समर्थ रामदास स्वामींनी
लिहलेली, गणपतीची प्रचलित आरती आपण म्हणतो.
ती फ़क्त 2 कड़वी म्हटली जातात. पण मूळ ८ कडव्यांची आहे. ती खालिलप्रमाणे आहे असे म्हणतात
नक्की वाचा आणि आरती पुर्ण म्हटली पाहीजे.- जय जय गणराया ! :-
ती फ़क्त 2 कड़वी म्हटली जातात. पण मूळ ८ कडव्यांची आहे. ती खालिलप्रमाणे आहे असे म्हणतात
नक्की वाचा आणि आरती पुर्ण म्हटली पाहीजे.- जय जय गणराया ! :-
सुखकर्ता दुःखहर्ता वार्ता
विघ्नाची ।
नुरवी पुरवी प्रेम कृपा जयाची ॥
सर्वांगी सुंदर उटि शेंदुराची ।
कंठी झळके माळ मुक्ताफळांची ॥१॥
जय देव जय देव जय मंगलमूर्ती ।
दर्शनमात्रे मनकामना पुरती ॥ध्रु०॥
नुरवी पुरवी प्रेम कृपा जयाची ॥
सर्वांगी सुंदर उटि शेंदुराची ।
कंठी झळके माळ मुक्ताफळांची ॥१॥
जय देव जय देव जय मंगलमूर्ती ।
दर्शनमात्रे मनकामना पुरती ॥ध्रु०॥
रत्नखचित फरा तुज
गौरीकुमरा ।
चंदनाची उटी कुंकुमकेशरा ॥
हिरेजडीत मुकुुट शोभतो बरा ।
रुणझुणती नूपरें चरणीं घागरिया ॥ जय० ॥२॥
चंदनाची उटी कुंकुमकेशरा ॥
हिरेजडीत मुकुुट शोभतो बरा ।
रुणझुणती नूपरें चरणीं घागरिया ॥ जय० ॥२॥
माथा मुकुट मणी कानी
कुंडले ।
सोंड दोंदावरी शेंदुर चर्चिले ।।
नागबंद सोंड-दोंद मिराविले ।
विश्वरूप तया मोरयाचे देखिले ॥ जय० ॥३॥
सोंड दोंदावरी शेंदुर चर्चिले ।।
नागबंद सोंड-दोंद मिराविले ।
विश्वरूप तया मोरयाचे देखिले ॥ जय० ॥३॥
चतुर्भुज गणराज बाही
बाहुटे ।
खाज्याचे लाडू करुनी गोमटे ।।
सुवर्णाचे ताटी शर्करा घृत ।
अर्पी तो गणराज विघ्ने वारीतो ॥ जय० ॥४॥
खाज्याचे लाडू करुनी गोमटे ।।
सुवर्णाचे ताटी शर्करा घृत ।
अर्पी तो गणराज विघ्ने वारीतो ॥ जय० ॥४॥
छत्रे चामरे तुजला मिरविती
।
उंदीराचे वाहन तुजला गणपती ।।
ऐसा तु कलीयुगी सकळीक पाहसी ।
आनंदे भक्तासी प्रसन्न होसी ॥ जय० ॥५॥
उंदीराचे वाहन तुजला गणपती ।।
ऐसा तु कलीयुगी सकळीक पाहसी ।
आनंदे भक्तासी प्रसन्न होसी ॥ जय० ॥५॥
ता ता धि मि किट धि मि किट
नाचे गणपती ।
ईश्वर पार्वती कौतुक पाहती ।।
ताल मृदंग वीणा घोर उमटती ।
त्यांचे छंदे करुनी नाचे गणपती ॥ जय० ॥६॥
ईश्वर पार्वती कौतुक पाहती ।।
ताल मृदंग वीणा घोर उमटती ।
त्यांचे छंदे करुनी नाचे गणपती ॥ जय० ॥६॥
चरणी घागरिया छनछन वाजती
त्याच्या नादाने अंबर गर्जती
ता ता थयक थयक नाचे गणपती
उमा शंकर देव कौतुक पाहती ॥७॥
त्याच्या नादाने अंबर गर्जती
ता ता थयक थयक नाचे गणपती
उमा शंकर देव कौतुक पाहती ॥७॥
लंबोदर पीतांबर फणिवरबंधना
।
सरळ सोंड वक्रतुंड त्रिनयना ॥
दास रामाचा वाट पाहे सदना ।
संकटीं पावावें निर्वाणीं रक्षावें सुरवर वंदना॥ जय ० ॥ ८ ॥
सरळ सोंड वक्रतुंड त्रिनयना ॥
दास रामाचा वाट पाहे सदना ।
संकटीं पावावें निर्वाणीं रक्षावें सुरवर वंदना॥ जय ० ॥ ८ ॥
जय देव जय देव जय
मंगलमूर्ती ।
दर्शनमात्रे मनकामना पुरती ॥॥
दर्शनमात्रे मनकामना पुरती ॥॥
!!गणपती
बाप्पा मोरया!!

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा