जर आपल्याला या ब्लॉग चे संचय आवडत असेल तर , तुम्ही हा ब्लॉग फोलो करू शकता , जेणेकरून यातील संचय वा माहिती आपल्याला सहज मिळत राहतील , धन्यवाद !
ब्लॉग विषयी थोडेसे ! लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्स दर्शवा
ब्लॉग विषयी थोडेसे ! लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्स दर्शवा
गुरुवार, २८ जुलै, २०१६
शनिवार, २० ऑक्टोबर, २०१२
या ब्लॉगवर आपले स्वागत आहे…!
नमस्कार,
माझ्या वीर
शिवरायांच्या मर्द मराठी मावळ्यांनो…
या ब्लॉगवर
आपले स्वागत आहे…
माझ्याविषयी काहीच सांगणार नाही , खरे तर हा ब्लॉग आपले आराध्य दैवत… स्वराज्याजे धनी, राजे शिवछत्रपती , स्वहिंदू धर्म रक्षणासाठी स्वतःच्या
प्राणांचे बलिदान करणारे आपल्या स्वराज्याचे धाकले धनी छत्रपती श्री संभाजी महाराज
, आणि या दिव्य पुरुषांना या मायभूमीत जन्मास आणणारे शहाजीराजे भोसले महाराज आणि आऊसाहेब जिजाऊ माता
यांच्या चरणी अर्पण करत आहे ,
स्वराज्याच्या जडणघडणीत सामील असणाऱ्या ज्ञात, अज्ञात अश्या सर्वच मावळ्यांना,
त्या शिलेदारांना विनम्र अभिवादन आणि मानाचा मुजरा ! …या सर्व शूर वीरांची
तसेच स्वराज्य रक्षणात महत्वाची भूमिका बजावणारे आपले गडकोट किल्यांची महती एकत्रित कशी आणता येईल... याचा
प्रयत्न या ब्लॉग
च्या माध्यमाने करणार आहे...
आधुनिक जगात
जगताना स्वताची नित्याची कामे करत असताना उरलेला वेळ हा मराठी समाज आणि मराठी
संस्कृती याच्या सेवेसाठी खर्ची घालणार आहोत , विकासाची कास धरून मराठी माणसांनी
यशस्वी उद्योजक आणि महाराजांनी निर्मिलेल्या या स्वराज्याच्या स्ववरक्षण हेतू यासाठी
आधुनिक काळातील निस्वार्थी शिलेदार आणि नरवीर मावळे कसे निर्माण होतील यासाठी माझी
माणसं परिवार कटीबद्ध आहेच. माझी माणसं परिवाराअंतर्गत केल्या जाणार्या प्रत्येक
शिवकार्याचे सादरीकरण सोबत गंध आपुल्या मराठी मातीचा अनुभवण्यासाठीच हा ब्लॉग निर्मिला आहे .
साधारणता या ब्लॉगचा हेतू स्पष्ट आहे , सबंध मराठी समाजाला
जातीपातींच्या विळख्यातून, खोट्या भूल थापांपासून थेट इतिहासालाच छेद देणाऱ्या
स्वार्थी राजकारणी मंडळी आणि त्यांच्या मूर्ख संघटनेपासून दूर राखून केल्या
जाणार्या अनेक शिवकार्यातून त्यांचा व्यक्तिगत आणि बौद्धिक स्थरावर विकास करणे हा
आहे .या अखंड महाराष्ट्रात ताठ मानेने उभे राहून स्वराज्य रक्षणासाठी लाखोंच्या
संख्येने सामील व्हा ! आपल्या हिंदुस्थानात एक हिंदू म्हणून महाराजांचे एक एक
शिलेदार म्हणून जगा आणि तो जगत असताना शिवशंभून सारखी स्वराज्यावर निष्ठा ठेवा !
त्यासाठी प्रत्येक घरा घरात आऊसाहेब जिजाऊना जन्म घेऊ द्या !!!
चला, वाचकांनी सर्व गोष्ठींचा आनंद घ्यावा – द्यावा. अवघा शिवकाळ आठवावा, आणि शिवधर्म
जगावा !
माझ्या ब्लॉगला भेट दिल्याबद्दल… धन्यवाद….!
माझ्या ब्लॉगला भेट दिल्याबद्दल… धन्यवाद….!
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पण्या (Atom)
