रविवार, २६ जुलै, २०१५

या हिंदुस्थानात खऱ्या "देशभक्तांची" आणि "देशभक्तीची" उणीव जाणवायला लागलीय.

"याकुब बचाव" म्हणणाऱ्या च्याच "पार्श्वभागी" बॉम्ब लावले पाहिजेत !


या हिंदुस्थानात खऱ्या "देशभक्तांची" आणि "देशभक्तीची" उणीव जाणवायला लागलीय.

या हिंदुस्थानात खऱ्या देशभक्तांची आणि देशभक्तीची उणीव जाणवायला लागलीय. खरेचं या विधानाची तीव्रता खूप जाणवू लागलीय. काल परवा पर्यंत ज्या सलीम खानच्या पोराचा अभिमान वाटत होता त्या मूर्खाचा भोंदूपणा उघड झाला. स्वतःला शिक्षे साठी वाचवण्यासाठी शेतकऱ्यांना मदतीसाठीचालवलेल्या धडपडीत स्वार्थी भाईजानदिसला. 
संपूर्ण जण हिंदुस्थानाकडे पाहत असताना, सर्व दिग्गज आणि जेष्ठ नेते, अभिनेते मंडळी; आतंकवादी आणि आतंकवाद्यांचा साधीदार क्रूरकर्मा याकुब मेमनच्या समर्थनार्थ उतरले दिसतायेत ! शरमेने मान खाली जाते जेव्हा हीच डोक्यावर चढवून घेतलेली मंडळी, चार बुकं जास्ती शेण खाल्लेलीस्वतःला प्रोटोकॉलमानणारी लबाड लांडगीस्वतःच्याच या हिंदुस्थानाची अश्या प्रकारे थट्टा मांडतात तेव्हा ....
 तसा नीट विचार केलात तर या लबाड लांडगेआणि कुत्र्यांचीसाखळीच एकमेकांत गुंतली आहे . म्हणून एक जरी भुंकला तर बाकीचे त्याच्यापाठी भुंकायला सुरवात करतात. आणि जरा नीट पहिले तर , हे सर्व कुत्रे” , “लांडगेएकाच जमातीचे आणि गाववाले असल्याचे जाणवेल . कारण प्रत्येकाची रोजी रोटीयांच्यातल्याच कोण हरमखोराच्या मेहरबानी ने चाललेली असते . मग त्या ठराविक लांडग्याला खुश करण्यासाठी सर्व जमातदार एकमेकां पाठोपाठ कोल्लेकुईईS”  सुरु करतात . या अश्या हरामखोरांना सीमेवरील लढणारे कॅप्टन बत्रा सारखे लाखो शूर जवान , बॉम्बस्फोट आधी दुर्दैवी घटनात मारले जाणारे लाखो निरपराध मुंबईकर पराग सावंतका बरे दिसत नाहीत???
कारगिल मधे विजय मिळवण्यासाठी चालवलेल्या ऑपरेशन विजयमधे ५२७ शूर जवान शहीद झाले .१३०० पेक्षा अधिक शूर सैनिक जखमी झाले. वीरगतीला प्राप्त झालेल्या ५२७ शूर जवानांपैकी अधिक च्या जवानांनी त्यांच्या आयुष्यात ३० वसंत ऋतूसुद्धा पहिले नव्हते , म्हणजे त्यांचे वय ३० पेक्षा हि कमी होते. या सर्वांच्या असीम त्यागाचे काय ??????
सकाळपासून एकही यांचा जमातदारया वीर सुपुत्रांना श्रद्धांजली वाहताना कुठे ऐकिवात आले नाही . पण उठल्या उठल्या यांच्या पैकीच्या प्रमुख लांडग्याच्या रात्रीच्या दारू च्या नशेत केलेल्या टीव टीवात हरामी लांडग्याला खुश ठेवताना, स्वतःचे देशप्रेम हि मंडळी कशी काय विसरून जातात  !


रविवार, १९ जुलै, २०१५

छत्रपती शिवाजी महाराजांचं संपूर्ण लष्करी पेहरावातील ताम्रपटात चितारलेलं मोहक रूप !

उंबरखिंड येथील विजयस्तंभाची रचनाच मुळी मोहक. स्तंभाच्या एका बाजूला इथल्या लढाईचं वर्णन, दुस-या बाजूला महाराजांचं संपूर्ण लष्करी पेहरावातील ताम्रपटात चितारलेलं मोहक रूप, त्याच्याच खाली सिंह-हत्तीच्या लढाईचं सूचक चित्र, वर ढाल तलवारी यांच्या प्रतिकृती.. आणि या सर्वाचं खडकावरच्या पाण्यात पडलेलं प्रतिबिंब.. हे सारं काही डोळयात साठवावं असंच. या स्तंभाशी गतकाळातल्या स्मृतींचं चिंतन करावं.. त्याच्याच नजरेतून त्या वेळच्या लढाईचा प्रसंग पाहावा.





जेवढा या खिंडीचा इतिहास संघर्षपूर्ण तेवढंच नयनरम्य तिचे दर्शन !!

उंबरखिंडीच्या पतितपावन मातीच्या , येथे वाहणाऱ्या या नदीच्या स्वच्छ पाण्याच्या , थंडगार वाऱ्याच्या त्या स्पर्शाने १६६१ सालच्या त्या घडलेल्या रणसंग्रामाची प्रत्यक्ष जाणीव करून देत होते . त्या स्पर्शाने आम्ही सर्व मंत्रमुग्ध झालो होतो. छत्रपती शिवाजी महाराजांच्या चतुरस्र रणनीतीची साक्षीदार असलेली उंबरखिंड याचि देही याचि डोळा पाहण्यास मिळत होती . आम्ही सर्व शिवभक्तीत पूर्णतः न्हाऊन निघालो होतो . विजयस्तंभास मानवंदना देऊन आमच्या मोहीमेची यशस्वीपणे सांगता झाली .


जल्लोष शिवभक्तीचा !

मानवंदना शिवरायांस आणि स्वराज्याच्या भगव्या ध्वजास - जय जय शिवराय !





पाली चा बल्लाळेश्वर गणपती दर्शन, आणि "किल्ले सरसगड", "उंबरखिंड रणसंग्राम"मोहिम २०१५

जेवढा या खिंडीचा इतिहास संघर्षपूर्ण तेवढंच नयनरम्य त्याचं दर्शन!!


पुणे-रायगड जिल्हयांच्या सीमेवर आणि सहयाद्रीच्या कुशीत दडलेली संघर्षपूर्ण आणि शिवाजी महाराजांच्या चतुरस्र रणनीतीची साक्षीदार असलेली उंबरखिंड ही आधुनिक मावळ्यांसाठी पर्वणीच ठरते. या उंबरखिंडीची इतिहासात एक आगळीवेगळी ओळख आहे. ती म्हणजे महाराजांनी मुघल सरदार कारतलब खान याच्या प्रचंड फौजेचा थोडया मावळयांच्या मदतीने केलेला दारुण पराभव. तो दिवस होता, दोन फेब्रुवारी १६६१. खानाच्या या पराभवामागे महाराजांना दूरदृष्टी होतीच; पण याहीपेक्षा उंबरखिंडीच्या भौगोलिक रचनेचा खुबीने करून घेतलेला वापर हे कारण मोठं होतं. खिंडीत घडलेला हा देदीप्यमान विजय याचि देही याचि डोळा पाहायला मात्र एक दिवस तरी राखून ठेवायलाच हवा. त्यासाठी पावलं या समरभूमीकडे वळवावीच लागतात.
१९ जुलै २०१५ रोजी सकाळी ६ वाजून ३० मिनिटांनी आम्ही सर्व जण मुंबई वरून निघालो. एक एक शिलेदार त्यांच्या सोयीच्या ठिकाणी येऊन थांबला होता , रबाले, खारघर आधी ठिकाणावरून सर्व जण एकत्र मिळाले आणि खार घर ला आमच्या दोन्ही वाहनाची पूजा आणि नारळ फोडून मोहिमेचा श्री गणेशा केला .  उंबरखिंड मोहिमेआधी आम्ही पनवेल , खोपोली मार्गे सर्वप्रथम पाली येथे दाखल झालो . बल्लाळेश्वराचं  मन प्रसन्न करणारे दर्शन झाल्यानंतर शेजारीच असणारा “किल्ले सरसगड ” आम्हांला खुणावत होता .. देवळाच्या मागच्या बाजूला मोठा डोंगर दिसतो. तोच सरसगड किल्ला
आहे. आवश्यक न्याहारी आणि खरेदी करून आम्ही “किल्ले सरसगड” सर करण्यासाठी नेहमी प्रमाणे शिस्तबधतेने निघालो. मंदिराशेजारील चौकात “प्रेरणा मंत्र” घेतले , आणि रांगेने आम्ही गडाच्या पायथ्याशी पोहचलो .मंदिरापासून किल्ल्याच्या पायऱ्यांपर्यंत जायला साधारण तासभर लागतो. तिथे किल्ल्याची तटबंदी आहे. पायऱ्या उंच आणि अरुंद आहेत. या ६०-७० पायऱ्या दिंडी दरवाज्यात घेऊन जातात. आल्यावर या भागात तिहेरी तटबंदी बघायला मिळते. तिथून आपण किल्ल्याच्या पठारावर येतो. किल्ल्याच्या पठारावर बालेकिल्ल्याचा डोंगर आहे. त्यानं किल्ल्याचा बराचसा भाग व्यापला आहे. हा डोंगर चढला की बालेकिल्ल्यावर पोहचता येतं. बालेकिल्ल्याच्या डोंगराच्या पोटात पाण्याच्या टाक्या, गुहा केलेल्या आहेत. डोंगर चढायला तसा सोपा आहे. पायऱ्याही आहेत. बालेकिल्ल्यावर केदारेश्वराचं मंदिर, छोटा तलाव आणि दोन बुरुज आहेत. किल्ल्यावरून सुधागड, कोरीगड, धनगड, तैलबैला हे किल्ले दिसतात. खालचं पाली गाव, अम्बा नदी असा परिसर न्याहाळता येतो. सरसगडच्या बाजूला तीन कावडीचा डोंगर आहे. 
.. १३४६ मध्ये सिंहगड, तोरणा, पुरंदर किल्ले जिंकून घेतल्यावर मलिक अहमद ( निजामशाहीचा संस्थापक) कोकणात उतरला. त्या वेळी कोरीगड, सुधागड, सरसगड, सुरगड हे किल्ले त्याच्या ताब्यात आले.नंतर हे किल्ले आदिलशाहीत दाखल झाले. शिवाजी महाराजांनी नारो मुकुंदाना सुधागड व सरसगडाची सबनिशी दिली. शिवाजी महाराजांनी त्यांना सुधागडच्या देखभालीसाठी पाच हजार होन आणि सरसगडासाठी दोन हजार होन दिले. पुढे भोर संस्थानात या किल्ल्याची व्यवस्था होती.सरसगडाची देखभाल १९४८ साला पर्यंत भोर संस्थानाकडे होती. त्यानंतर संस्थाने खालसा झाल्यावर सरसगडाची मालकी इतर गडांप्रमाणे सरकारकडे आली. किल्ल्याच्या डागडुजीकडे दुर्लक्ष झालेले आहे. त्यामुळे सध्यातरी किल्ला निसर्गाच्या लहरीवर तग धरुन आहे. तासा-दीड तासात पूर्ण किल्ला बघून होतो. त्यामुळे पाली गावातनं निघून, किल्ला बघून पुन्हा चारेक तासांत पुन्हा पाली गावात येता येतं. किल्ले सरसगडाची आठवण मनात कोरून गाडीने आम्ही उंबरखिंडीच्या रणसंग्रामाच्या दर्शनासाठी निघालो . गर्द झाडीत आपल्या भिरभिरत्या नजरेला विजयस्तंभाचं दर्शन होतं. मन कृतार्थ होतं. विजयस्तंभाची रचनाच मुळी मोहक. स्तंभाच्या एका बाजूला इथल्या लढाईचं वर्णन, दुस-या बाजूला महाराजांचं संपूर्ण लष्करी पेहरावातील ताम्रपटात चितारलेलं मोहक रूप, त्याच्याच खाली सिंह-हत्तीच्या लढाईचं सूचक चित्र, वर ढाल तलवारी यांच्या प्रतिकृती.. आणि या सर्वाचं खडकावरच्या पाण्यात पडलेलं प्रतिबिंब.. हे सारं काही डोळयात साठवावं असंच. या स्तंभाशी गतकाळातल्या स्मृतींचं चिंतन करावं.. त्याच्याच नजरेतून त्या वेळच्या लढाईचा प्रसंग पाहावा.
 मराठी मावळ्यांच्या विजयाचं या खिंडीशी नातं सांगणारं.. त्यापेक्षाही शिवाजी महाराजांच्या प्रगल्भ युद्धतंत्राची झलक दाखवणारं.. इतिहासाचं भावविश्व उलगडून मंत्रमुग्ध करणारं.. अशा या विजयस्तंभाला त्रिवार मुजरा करूनच आम्ही काही वेळ नदीच्या पाण्यात यथेच्छ पोहण्याचा आनंद लुटला , सोबत एकमेकान  सोबत चे छायाचित्रे हि काढली गेली , नंतर वेळ झाली ती संध्याकाळच्या जेवणाची !
जेवण बनवण्यासाठी आम्ही योग्य जागा शोधात होतोच , त्याच वेळी तिथे उभ्या असणाऱ्या गावकर्यांनी काही अंतरावर असलेल्या एका बंद घराची माहिती दिली आणि त्या ठिकाणी मोकळ्या अंगणामध्ये जेवण बनवता येईल आणि पाण्याची हि सोय असल्याची माहिती दिली . सूर्याची किरणे मावळतीला झुकत  चालली होती , आणि आमच्या सर्वांच्या पोटात भुकेने आगडोंब उसळला होता . जेवणाचे सर्व समान आन्ही आधीच बरोबर घेतले होते . गाडीने आम्ही सर्व त्या ठिकाणी दाखल  झालो . या वेळी “वेज पुलाव “ करण्याचा बेत होता . सर्वांनी जेवण बनवण्यासाठी खूपच मेहनत घेतली , अचानक पुन्हा सुरु झालेल्या पावसाने पेटवलेली चूल पुन्हा पुन्हा विझत होती . चुलीच्या वरती जवळच पडलेल्या सिमेंट पत्र्याचा छत म्हणून उपयोग केला , भर पावसात आम्ही चूल पेटवण्यात यशस्वी झालो . भात शिजवण्यासाठी खूप आटापिटा करावा लागला , परंतु त्यात हि एक वेगळी मज्जा आम्ही सर्व अनुभवत होतो . शेवटी “दम बिर्याणी ” बनवण्यात आम्ही यशस्वी ठरलोच . त्या बंद घराची दरवाजे आम्ही उघडली आणि आत मधे गोल पंगत बसली आणि यथेच्छ जेवणावर ताव मारण्यात आला . पुन्हा तो संपूर्ण परिसर आहे तसा स्वच्छ ठेऊन आम्ही परतीच्या प्रवासा साठी खोपोली मार्गे मार्गस्थ झालो .



रविवार, १२ जुलै, २०१५

बोला .. श्री हरी विठ्ठल !



वारी- काय आहे जाणून घ्या !

वारी सोहळा हा माऊलींचा असला तरी माऊलीला ज्याची चिंता तो वारकरी ऊन, पाऊस, वारी याची तमा न बाळगता वारीत चालत राहतो. कारण त्याला भेटायचे असते ते विठुरायाला आणि त्याला सोबत असते माऊली... काही निष्ठावंत वारकरी तर दिवसभर तोंडात पाणीसुद्धा घालत नाहीत. काय खायचे-प्यायचे ते रात्री तळावरच... निष्काम सेवेचा धडा मिळतो या वारीतच! पालखी सोहळ्यात सर्वांत पुढे चालणारा श्री माऊलींचा अश्व हा श्री श्रीमंत शितोळे सरकार यांचे अंकली-बेळगाववरून श्रीक्षेत्र आळंदीस परंपरेनुसार पायीच आणला जातो. विशेष हे की या अश्वावर कोणीही मनुष्य स्वार झालेला नसतो. हा अश्व ज्येष्ठ शु॥११ ला अंकलीवरून प्रस्थान करतो आणि जेष्ठ वद्य ७ ला (पूर्ण ११ दिवस) आळंदीत प्रवेश करतो. आळंदीला इंद्रायणी नदीच्या पुलापाशी अश्व आले की श्रीमंतांचे प्रतिनिधी तसा निरोप मंदिरात सोहळ्याचे मालक व चोपदार यांना देतात. त्यानंतर श्री हैबतबाबांची दिंडी अश्वांना सामोरी जाते. अश्वांची पूजा केली जाते. त्यानंतर वाजतगाजत अश्वांना मंदिरात आणले जाते. अश्वांच्या स्वागतासाठी मंदिरात पायघड्या घातलेल्या असतात. अश्वाला आळंदीसं पायी आणण्याच्या मागे केवळ परंपराच नाही तर एक श्रदधाही जोडलेली आहे हा अश्व अंकली (बेळगाव) वरून आळंदी येताना ज्या ज्या गावी जातो तेथील जनसमुदाय त्याचे दर्शन घेतात; कारण त्याला केलेला नमस्कार श्री माऊलीच्याकडे आणि त्यांच्या करवी श्री पंढरीच्या विठुरायाकडे पोहोचतो अशी दृढ श्रदधा असते. संपूर्ण सोहळ्यात श्रींची सामूहिक चार स्नाने होतात. पंढरीस जाते वेळी व परतीचे वेळी होणारे नीरा स्नान आणि श्री क्षेत्र पंढरपूर येथे आषाढ एकादशी व आषाढ पौर्णिमेस होणारे श्री चंद्रभागेचे स्नान. संपूर्ण वारीत सकाळच्या वेळीस फक्त दोनच ठिकाणी आरती होतात प्रथम- थोरल्या पादुका (चर्होली) आणि दुसरी पुणे येथे शिंदे छत्रीपाशी. श्रीमंत शिंदे सरकार यांनी श्री माऊलींच्या मंदिर व्यवस्थेसाठी आळंदी आणि नाणज ही गावे इनाम दिली होती, श्री गुरु हैबतबाबादेखील शिंदे सरकार यांचे पदरी सरदार होते. माऊलींच्या मदिरातील महाद्वार, नगारखाना, वीणा मंडप हे श्री शिंदे सरकार यांनीच बांधले. श्रीमंत शिंदे सरकारांच्या याच सेवेचे स्मरण म्हणून त्यांचे समाधीस्थळ असलेल्या शिंदे छत्री जवळ सकाळची आरती होते.  इ.स.१८३१ पासून ह्या वारी सोहोल्यास श्रीमंत शितोळे सरकार यांचा राजाश्रय आहे. आजही तो अखंडपणे चालूच आहे. त्यांच्या ह्या सेवेचे स्मरण आणि बूज म्हणून आजही श्री माऊलीचा रात्रीतळाचा मुक्काम श्रीमंत शितोळे सरकारांच्या तंबूतच असतो.
वाखरी येथून पंढरीस वारी जाताना श्री माऊलींच्या पादुका रथातून उतरून घेऊन श्रीमंत शितोळे सरकार यांच्या गळ्यात दिल्या जातात. वारीतील दिडयामध्ये काही वाद निर्माण झाल्यास तो वाद मालक, चोपदार, दिंडी प्रमुख, देवस्थान विश्वस्थ यांच्या सयुक्त बैठकित, श्रीमंत शितोळे सरकार यांच्या ध्वजाखाली निर्णय घेऊन सोडविण्यात येतो.  संपूर्ण वारी सोहळ्यात मानाच्या कीर्तनाव्यतिरिक्त इतर कुठलेही कीर्तन होत नाही. ह्या कीर्तन सेवा श्री हैबतबाबांपासून चालत आलेल्या आहेत आणि आजही त्यांचे वंशज अतिशय श्रद्धेने त्या पार पाडत आहेत. या रिंगण सोहळ्यानंतरचा उडीचा कार्यक्रमहा खूपच सुंदर आणि अवर्णनीय असतो.
वारी सोहळ्यातील सर्वांत मोठे आकर्षण म्हणजे रिंगण’. त्याचे दोन प्रकार आहेत १) उभे, २) गोल. वारीसोहळ्यात तीन उभी आणि चार गोल रिंगणे होतात. त्यातील दोन रस्त्याच्या उजव्या तर दोन रस्त्याच्या डाव्या बाजूला होतात. त्यांतही दोन रिंगणे जेवणापूर्वी आणि दोन रिंगणे जेवणानंतर होतात. वारीत चालत असताना म्हणायच्या अभंगांचा क्रम आणि नियम ठरलेला असतो. रूपाचे, भूपाळीचे, वासुदेव, आंधळे, पांगळे, गौळणी इत्यादी अभंग सकाळच्या वेळी, दुपार जेवणानंतर हरिपाठ, गुरूपरंपरेचे अभंग, नाटाचे अभंग वारकरी म्हणतात. ठराविक वारांचे अभंग त्या त्या दिवशी म्हटले जातात. सर्व दिंड्या एकच अभंग एकदम म्हणत नाहीत. प्रत्येक दिंडीत मात्र एका वेळी एकच अभंग ऐकू येतो. दुपारी जेवणानंतर ज्ञानोबारायांचा हरिपाठम्हटला जातो. हरिपाठाच्या शेवटच्या अभंगामधील शेवटचे चरण ज्ञानदेवा प्रमाण निवृत्तीदेवी ज्ञान | समाधी संजीवन हरिपाठ॥ म्हटले जाते त्यावेळी दिंडी थांबते; त्याबरोबर पालखीही थांबते आणि दिंडीतील लोक उभे राहून ते चरण म्हणतात. तेथूनच भूमीला स्पर्श करून श्री माऊलीला वंदन करतात. वारीसाठीची पूर्वतयारी संस्थान समिती, मालक, चोपदार हे चैत्र महिन्यापासूनच सुरू करतात. वारीच्या मार्गातील सर्व तहसील, ग्रामपंचायतींना भेट देऊन तेथील व्यवस्थेची पाहणी करतात व योग्य उपाययोजना सुचवितात. वारीत लाखोंचा जनसमुदाय एकत्रित चालतो पण त्यात कधीच कुठेही भांडणतंटा होत नाही. विशेष काही तक्रार असल्यास रात्रीच्या मुक्कामासाठीच्या तळावर त्याबाबत निर्णय घेतला जातो. वारीतील प्रत्येक दिंडी स्वत:चे सर्व साहित्य स्वत: आणते. दिंडीमध्ये चालणार्या प्रत्येक वारकर्याची त्यात अंतर्गत भिशी (कॉन्ट्रिब्यूशन) असते. सर्व खर्च या निधीतून केले जातात. काही दानशूर दिंडीला या ना त्या स्वरूपात दानही देतात. रथापुढील दिंड्या माऊली चालायला लागली की चालणे सुरू करतात. माऊली विसाव्याला किंवा तळावर थांबल्यावरच या दिंड्या विसावतात (बसतात). विसाव्याच्या जागी अगोदर पोहोचूनही जोवर माऊली विसावत नाही तोवर या दिंड्याही विसावत नाहीत. काही वारकरी वारीत फक्त पाणीवाटपाची सेवा देतात. वारी सुरू होऊन संपेपर्यंत त्यांचे काम पाणी वाटपाचेच असते. काही वारकरी संपूर्ण वारीत अनवाणी चालतात, तर काही वारीत एकच वेळ जेवण करून चालतात. वारी सोहळ्यातील काही दिंड्या ह्या लोकशाही पद्धतीने चालविल्या जातात. श्री गुरू बाबासाहेब आजरेकर फड (रथामागे ७ क्रमांकाची दिंडी) हे या पद्धतीचे उदाहरण. फक्त वारीपुरतेच नाही तर वर्षभर ह्या दिंड्यांचे हरीभक्तीचे कार्यक्रम आपापल्या गावी सुरू असत……

हरिपाठ

-- १ --
देवाचिये द्वारी उभा क्षणभरी ।
 तेणे मुक्ती चारी साधियेल्या ॥ १ ॥
 हरि मुखे म्हणा हरि मुखे म्हणा ।
 पुण्याची गणना कोण करी ॥ २ ॥
 असोनि संसारी जिव्हे वेगु करी ।
 वेदशास्त्र उभारी बाह्य सदा ॥ ३ ॥
 ज्ञानदेव म्हणे व्यासाचिये खुणे ।
 द्वारकेचा राणा पांडवा घरी ॥ ४ ॥

-- २ --
चहू वेदी जाण साही(षट्‍)शास्त्री कारण ।
 अठराही पुराणे हरिसी गाती ॥ १ ॥
 मंथुनी नवनीता तैसे घे अनंता ।
 वाया व्यर्थ कथा सांडी मार्ग ॥ २ ॥
 एक हरि आत्मा जीवशिवसमा ।
 वाया तू दुर्गमा न घाली मन ॥ ३ ॥
 ज्ञानदेवा पाठ हरि हा वैकुंठ ।
 भरला घनदाट हरि दिसे ॥ ४ ॥

-- ३ --
त्रिगुण असार निर्गुण हे सार ।
 सारासार विचार हरिपाठ ॥ १ ॥
 सगुण निर्गुण गुणाचे अगुण ।
 हरिविण मन व्यर्थ जाय ॥ २ ॥
 अव्यक्‍त निराकार नाही ज्या आकार ।
 जेथुनि चराचर हरिसी भजे ॥ ३ ॥
 ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्ण मनी ।
 अनंत जन्मानी पुण्य होय ॥ ४ ॥

-- ४ --
भावेविण भक्‍ति भक्‍तिविण मुक्‍ति ।
 बळेविण शक्‍ति बोलू नये ॥ १ ॥
 कैसेनि दैवत प्रसन्न त्वरीत ।
 उगा राहे निवांत शिणसी वाया ॥ २ ॥
 सायासे करिसी प्रपंच दिननिशी ।
 हरिसी न भजसी कोण्या गुणे ॥ ३ ॥
 ज्ञानदेव म्हणे हरिजप करणे ।
 तुटेल धरणे प्रपंचाचे ॥ ४ ॥

-- ५ --
योगयागविधी येणे नोहे सिद्धी ।
 वायाची उपाधी दंभ धर्म ॥ १ ॥
 भावेविण देव न कळे नि:संदेह ।
 गुरुविण अनुभव कैसा कळे ॥ २ ॥
 तपेविण दैवत दिधल्याविण प्राप्त ।
 गुजेविण हित कोण सांगे ॥ ३ ॥
 ज्ञानदेव सांगे दृष्टांताची मात ।
 साधूचे संगती तरणोपाय ॥ ४ ॥

-- ६ --
साधुबोध झाला नुरोनिया ठेला ।
 ठायीच मुराला अनुभवे ॥ १ ॥
 कापुराची वाती उजळली ज्योति ।
 ठायीच समाप्ती झाली जैसी ॥ २ ॥
 मोक्षरेखे आला भाग्ये विनटला ।
 साधूंचा अंकिला हरिभक्‍त ॥ ३ ॥
 ज्ञानदेवा गोडी संगती सज्जनी ।
 हरि दिसे जनी वनी आत्मतत्त्वी ॥ ४ ॥

-- ७ --
पर्वताप्रमाणे पातक करणे ।
 वज्रलेप होणे अभक्‍तांसी ॥ १ ॥
 नाही ज्यासी भक्‍ति ते पतित अभक्‍त ।
 हरिसी न भजत दैवहत ॥ २ ॥
 अनंत वाचाळ बरळती बरळ ।
 त्या कैसा दयाळ पावेल हरि ॥ ३ ॥
 ज्ञानदेवा प्रमाण आत्मा हा निधान ।
 सर्वाघटी पुर्ण एक नांदे ॥ ४ ॥

-- ८ --
संतांचे संगती मनोमार्ग गती ।
 आकळावा श्रीपती येणे पंथे ॥ १ ॥
 रामकृष्ण वाचा भाव हा जीवाचा ।
 आत्मा जो शिवाचा रामजप ॥ २ ॥
 एकतत्त्व नाम साधिती साधन ।
 द्वैताचे बंधन न बाधिजे ॥ ३ ॥
 नामामृत गोडी वैष्णवा लाधली ।
 योगिया साधली जीवनकळा ॥ ४ ॥
 सत्वर उच्चार प्रल्हादी बिंबला ।
 उद्धवा लाधला कृष्ण दाता ॥ ५ ॥
 ज्ञानदेव म्हणे नाम हे सुलभ ।
 सर्वत्र दुर्लभ विरळा जाणे ॥ ६ ॥

-- ९ --
विष्णुविण जप व्यर्थ त्याचे ज्ञान ।
 रामकृष्णी मन नाही ज्याचे ॥ १ ॥
 उपजोनि करंटा नेणे अद्वैत वाटा ।
 रामकृष्णी पैठा कैसेनि होय ॥ २ ॥
 द्वैताची झाडणी गुरुविण ज्ञान ।
 तया कैसे कीर्तन घडे नामी ॥ ३ ॥
 ज्ञानदेव म्हणे सगुण हे ध्यान ।
 नामपाठे मौन प्रपंचाचे ॥ ४ ॥

-- १० --
त्रिवेणी संगमी नाना तीर्थे भ्रमी ।
 चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ ॥ १ ॥
 नामासी विन्मुख तो नर पापीया ।
 हरिविण धावया न पावे कोणी ॥ २ ॥
 पुराणप्रसिद्ध बोलिले वाल्मिक ।
 नामे तिन्ही लोक उद्धरती ॥ ३ ॥
 ज्ञानदेव म्हणे नाम जपा हरिचे ।
 परंपरा त्याचे कुळ शुद्ध ॥ ४ ॥

-- ११ --
हरिउच्चारणी अनंत पापराशी ।
 जातील लयासी क्षणमात्रे ॥ १ ॥
 तृण अग्निमेळे समरस झाले ।
 तैसे नामे केले जपता हरि ॥ २ ॥
 हरिउच्चारण मंत्र हा अगाध ।
 पळे भूतबाधा भेणे याचे ॥ ३ ॥
 ज्ञानदेव म्हणे हरि माझा समर्थ ।
 न करवे अर्थ उपनिषदा ॥ ४ ॥

-- १२ --
तीर्थ व्रत नेम भावेविण सिद्धी ।
 वायाची उपाधी करिसी जना ॥ १ ॥
 भावबळे आकळे एरव्ही नाकळे ।
 करतळी आवळे जैसा हरि ॥ २ ॥
 पारियाचा रवा घेता भूमीवरी ।
 यत्‍न परोपरी साधन तैसे ॥ ३ ॥
 ज्ञानदेव म्हणे निवृत्ती निर्गुण ।
 दिधले संपूर्ण माझे हाती ॥ ४ ॥

-- १३ --
समाधी हरिची समसुखेविण ।
 न साधेल जाण द्वैतबुद्धी ॥ १ ॥
 बुद्धीचे वैभव अन्य नाही दुजे ।
 एका केशवराजे सकळ सिद्धी ॥ २ ॥
 ऋद्धी सिद्धी निधी अवघीच उपाधी ।
 जव त्या परमानंदी मन नाही ॥ ३ ॥
 ज्ञानदेवी रम्य रमले समाधान ।
 हरिचे चिंतन सर्वकाळ ॥ ४ ॥

-- १४ --
नित्य सत्यामित हरिपाठ ज्यासी ।
 कळिकाळी त्यासी न पाहे दृष्टी ॥ १ ॥
 रामकृष्ण उच्चार अनंतराशी तप ।
 पापाचे कळप पळती पुढे ॥ २ ॥
 हरि हरि हरि मंत्र हा शिवाचा ।
 म्हणती जे वाचा तया मोक्ष ॥ ३ ॥
 ज्ञानदेवा पाठ नारायण नाम ।
 पाविजे उत्तम निजस्थान ॥ ४ ॥

-- १५ --
एक नाम हरि द्वैत नाम दुरी ।
 अद्वैत कुसरी विरळा जाणे ॥ १ ॥
 समबुद्धी घेता समान श्रीहरि ।
 शमदमा वरी हरि झाला ॥ २ ॥
 सर्वाघटी राम देहादेही एक ।
 सूर्यप्रकाशक सहस्त्ररश्मी ॥ ३ ॥
 ज्ञानदेवा चित्ती हरिपाठ नेमा ।
 मागिलिया जन्मा मुक्‍त झालो ॥ ४ ॥

-- १६ --
हरिनाम जपे तो नर दुर्लभ ।
 वाचेसी सुलभ रामकृष्ण ॥ १ ॥
 रामकृष्ण नामी उन्मनी साधिली ।
 तयासी लाधली सकळ सिद्धी ॥ २ ॥
 सिद्धी बुद्धी धर्म हरिपाठी आले ।
 प्रपंची निवाले साधुसंगे ॥ ३ ॥
 ज्ञानदेवी नाम रामकृष्ण ठसा ।
 येणे दशदिशा आत्माराम ॥ ४ ॥

-- १७ --
हरिपाठ कीर्ति मुखे जरी गाय ।
 पवित्रचि होय देह त्याचा ॥ १ ॥
 तपाचे सामर्थ्य तपिन्नला अमूप ।
 चिरंजीव कल्प वैकुंठी नांदे ॥ २ ॥
 मातृ पितृ भ्राता सगोत्र अपार ।
 चतुर्भुज नर होऊनी ठेले ॥ ३ ॥
 ज्ञानगूढ गम्य ज्ञानदेवा लाधले ।
 निवृत्तीने दिधले माझे हाती ॥ ४ ॥

-- १८ --
हरिवंश पुराण हरिनाम संकीर्तन ।
 हरिविण सौजन्य नेणे काही ॥ १ ॥
 तया नरा लाधले वैकुंठ जोडले ।
 सकळही घडले तीर्थाटन ॥ २ ॥
 मनोमार्गे गेला तो तेथे मुकला ।
 हरिपाठी स्थिरावला तोचि धन्य ॥ ३ ॥
 ज्ञानदेवा गोडी हरिनामाची जोडी ।
 रामकृष्णी आवडी सर्वकाळ ॥ ४ ॥

-- १९ --
नामसंकीर्तन वैष्णवांची जोडी ।
 पापे अनंत कोटी गेली त्यांची ॥ १ ॥
 अनंत जन्मांचे तप एक नाम ।
 सर्व मार्ग सुगम हरिपाठ ॥ २ ॥
 योग याग क्रिया धर्माधर्म माया ।
 गेले ते विलया हरिपाठी ॥ ३ ॥
 ज्ञानदेवी यज्ञ याग क्रिया धर्म ।
 हरिविण नेम नाही दुजा ॥ ४ ॥

-- २० --
वेद शास्त्र पुराण श्रुतीचे वचन ।
 एक नारायण सार जप ॥ १ ॥
 जप तप कर्म हरिविण धर्म ।
 वाउगाचि श्रम व्यर्थ जाय ॥ २ ॥
 हरिपाठी गेले ते निवांतचि ठेले ।
 भ्रमर गुंतले सुमन कळिके ॥ ३ ॥
 ज्ञानदेवी मंत्र हरिनामाचे शस्त्र ।
 यमे कुळगोत्र वर्जियेले ॥ ४ ॥

-- २१ --
काळ वेळ नाम उच्चारिता नाही ।
 दोन्ही पक्ष पाही उद्धरती ॥ १ ॥
 रामकृष्ण नाम सर्व दोषा हरण ।
 जडजीवा तारण हरि एक ॥ २ ॥
 नाम हरि सार जिव्हा या नामाची ।
 उपमा त्या दैवाची कोण वानी ॥ ३ ॥
 ज्ञानदेवा सांग झाला हरिपाठ ।
 पुर्वजा वैकुंठ मार्ग सोपा ॥ ४ ॥

-- २२ --
नित्यनेमनामी ते प्राणी दुर्लभ ।
 लक्ष्मीवल्लभ तया जवळी ॥ १ ॥
 नारायण हरि नारायण हरि ।
 भक्‍ति मुक्‍ति चारी घरी त्यांच्या ॥ २ ॥
 हरिविण जन्म तो नर्कचि पै जाणा ।
 यमाचा पाहुणा प्राणी होय ॥ ३ ॥
 ज्ञानदेव पुसे निवृत्तीसी चाड ।
 गगनाहूनि वाड नाम आहे ॥ ४ ॥

-- २३ --
सात पाच तीन दशकांचा मेळा ।
 एकतत्त्वी कळा दावी हरि ॥ १ ॥
 तैसे नव्हे नाम सर्व मार्गा वरिष्ठ ।
 येथे काही कष्ट न लागती ॥ २ ॥
 अजपा जपणे उलट प्राणाचा ।
 तेथेही मनाचा निर्धारु असे ॥ ३ ॥
 ज्ञानदेवा जिणे नामेविण व्यर्थ ।
 रामकृष्णी पंथ क्रमीयेला ॥ ४ ॥

-- २४ --
जप तप कर्म क्रिया नेम धर्म ।
 सर्वाघटी राम भाव शुद्ध ॥ १ ॥
 न सोडी हा भावो टाकी रे संदेहो ।
 रामकृष्णी टाहो नित्य फोडी ॥ २ ॥
 जात वित्त गोत कुळ शीळ मात ।
 भजे का त्वरित भावनायुक्‍त ॥ ३ ॥
 ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्ण मनी ।
 वैकुंठ भुवनी घर केले ॥ ४ ॥

-- २५ --
जाणीव नेणीव भगवंती नाही ।
 हरि उच्चारणी पाही मोक्ष सदा ॥ १ ॥
 नारायण हरि उच्चार नामाचा ।
 तेथे कळिकाळाचा रीघ नाही ॥ २ ॥
 तेथील प्रमाण नेणवे वेदांसी ।
 ते जीव जंतूसी केवि कळे ॥ ३ ॥
 ज्ञानदेवा फळ नारायण पाठ ।
 सर्वत्र वैकुंठ केले असे ॥ ४ ॥

-- २६ --
एक तत्त्व नाम दृढ धरी मना ।
 हरिसी करुणा येईल तूझी ॥ १ ॥
 ते नाम सोपे रे रामकृष्ण गोविंद ।
 वाचेसी सद्‍गद्‍ जपे आधी ॥ २ ॥
 नामापरते तत्त्व नाही रे अन्यथा ।
 वाया आणिका पंथा जाशी झणी ॥ ३ ॥
 ज्ञानदेवा मौन जपमाळ अंतरी ।
 धरोनी श्रीहरि जपे सदा ॥ ४ ॥

-- २७ --
सर्व सुख गोडी सर्व शास्त्रे निवडी ।
 रिकामा अर्धघडी राहू नको ॥ १ ॥
 लटिका व्यवहार सर्व हा संसार ।
 वाया येरझार हरिविण ॥ २ ॥
 नाममंत्र जप कोटी जाईल पाप ।
 रामकृष्णी संकल्प धरूनी राहे ॥ ३ ॥
 निजवृत्ति काढी सर्व माया तोडी ।
 इंद्रियांसवडी लपू नको ॥ ४ ॥
 तीर्थ व्रती भाव धरी रे करुणा ।
 शांति दया पाहुणा हरि करी ॥ ५ ॥
 ज्ञानदेवा प्रमाण निवृत्तीदेवी ज्ञान ।
 समाधि संजीवन हरिपाठ ॥ ६ ॥

 २८
 अभंग हरिपाठ असती अठ्ठावीस । रचिले विश्वासें ज्ञानदेवें ॥ १॥
 नित्य पाठ करी इंद्रायणीतीरीं । होय अधिकारी सर्वथा तो ॥ २॥
 असावें एकाग्रीं स्वस्थ चित्त मन । उल्हासें करून स्मरण जीवी ॥ ३॥
 अंतकाळीं तैसा संकटाचें वेळीं । हरि तया सांभाळी अंतर्बाह्य ॥ ४॥
 संतसज्जनानीं घेतली प्रचीती । आळशी मंदमती केवीं तरें ॥ ५॥
 श्रीगुरु निवृत्ति वचन प्रेमळ । तोषला तात्काळ ज्ञानदेव ॥ ६॥
 २९
 कोणाचें हें घर हा देह कोणाचा । आत्माराम त्याचा तोचि जाणे ॥ १॥
 मी तूं हा विचार विवेक शोधावा । गोविंदा माधवा याच देहीं ॥ २॥
 देहीं ध्याता ध्यान त्रिपुटीवेगळा । सहस्र दळीं उगवला सूर्य जैसा ॥ ३॥
 ज्ञानदेव म्हणे नयनाची ज्योती । या नावें रूपें तुम्ही जाणा ॥ ४॥

 श्री ज्ञानेश्वर महाराज...