#चैत्र_शुद्ध_पौर्णिमा
डोईवरचे छत्र काढुनी,
का निराधार करुनी गेलात??
पितृत्वाचा हात काढुनी,
का अनाथ आम्हा करुनी गेलात
राजे………का आम्हास सोडूनी गेलात??
"हिंदुस्थानचे छत्रपती शिवाजी महाराज" यांच्या पुण्यतिथी निमित्त त्यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन……__/\__
ज्या स्थळी परम प्रतापी छत्रपती शिवाजी महाराज समाधिस्थ झाले, ते समाधीचे स्थान जगदीश्वर देवळाच्या पूर्वेस आहे. समाधी अष्टपैलू असून चिरेबंदी आहे. समाधी उद्ध्वस्त अवस्थेत होती. कुणी लोभी दुष्टाने द्रव्यलाभाच्या आशेने तिचे धोंडे उखळलेले होते. ती दुरुस्त करण्याचे काम इ.स. १८८५ सालापासून समाधीच्या किरकोळ दुरुस्ती करितां सरकारांतून ५ रुपये मंजूर झाले होते. लोकमान्य टिळकांनी शिवस्मारकाबद्दल जनजागृती केली. श्री नानासाहेब देशमुख यांनी पुढाकार घेऊन सरकारशी पत्र व्यवहार केला. चार वर्षे हे स्मारक प्रकरण सरकारांत शिजून सन १९२५ साली सरकारी ठराव नं. ७०२३ ता. ६/२/१९२५ अन्वये स्मारकाचे काम पूर्ण करण्यास सरकारची संमती मिळाली.
एक सरकारी अॉफिसर व श्री. न. चिं. केळकर हे दोघे समक्ष गडावर छत्रीचा नकाशा व अंदाजपत्रक करुन गेले.अंदाजे खर्च १९००० रु. ठरवून त्याची विभागणी अशी केली. १२००० हजार रु स्मारक कमिटीने द्यावे ५००० रु. मुंबई सरकारने द्यावे व २००० रु, पुराणवस्तुसंशोधन खात्याने द्यावे. बांधकामास अॉक्टोबर १९२५ मध्ये सुरुवात झाली. पाया खोदण्याचे काम चालू असता १२ फूट खोलीवर पहार अडूं लागली. म्हणून तिथला भाग काळजीपूर्वक मोकळा करण्यात आला. तेव्हां आंत घनाकृती बांधकाम आढळले. त्याच्या दोन बाजूनी कमानी असून वर मोठी शिळा होती. शिळा उखळतांच आंत श्रीशिवरायांच्या देहाची पवित्र रक्षा अतिशय काळजीपूर्वक ठेवलेली आढळून आली. छत्री मूळच्या अष्टकोनी चौथर्यावरच उभारली असून तिच्यावर अर्धगोलाकार घुमट बसविला आहे. छत्रीच्या गाभाऱ्यांत ब्राँझ धातूचा प्रतिमाफलक पश्चिमाभिमुख बसविला आहे. छत्रीचे बांधकाम १९२७ साली संपविले.
मुळच्या अष्टकोनी चौथर्यावरच त्याहून लहान दुसरा एक अष्टकोनी चौथरा बांधण्यात आला आहे. चौथर्यावर जाळीदार कठडे बसविलेले आहेत. चारही बाजूला वर समाधीजवळ जाण्यासाठी वाटा ठेवल्या आहेत. या चौथर्याच्या मध्यभागी सुबक अष्टकोनी छत्री उभारलेली आहे, आठही बाजूंना आठ प्रवेशद्वार आहेत. मधल्या लहान चौथर्यावर छत्रपतींची अष्टधातूंची उठावदार उर्ध्वाकृती प्रतिमा बसविली आहे.
चैत्र शुध्द पौर्णिमा राजाभिषेक शके ६ सातवाहन शके १६०२ ख्रिस्ताब्ध ३ एप्रिल १६८० हनुमान जयंती या विश्वातील एका बलाढ्य शक्तिच्या जन्मदिवशी विश्वातील दुसरी एक बलाढ्य शक्ति एकरुप झाली. शिवराय निजधामी गेले. श्रीजगदीश्वर मंदिराच्या समोर पूर्वदिशेस शिवरायांच्या पार्थिव देहावर अंत्यसंस्कार युवराज राजारामराजे यांजकडून करविले. अष्टकोनी मुद्रा अष्टप्रधानमंडळ अष्टराज्ञी असणाऱ्या शिवरायांची स्मारक छत्री अष्टकोनी असावी हा एक सुंदर योगायोग एका शिवाचे दुसऱ्या शिवासमोर असलेले हे स्मृतिमंदिर या स्मारकाबद्दल कोणास कोणतीही शंका नसावी.

संदर्भ :
रायगड दर्शन दुर्मिळ पुस्तकांतून
किल्ले रायगड स्थळदर्शन
रायगड दर्शन दुर्मिळ पुस्तकांतून
किल्ले रायगड स्थळदर्शन
#प्रौढप्रताप_पुरंदर_क्षत्रियकुलावतंस_सिंहासनाधिश्वर_राजाधिराज_महाराज_श्री_श्री_श्री_श्रीमंत_छत्रपती_शिवाजी_महाराज ....
सकल त्रिलोकाचे पालनकर्ते,तारणहारराजमान्य राजश्री,अखंड लक्ष्मीअलंकृत,महापराक्रमी,महाप्रतापीमहाराजाधिराज,
श्रीमंत छत्रपती शिवाजी राजेमहाराज हे सर्व त्रिलोकाला पोरके करून अनंतातविलीन झाले..