यामुळे सध्यातरी किल्ला निसर्गाच्या लहरीवर तग धरुन आहे. तासा-दीड तासात पूर्ण किल्ला बघून होतो. त्यामुळे पाली गावातनं निघून, किल्ला बघून पुन्हा चारेक तासांत पुन्हा पाली गावात येता येतं. किल्ले सरसगडाची आठवण मनात कोरून गाडीने आम्ही उंबरखिंडीच्या रणसंग्रामाच्या दर्शनासाठी निघालो . गर्द झाडीत आपल्या भिरभिरत्या नजरेला विजयस्तंभाचं दर्शन होतं. मन कृतार्थ होतं. विजयस्तंभाची रचनाच मुळी मोहक. स्तंभाच्या एका बाजूला इथल्या लढाईचं वर्णन, दुस-या बाजूला महाराजांचं संपूर्ण लष्करी पेहरावातील ताम्रपटात चितारलेलं मोहक रूप, त्याच्याच खाली सिंह-हत्तीच्या लढाईचं सूचक चित्र, वर ढाल तलवारी यांच्या प्रतिकृती.. आणि या सर्वाचं खडकावरच्या पाण्यात पडलेलं प्रतिबिंब.. हे सारं काही डोळयात साठवावं असंच. या स्तंभाशी गतकाळातल्या स्मृतींचं चिंतन करावं.. त्याच्याच नजरेतून त्या वेळच्या लढाईचा प्रसंग पाहावा.
 मराठी मावळ्यांच्या विजयाचं या खिंडीशी नातं सांगणारं.. त्यापेक्षाही शिवाजी महाराजांच्या प्रगल्भ युद्धतंत्राची झलक दाखवणारं.. इतिहासाचं भावविश्व उलगडून मंत्रमुग्ध करणारं.. अशा या विजयस्तंभाला त्रिवार मुजरा करूनच आम्ही काही वेळ नदीच्या पाण्यात यथेच्छ पोहण्याचा आनंद लुटला , सोबत एकमेकान  सोबत चे छायाचित्रे हि काढली गेली , नंतर वेळ झाली ती संध्याकाळच्या जेवणाची !
जेवण बनवण्यासाठी आम्ही योग्य जागा शोधात होतोच , त्याच वेळी तिथे उभ्या असणाऱ्या गावकर्यांनी काही अंतरावर असलेल्या एका बंद घराची माहिती दिली आणि त्या ठिकाणी मोकळ्या अंगणामध्ये जेवण बनवता येईल आणि पाण्याची हि सोय असल्याची माहिती दिली . सूर्याची किरणे मावळतीला झुकत  चालली होती , आणि आमच्या सर्वांच्या पोटात भुकेने आगडोंब उसळला होता . जेवणाचे सर्व समान आन्ही आधीच बरोबर घेतले होते . गाडीने आम्ही सर्व त्या ठिकाणी दाखल  झालो . या वेळी “वेज पुलाव “ करण्याचा बेत होता . सर्वांनी जेवण बनवण्यासाठी खूपच मेहनत घेतली , अचानक पुन्हा सुरु झालेल्या पावसाने पेटवलेली चूल पुन्हा पुन्हा विझत होती . चुलीच्या वरती जवळच पडलेल्या सिमेंट पत्र्याचा छत म्हणून उपयोग केला , भर पावसात आम्ही चूल पेटवण्यात यशस्वी झालो . भात शिजवण्यासाठी खूप आटापिटा करावा लागला , परंतु त्यात हि एक वेगळी मज्जा आम्ही सर्व अनुभवत होतो . शेवटी “दम बिर्याणी ” बनवण्यात आम्ही यशस्वी ठरलोच . त्या बंद घराची दरवाजे आम्ही उघडली आणि आत मधे गोल पंगत बसली आणि यथेच्छ जेवणावर ताव मारण्यात आला . पुन्हा तो संपूर्ण परिसर आहे तसा स्वच्छ ठेऊन आम्ही परतीच्या प्रवासा साठी खोपोली मार्गे मार्गस्थ झालो .



शुक्रवार, २० मार्च, २०१५

किल्ले अवचितगड मोहीम !

" किल्ले अवचितगड मोहीम "


किल्ले रायगड , किल्ले राजमाची , किल्ले विसापूर, किल्ले श्री वर्धन , किल्ले लोहगड, किल्ले रसाळ गड मोहिमा तिच्या ध्येयाबरोबर यशस्वीपणे पूर्ण करताना यंदा प्रथमच शंभू महादेवाच्या कृपेने “महाशिवरात्री” (सन २०१५) निमित्त #मोहीम #क्रमांक – ६ थेट #किल्ले #अवचितगड येथे राबवण्याचा निर्णय झाला. माझी माणसं अंतर्गत हा आमचा #किल्ला#क्रमांक - ७ ठरला . यासाठी ठरल्याप्रमाणे आम्ही दिनांक १६/२/२०१५ रात्री ठीक ८ वाजता दिवा स्थानक येथून दिवा-रोहा गाडी ने प्रवास सुरु करणार होतो. त्यासाठी मुंबईवरून श्री दिनेश सावंत, श्री विनोद भोसले, श्री प्रशांत मोरे, श्री बाळासाहेब त्र्यबके, श्री दीपक जाधव, श्री अभिजित भोसले, दिवा येथून नवीन शिलेदार श्री निलेश जावळेकर तसेच पुढे डोबिवली वरून आमच्या परिवाराचे सरसेनापती व जेष्ठ सदस्य माननीय श्री अचलभाऊ राणे, आणि शेवटी बदलापूरहून मी योगेश वाळूंज असे सर्व ९ जण जमणार होतो. ठरल्याप्रमाणे अचल राणे ,प्रशांत , बाळासाहेब ,अभिजित, आणि निलेश ठरलेल्या वेळेप्रमाणे दिवा स्टेशन परिसरात वेळेवर दाखल झाले, परंतु व्यस्तकामांमुळे विनोद भोसले , दिनेश सावंत, दीपक जाधव, आणि मी. आम्ही ठरलेल्या वेळी पोचण्यात अयशस्वी ठरलो. आमची एक टीम जी वेळेवर उपस्थित होती ती पुढे दिवा-रोहा प्यासेंजर ट्रेनने रवाना झाली. पाठीमागे राहिलेलो आम्ही ४ जणांनी मग दुसऱ्या प्यासेंजर ट्रेन ची चातकासारखी वाट पाहत ठाणे स्थानक गाठले. परंतु त्या दिवशीची ती शेवटची ट्रेन होती जी आम्ही मिस केली होती. काय करावे आणि काय नाही याचा विचार सुरु झाला. पुढे गेलेल्या आमच्या सहकार्यांचे फोन सुरु झाले. त्यांना आश्वस्त करून आम्ही दुसऱ्या साधनांचा शोध घेऊ लागलो. तेव्हा पनवेल ला जाऊन तेथून बाय रोड ने जाऊ शकू असा विचार पुढे आला. त्यावर अधिक वेळ न दवडता आम्ही थेट ठाणे-पनवेल ट्रेन पकडली आणि पनवेल स्टेशन गाठले, तेथून कोलाड-रोहा-मेढा असा प्रवास करायचा होता मग आम्ही पनवेल बस स्थानकात पोहचत असताना एका पेस्सेंजर ओम्नी चालकाने कोलाड येथपर्यंत सोडू असा सांगितले. त्याच्याशी स्पष्ट व्यावहारिक बोलणी (तिकीट दर) करून प्रवास सुरु केला. कोलाड ला पोहचल्यावर पुढे ७ किमी दूर असलेल्या मेढा गाव येथे जाण्यासाठी आम्हाला खिशाला परवडणारे असे योग्य साधन मिळत नव्हते. रात्रीच्या वेळेच्या आणि आमच्या नाईलाजपनाचा फायदा इतरांना हि हवा होता. वेळ निघून चालला होता. आमची पहिली टीम गावातील एका मंदिराच्या बाहेर थंडीत आपुलकीने आमची वाट पाहत थांबली होती. आमच्या हि मनाला टाचणी लागत होती कि, या सर्वांस आम्हीच जबाबदार होतो. शेवटी कोलाड वरून रिक्षा पकडून आम्ही मेढा गाव गाठले. पण जसे आम्ही गावात पोहचलो आमच्या पहिल्या टीम शी असणारा मोबाईल संपर्क तुटला. सुमारे तासभर आम्ही रिक्षाचालक काका बरोबर आमच्या टीम चा शोध घेऊ लागलो. गावातील सर्व मंदिरे पाहून झाली पण आमचे सहकारी काही केल्या सापडत नव्हते. बराच वेळानंतर रिक्षा हि निघून गेली. आम्ही रात्रीच्या अंधारात त्या गावात असलेल्या आणि संपर्क न होऊ शकणार्या आमच्या टीम चा पुन्हा शोध घेऊ लागलो. शोधता शोधता आम्हाला एका मार्गावरील मंदिराबाहेर आराम करत असलेली आमची टीम नजरेस आली . आणि नकळत स्मितहास्य आमच्या सर्वांच्याच ओठावर फुलले. सर्वांशी आपुलकीने भेटून मनातून खजील झालेलो आम्ही पुन्हा ध्येयांनी एक झालो ! तेथून “हर हर महादेव” आणि “छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या” निरंतर जयघोषाने सुरु झाला आमचा एकत्रितपणे किल्ले अवचितगड मोहिमेचा एक अविस्मरणीय असा प्रवास ! – हर हर महादेव !! जय जय शिवराय !!
अवचितगड, हा सुरगड, पालीचा किल्ला व भोराईचा किल्ला यांच्याबरोबरच कर्नल प्रॉथरच्या सैन्यानें १८१८ फेब्रुवारींत जिंकून घेतला. हा किल्ला मूळ शिवाजीनें शेख महमंद नावाच्या कारागिराकडून बांधविला होता असें म्हणतात. [संदर्भ ग्रंथ— कुलाबा गॅझियटर]
सह्याद्रीतल्या अवशेषांनी युक्त आणि निसर्गाने परिपूर्ण अशा किल्ल्यांची यादी काढली तर त्यात रायगड जिल्ह्यातल्या अवचितगडाचा क्रमांक अग्रणी असेल. रायगड जिल्ह्यातील रोहा या तालुक्याच्या शहरापासून फक्त सात किलोमीटर्स अंतरावर असणारा अवचितगड हा अवशेषांनी समृद्ध आणि सर्वागसुंदर गिरिदुर्ग वर्षभरात कधीही भेट देण्यासारखा आहे. साक्षात रायगड भोवतालच्या परिसराच्या सुरक्षेची जबाबदारी ह्या किल्ल्यावर होती. तिथे प्रचंड महसूल ठेवला जात असे. राजधानी जवळ असल्याने ही व्यवस्था केली होती. त्यामुळे महाराजांच्या श्रीमंत किल्ल्यांमध्ये अवचितगडाचेसुद्धा नाव घ्यावे लागेल. गडाचे असलेले स्थान हे त्याच्या जमेची बाजू आहे. गर्द रानात एका उंच डोंगरावर हा किल्ला आहे. त्यामुळे आजूबाजूच्या परिसरावर नजर ठेवणे सहज सोप्पे जाते.मंदिरासमोरून एक छोटं रेल्वेचे फाटक ओलांडून पुढे निघालो की थोड्या अंतरावर एक भलीमोठी विहीर आहे आणि तिथून उजव्या बाजूने जंगलातून वाट आहे. अवचितगड भग्नावस्थेत आहे. निरनिराळ्या वास्तू ढासळत आहेत. गडावर दरवर्षी काही गोष्टी नेमाने होतात.गडावर असलेल्या शिवलिंगाचे दर्शन घेण्यासाठी काही भाविक मंडळी महाशिवरात्रीच्या दिवशी येतात. गडावर येणार्‍यांची विशेष वर्दळ असते. 
ऐतिहासिक वास्तूंचे जतन आपणच करायचे असते हे लोकांच्या मनात उतरवण्याचे कार्य गेली काही वर्षे रोह्यातील दुर्गप्रेमी करत आहेत.किल्ल्यांचे रक्षणाचे कार्य किती महत्त्वाचे आहे हे सर्वानीच समजले पाहिजे.

ध्येय - मोहीम जबाबदारीने यशस्वीपणे संपन्न करणे , गडावरील ध्वज चांगल्या स्थितीत नसेल तर ध्वज बदलणे, गडभ्रमण आणि इतिहास संदर्भात माहिती घेणे व अवलोकन करणे, शिवलीलामृत पारायण ( अध्याय १), आणि भजन , विचार-देवाण घेवाण, चर्चा . आदी उद्धिष्ट सफल संपूर्ण, मोहीम फत्ते !!



"किल्ले अवचितगड मोहीम" - फोटो संग्रह साठी येथे या !

रविवार, ७ डिसेंबर, २०१४

भगव्या निशानासह लोहगड आणि विसापूर पायी गडभ्रमण मोहीम !

“ भगव्या निशानासह लोहगड आणि विसापूर पायी गडभ्रमण मोहीम ” 


खुप दिवस नाईट ट्रेक ला जायच मनात होत. पण कदाचित वेळ येत नव्हती. पण शेवटी ६ डिसेंबर २०१४ म्हणजेच शनिवारी शेवटच्या कर्जत लोकल ने प्रवास सुरु करण्याचे ठरले आणि जायच ठरलं.... लोहगड आणि विसापूरला. 
आम्हाला दुपारपर्यंत लोहगडावर पोहचणे आवश्यक होते. कारण लोहगड पाहून आम्हाला अंधार पडायच्या आत विसापूर गडावर पोहचून तिथेच रहायचं होते , अणि सकाळी उठून गड पाहून परत मुंबईच्या दिशेने परतायचे , असे साधारण नियोजन होते..... मग काय, आमच्या शिलेदारांपैकी घाटकोपर वरून विनोद , विक्रोळी वरून दिनेश, ठाणे (ऐरोली) वरून प्रशांत आणि अभिजित, आणि बदलापूर हून मी .. 
आम्ही सर्व निघालो नेहमीच साद घालणाऱ्या आमच्या गडकोटांकडे ......................
ठरल्याप्रमाणे , शनिवारी भल्या पहाटे शेवटच्या कर्जत लोकल ने ३.०० च्या सुमारास कर्जत स्टेशन गाठले. पुढे लोणावळा – मळवली असा प्रवास करायचा होता. प्यासेंजर ट्रेन लवकर नसल्याने आम्ही सर्व निवांत होतो. एरवी निवांत वेळ नसल्याने आणि आता तो भेटल्याने अनेक पौराणिक आणि वैज्ञानिक गोष्टींवर विना निकाली पुष्कळ चर्चा झाली. चर्चा करता करता आमच्या सामानांपासून आम्ही बरेच दूर फिरत गेलो. बाकीच्या आमच्या शिलेदारांनी तोवर एक हवीहवीशी वाटणारी डुलकी मात्र काढून घेतली... प्यासेंजर ट्रेन ५:०० ला कर्जत स्टेशनात दाखल होताच धावत जाऊन ती पकडली. आम्ही त्या गाडी ने पुढे लोणावळा आणि पुढे पुणे दिशेने लोणावळ्या नंतरचे एक स्टेशन म्हणजे मळवली ला उतरलो ..... 
यावेळी मोहिमेला आम्ही आपले भगवे निशाण सोबत घेतले होते, आणि डोक्यावर होती ती पांढरी टोपी .... आणि सुरु झाली माझ्या माणसांन सोबत “भगव्या निशानासह लोहगड आणि विसापूर पायी गडभ्रमण मोहीम 



“ भगव्या निशानासह लोहगड आणि विसापूर पायी गडभ्रमण मोहीम - फोटो संग्रह साठी येथे या ”

गुरुवार, ४ डिसेंबर, २०१४

किल्ले राजमाची मोहीम !



" किल्ले राजमाची मोहीम "


कर्जतहून कोंदीवडे मार्गेः कर्जतहून कोंदीवडे या गावात बसने यावे. कोंदिवडे येथून खरवंडी मार्गे किल्यावर जाणारी पाउलवाट उभ्या चढाची आहे. किल्यावर पोहोचण्यास सुमारे ३ तास लागतात.

राजमाचीवर मनोरंजन व श्रीवर्धन हे दोन बालेकिल्ले आहेत. मनोरंजनच्या पायथ्यापाशी उढेवाडी ही २०, २२ घरांची पाणभरे कोळी लोकांची वाडी आहे. वाडीलगतच मारुतीचे मंदिर आहे. तेथून पुढे दक्षिण दिशेला संरक्षित वन आहे. हे वन जेथे आहे त्या ठिकाणी किल्यावरील अधिकारी लोकांचे निवासी वाडे होते. इसवीसन १८१८ मध्ये किल्ला इंग्रजांच्या ताब्यात गेल्यामुळे मराठी राज्यातील त्या अधिकाऱ्यांना स्थलांतर करावे लागले. नंतरच्या काळात इंग्रजांनी सह्याद्रितील किल्ले वनखात्याच्या ताब्यात दिले. त्यामुळे पूर्वी जिथे अधिकारी लोकांचे निवासी वाडे होते तेथे संरक्षित वन तयार झाले. या वनात अनेक वाड्यांचे भग्नावशेष दिसतात. तसेच या वनात एक चिरेबंदी कोरडी विहिर आहे. या विहिरीत पाणी टिकत नाही. वर उल्लेख केलेल्या संरक्षित वनाच्या आग्नेय दिशेला, वनापासून खालच्या पातळीवर एक मोठा तलाव आहे. रामराव नारायणराव देशमुख, मामले दंडाराजपुरी यांनी हा तलाव शके १७१२ मध्ये बांधला असावा. त्यांच्या नावाचा शिलालेख सदर तलावाच्या भिंतीत (भिंतीच्या उत्तरेकडील टोकापासून काहि अंतरावर) आहे. सदर तलावाच्या पश्चिम बाजूला पुरातन शिवमंदिर आहे. हे मंदिर हेमाडपंती बांधणीचे आहे. मंदिराच्या मागून एक झरा (पाण्याचा प्रवाह) निघतो. या प्रवाहावरच मंदिर बांधलेले आहे. मंदिराच्या गर्भगृहाखालून हा प्रवाह वाहतो व मंदिराच्य़ा दर्शनी भागात जोत्यात बसविलेल्या दगडी गोमुखातून बाहेर पडतो. गोमुखाखाली दगडात बांधलेले कुंड आहे त्यात गोमुखातून पडणारे पाणी साठते व ते पुढे तलावात जाते. याप्रकारे, एका नैसर्गिक झऱ्यावर वरच्या बाजूला सुंदर शिव मंदिर व खाली मोठा तलाव अशी रचना केलेली आहे. राजमाचीवरील उढेवाडीच्या विकासासाठी Rajmachi Rural Aid and Development Program me या स्वयंसेवी संस्थेने इसवीसन १९७६ पासून अनेक वर्षे काम केले. वाडीतील मुलांचे शिक्षण, मोफत वैद्यकीय सेवा, रोजगार निर्मिती, झाडांची लागवड, किल्यावरील जलाशयांची साफसफाई करून वाडीतील रहिवाशांना स्वच्छ पाणी पुरविणे, अशी विविध कामे सदर संस्थेने केली.त्यामुळे, उढेवाडीच्या विकासाला चालना मिळाली. राजमाची किल्ला पहायला येणाऱ्या दुर्गप्रेमींच्या मुक्कामासाठी एक कँपिंग साइट सदर संस्थेने उढेवाडीजवळच तयार केली आहे.

पाहण्यासारखी ठिकाणे ..........

लोणवळ्याहून तुंगार्लीमार्गेराजमाचीला येतांना वाटेतच गावाच्या वेशीजवळ एक योधचे स्मारक ,अर्धवट तुटलेली तटबंदी,दरवाजाचे अवशेष,गणपति आणि मारुतिरायाची मूर्ती आहे.किल्ल्यावरून आजुबाजुचा दिसणारा परिसर निसर्गसौंदर्याने नटलेला आहे. किल्ल्याच्या माचीवर वस्ती आहे तिला 'उधेवाडी' असे म्हणतात. उदयसागर तलाव : पावसाळयात हा तलाव मात्र ओसंडून वाहतो. तलावाच्या समोरील टेकाडं खाली उतरून गेल्यावर समोरच एक मोठे पठार लागते.पावसाळयात दरीतून पडणाऱ्या धबधब्यांचे सुंदर दृष्य दिसते.हिरवीगार वनश्री अगणित धबधबे आणि सतत कोळणारा पाऊस या अल्हाददायक वातावरणामुळे मनोन्मनी कुसुमाग्रजांच्या ओळी गुणगुणायला लागतात , पलिकडे खळाळे निर्मळ निळसर पाणी उत्तुंग तरुंची उभी सभोती श्रेणी एकाकी धूसर पाऊलवाट मधे ही तिजवरून विहारे मनामध्ये वनराणी मनरंजन : उंचीने श्रीवर्धनपेक्षा लहान असणाऱ्या या बालेकिल्ल्यावर जाणरी वाट सोपी आहे. साधारण अर्ध्या तासात आपण बालेकिल्ल्याच्या प्रवेशद्वारात पोहचतो. मनरंजनवर जाणारी वाट सोपी आहे. या किल्ल्याचा दरवाजा हा गोमुखी आहे.किल्ल्यावर गेल्यावर उजवीकडच्या वाटेवर जुन्या काळातील किल्लेदारांच्या वाडांचे अवशेष दिसतात. त्यासमोरच छप्पर उडालेले उत्तम दगडीबांधकामाचे मंदिर आहे. या मंदिराच्या दरवाज्यावर गणेशाचे शिल्प कोरलेले आहे. दोन चार पाण्याची टाकी आहेत. किल्ल्याची तटबंदी आजही काही प्रमाणात शाबूत आहे. येथून कर्नाळा, प्रबळगड, ईर्शाळगड, ढाकबहिरी, नागफणीचे टोक हा सर्व परिसर दिसतो. श्रीवर्धन : राजमाचीच्या असणाऱ्या दोन बालेकिल्ल्यांपैकी सर्वात उंच असा हा बालेकिल्ला.श्रीवर्धनची तटबंदी आणि बुरुज आजही बर्यापैकी सुस्थितीत आहे.किल्ल्याला अनेक ठिकाणी दुहेरी तटबंदी असावी असे अवशेषांवरून दिसते.दरवाजाची कमान बर्यापैंकी शाबूत आहे. दरवाजाच्याच बाजुला पहारेकर्यांच्या देवडा आहेत.किल्ल्यावर जाण्याच्या वाटेवरच एक गुहा आणि पाण्याची दोन टाकी आहेत .या गुहा म्हणजे दारुगोळ्याचे कोठार आहे.बालेकिल्ल्याच्या माथ्यावर एक ध्वजस्तंभ आहे.समोरच ढाकबहिरीचा चित्तथरारक सुळका तर त्याच्या उजव्या हातास असणारा शिरोटाचा नयनरम्य तलाव हा सर्व परिसर दिसतो. शंकराचे मंदिर : तलावाच्या पश्चिमेला एक सुंदर कळशीदार शंकराचे मंदिर आहे.या मंदिरासमोरच गोमुख असून त्यातले पाणी समोरच्या टाक्यामध्ये पडते. सध्या या मंदिराच्या उत्खननाचे काम गावकऱ्यांनी हाती घेतलेले आहे.राजमाचीला पूर्व आणि दक्षिण दिशांना जी खोल दरी आहे ती 'कातळदरा' या नावाने ओळखली जाते.या दरीतूनच उल्हास नदी उगम पावते.या नदीच्या पश्चिमेकडील डोंगराला 'भैरण डोंगर' म्हणतात.अशा निसर्गसौंदर्याने नटलेल्या राजमाची किल्ल्याचे खरे वैशिष्ट म्हणजे या किल्ल्याचे दोन बालेकिल्ले श्रीवर्धन आणि मनरंजन .बालेकिल्ल्याकडे जातांना वाटेत खडकात खोदलेल्या गुहा लागतात.श्रीवर्धन आणि मनरंजन बालेकिल्ल्यांच्या मध्ये एक सखल पट्टी आहे,यावरच भैरवनाथाचे एक मंदिर आहे. मंदिरासमोरच ३ दिपमाळा आणि लक्ष्मीची मूर्ती आहे.येथून डावीकडे जाणारी वाट मनरंजन आणि उजवीकडची वाट श्रीवर्धन किल्ल्यावर जाणारी आहे.

येथे पहा - राजमाची मोहीम फोटो संग्रह !