आजचे मराठे शिवकाळातील मराठा सरदारांचे ऐकत नाही हे दुर्दैव आहे !
कान्होजी जेधे म्हणजे शिवकाळातील एक मात्तबर घराणे. शहाजीराजांच्या सोबत अनेक लढाया लढलेले कान्होजी जेधे. शहाजीराजांच्या हुकुमावरून पुण्यात शिवछत्रपतींच्या सेवेत रुजु झालेल्या कान्होजी जेध्यांना कोण ओळखत नाही ?
अफजलखानाच्या वेळी खानास मदत करा असा आदिलशाही फर्मान आलेला असतानाही शिवरायांच्या सोबत उभे राहून आदिलशाहीने दिलेल्या वतनावर पाणी सोडलेले मातब्बर सरदार म्हणून कान्होजी जेधे इतिहासात प्रसिद्ध आहेत.
या जेध्यांच्या शिवकाळातील इतिहास प्रसिद्ध मराठा सरदाराच्या वंशपरंपरागत ऐतिहासिक नोंदी त्यांच्या *जेधे शकावली* व *जेधे करिनात* आहेत. अनेक ऐतिहासिक घटनांच्या सत्य नोंदी आपल्याला या शकावलीत सापडतात इतके हे महत्वाचे साधन. या मराठा सरदाराच्या ऐतिहासिक नोंदवहीत शिवछत्रपतींच्या जन्माची नोंद लिहिलेली आहे. ती नोंद अशी *शके १५५१ शुक्ल संवत्सरे फाल्गुन वद्य तृतीया* या हिंदू कालगणनेनुसारच ही नोंद आहे.
माझ्यासारख्या सामान्य मराठा तरुणाच्या मनात विचार येतो की, *शिवकालातील मातब्बर मराठा सरदारांनी शिवजन्माची नोंद हिंदू तिथीनुसारच केलेली असताना आजचे मराठे इंग्रजी कालगणनेनुसार शिवजयंती का साजरी करतात ?'* शिवछत्रपतींच्या काळात इंग्रजी कालगणना या देशात अस्तित्वात नव्हती याचा हा स्पष्ट पुरावा असतानाही इंग्रजी १९ फेब्रुवारीचा हट्ट का ??
ज्या मराठा सरदारांनी त्यांच्या नोंद वहीत शिवजन्म तिथीनुसार फाल्गुन वद्य तृतीयेला लिहिला आहे त्यांना आम्ही खोट का पाडत आहोत का ? ज्यांनी शिवछत्रपतींच्या हिंदवी स्वराज्याकरिता रक्त सांडले त्या मराठ्यांचे आम्ही वंशज आज त्यांचे ऐतिहासिक कथन आम्ही मानत नाही ?? आपलं ते खरं करण्यासाठी मराठा सरदारांनाच्या ऐतिहासिक नोंदीकडे दुर्लक्ष का केल जात आहे ? या मागे नक्की काय राजकारण आहे ?? ते राजकारण आजच्या मराठ्यांना ठाऊक आहे की नाही ??
ज्यांच्यामुळे शिवछत्रपतींच्या हिंदवी स्वराज्याला आकार आला, बळ मिळालं त्याच मराठा सरदारांना, त्यांच्या ऐतिहासिक नोंदींना आपण दुर्लक्ष करून काय मिळवणार आहोत ? उद्या जर आजच्या मराठ्यांना कोणी विचारल की,,,,, *"शिवकाळातील तुमच्या मराठा सरदारांच्या नोंदीत शिवजन्म तर फाल्गुन वद्य तृतीयेला लिहिला आहे मग तुम्ही इंग्रजी तारखेला का करता ?"*
याचं उत्तर कोणी देइल काय ??
मी वाट पाहतोय .....
-संकलित
टिप - सोबत जेधे शकावलीतील शिव
जन्माचे पान जोडले आहे.













